Posts

Showing posts from April, 2020

सेलू येथील त्या महिला रुग्णाचा नांदेड मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू

अखेर सेलू येथील त्या महिला रुग्णाचा मृत्यू परभणी (प्रतिनिधी):- परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका महिलेला नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले होते त्या महिला रुग्णास संसर्गजन्य आजार झाल्याचेही अहवालात नमूद केले होते  गुरुवारी रात्री तिचा मृत्यू झाल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे  उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून पुढील कारवाई जिल्हा प्रशासन करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने  यासंदर्भात अधिक माहिती अशी दिली की परभणी जिल्ह्यातील एक महिला अत्यंत आजारी असल्यामुळे औरंगाबाद येथे गेली होती सेलू येथे वास्तव्याला असलेली ही महिला औरंगाबाद येथील उपचारादरम्यान सेलू येथे आली होती आणि सेलू वरून परभणी मार्गे नांदेड येथे गेली होती नांदेड येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे  नांदेड येथे आज दोन रुग्ण मयत झाले आहेत यात  सेलू येथील महिलेचाही समावेश आहे.

चला केशरी रेशनकार्ड धारकानो ....कार्ड ऑनलाईन असो किंवा नसो...धान्य घेऊन जा - जिल्हाधिकारी दि एम मुगळीकर

Image
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्याना लाभ मिळणार - जिल्हाधिकारी  मे महिन्याचे धान्य २७ एप्रिलपासून वाटपास सुरुवात परभणी दि.28(प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील तहसिल कार्यालय व संबंधित रास्तभाव दुकानदारांकडे असलेल्या डी- १ रजिस्टरवरील नोंदीनुसार पिवळी अथवा एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका असलेल्या परंतू राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांना या योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे. अशी माहिती  जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी दिली.         शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत व एपीएल केशरी शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या , एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पुढील २ महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने गहु  ८ रुपये  प्रतिकिलो व तांदूळ  १२ रुपये  प्रतिकिलो या दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आल

कुटुंब व्यवस्था बळकट करणाऱ्या, धर्मरक्षक रंणरागिणीला समाज मुकला - सुनील घनवट( हिंदू जनजागृती समिती)

Image
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांना श्रद्धांजली ! कुटुंबव्यवस्था बळकट करणार्‍या आणि महिलांवरील अन्यायाच्या विरोधात लढणार्‍या धर्मरक्षक रणरागिणीला समाज मुकला ! - सुनील घनवट हिंदु जनजागृती समिती मुंबई (वृत्तसंस्था):- आधुनिकतेमुळे मोडकळीस आलेली भारतीय कुटुंबव्यवस्था पुन्हा बळकट करण्यासाठी झटणार्‍या आणि ‘लव्ह जिहाद’मुळे महिलांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात नारीशक्तीला जागृत करणार्‍या अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांच्या रूपातील एका रणरागिणीला समाज मुकला आहे. व्याख्यानांच्या माध्यमांतून राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ विचारांचे बीजारोपण  महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात करणार्‍या अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे कार्य राष्ट्रप्रेमी समाज कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘चला नाती जपूया’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली. अनेक वर्तमानपत्रांत स्तंभलेखनही केले. तुटणारी घरे वाचली पाहिजेत आणि ‘लव्ह जिहाद’सारख

भगवान श्री परशुराम जयंती उत्साहात साजरी-विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले

Image
भगवान श्री परशुराम जयंती निमित्त पोलीस कर्मचारी व मनपा कर्मचारी याना सॅनिटाईजर चे वाटप  गरजवंतांना अन्नदान प्रसाद वाटप उपक्रम घेण्यात आला ब्राहमण एकता मंच, सावरकर विचार मंच, म. श. शिवणकर प्रतिष्ठान, संत कवरराम संघ,लायन्स क्लब प्रिन्स,अन्नदान प्रसाद वाटप करी ता यांचे मिळाले विशेष सहकार्य. * परभणी(प्रतिनिधी):-  भगवान श्री परशुराम जयंती निमित्त परभणी जिल्हा ब्राहमण महासंघ च्या वतीने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे व या कामात पोलीस कर्मचारी हे मोठी भूमिका निभावत आहेत त्यांना सुरक्षेचे दृष्टीने जयंतीचे औचित्य साधून बंदोबस्त कमी असलेले पोलीस कर्मचारी व मनपा स्वच्छता कर्मचारी यांना हॅण्ड सॅनिटाईजर चे वाटप करण्यात आले या उपक्रमाची सुरवात परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्णकांत उपाध्याय यांचे हस्ते करण्यात आली यावेळी त्यांनी सर्वाना परशुराम जयंती च्या शुभेच्छा दिल्या व नन्तर नवा मोंढा पोलीस ठाणे, नानलपेठ पोलीस ठाणे, कोतवाली पोलीस ठाणे मधील बंदोबस्त कामी असलेले पोलीस कर्मचारी याना हॅण्ड  सॅनिटाईजर चे वितरण करण्यात आले तसेच मनपा च्या स्वच्छता

यंदाची श्री बसवेश्वर जयंती घरातूनच साजरी करण्याचे वीरशैव विचार मंचचे आवाहन

Image
वीरशैव धर्म संस्थापकापैकी असलेले श्री श्री श्री 1008जगदगुरू एकोरामाराध्य जंयती व वीरशैव धर्म प्रचारक प्रसारक महात्मा बसवेश्वर जयंती दिनांक 26-4-2020रोजी  घरीच साजरी करावी. असे आवाहन वीरशैव विचार मंच परभणी वतीने करण्यात आले आहे         कोरोना विषाणू च्या महासंकट आले आहे, भारतात सर्वञ लॉकडाऊन असल्यामुळे आपल्या सर्वांना शोसल डिस्टश ठेवायचा आहे. लॉकडाउन चे काटेकोर पालन करायचे आहे आणि आपण सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी या महात्म्याची जयंती घरीच साजरी करायाची आहे.आणि घरीच जगदगुरु एकोरामाराध्य व महात्मा बसवेश्वर यांचे फोटो ठेऊन घरात जर बेलपञ आणि फुले असेल तरच अर्पण करायचे आहे. अन्नता बाहेर बेल फुल आणण्यासाठी जायचे नाही आणि ठिक 12वा    कपाळाला भस्म लाऊन इष्ठलिंग पुजा करून या कोरोना महामारी पासून भारताला च नव्हे तर जगालाही मुक्त कर हा विषाणू चा नाश कर म्हणत आपल्या इष्ठलिंग ला प्रार्थणा करायाची आहे.  या विषाणु पासुन आपले आणि सर्वांचे संरक्षणासाठी लढा देणारे डॉक्टर, पोलीस ,पञकार , स्वच्छता कर्मचारी , मेडिकलवाले , जनसेवक  यांच्या प्रति आभार व्यक्त करत यांना दिर्घआयुष्य आणि संरक

भुसार व शेतीमाल खरेदी करिता - कृषी उत्पन्न बाजार समितीकडून त्वरित टोकन घ्या - गर्दी टाळा

Image
भुसार व शेतमाल खरेदीसाठी शेतकरी बांधवांनी तालुकानिहाय  कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकन प्राप्त करून घेण्याचे आवाहन परभणी दि.24 (प्रतिनिधी):- भुसार शेतमाल (गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, सोयाबीन ई.) खरेदीसाठी  कृषी उत्पन्न बाजार  समितीचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे दिलेले आहेत.  सर्व शेतकरी बांधवांनी या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून बाजार समितीकडून टोकन प्राप्त करून घ्यावेत व ज्या दिवशी बाजार समिती खरेदीला बोलावेल त्याच दिवशी आपला शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीस घेऊन जावे. जेणेकरून बाजार समित्यांमध्ये अनावश्यक गर्दी होणार नाही व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,मंगेश सुरवसे  यांनी केले आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांचे संपर्क क्रमांक जिंतूर- प्रवीन जगताप - 9860871656 , अश्विन करंजकर - 9764007070,मानवत-  सागर कडतन -9762750827, मारोती साठे- 9421371734,सेलू- गजानन शिंदे-9970692048, अशोक वाटोडे-9763256677, गंगाखेड -राजेभाऊ गायकवाड- 9975153472 , विश्वनाथ मोटे- 9421462149 ,  पाथरी-टेन्गसे बी.एस.-9420810454, नखाते एस. के. 9763145

करा अजून गर्दी....उद्या पासून परत परभणीत कर्फ्यु

Image
परभणी जिल्ह्यातील नागरी भागासह परिसरात दोन दिवसीय संचारबंदी लागू  परभणी, दि.22 (प्रतिनिधी) :-  परभणी महानगरपालिका हद्द आणि 5 किमी परीसर तसेच जिल्हयातील सर्व नगर पालिका हद्दीमध्ये व त्यालगतच्या 3 किमी परीसरात कलम 144 नुसार बुधवार दि . 22 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री पासून ते दि. 24 एप्रिल 2020 चे रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.      या संचारबंदीतुन  सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी आणि त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने , सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक , वार्ताहर , प्रतिनिधी , वितरक तसेच  पेट्रोलपंप वितरक , कर्मचारी व त्यांची वाहने  आणि दुध विक्रेत्यांनी केवळ घरोघरी जावून

परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय स्वतः उतरले रस्त्यावर - बाहेरून कोणीही परभणीत येता कामा नये

Image
जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस अधीक्षक उतरले मैदानात     परभणी (प्रतिनिधी) २२ एप्रिल: - राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा वाढणारा संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन परभणी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी स्वतः शहरातील विविध भागांमध्ये जाऊन लोकांची होणारी गर्दी यामुळे सोशल डिस्टन्सिंग उडणारा फज्जा लक्षात घेऊन व जिल्ह्यातील सर्व सीमा बंद असून चोर मार्गाने  लपून छपून आडमार्गाने येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांचे पथक नेमून अहोरात्र जनजागृतीची मोहीम राबवत आहेत ... तसेच पोलीस अधीक्षक श्री. उपाध्याय यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी 3 मे पर्यंत लॉक डाऊन चे पालन करून घराबाहेर न निघता स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी जनतेस केले आहे..

सोलापुरात स्वस्त धान्य दुकानावर कारवाई - गडबड करताना 3 दुकाने सापडली

Image
स्वस्त धान्य दुकानांवर अन्नधान्य वितरण कार्यालयाची कारवाई सोलापूर २० एप्रिल (वृृत्त संस्था):- दळणवळण बंदीच्या कालावधीत शिधापत्रिका धारकांना घेतलेल्या धान्याची ३ स्वस्त धान्य दुकानदारांनी पावती दिली नाही. या प्रकरणी ३ दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे पिंपळनेर येथील गंगामाई महिला बचत गट आणि पी.एस्. लोकरे यांच्या स्वस्त भाव दुकानांचे परवाने रहित करण्यात आले. धान्य वाटपात अनियमितता, मूळ शिधापत्रिका आणि ‘ऑनलाईन’ शिधापत्रिका यांच्या नावात पालट, अशा त्रुटींमुळे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

परभणीत 1 लाख 41 हजार शिधापत्रिका धारकांना तांदूळ वाटप करण्यात आला

Image
जिल्हयात 1 लाख 41 हजार       शिधापत्रिकाधारकांना मोफत  तांदळाचे वाटप  - जिल्हाधिकारी परभणी, दि.21 (प्रतिनिधी) :-   कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपास जिल्ह्यात प्रारंभ झाला असून प्रतिलाभार्थी पाच किलो तांदुळ देण्यात येत आहेत. तरी आजपर्यंत जिल्हयात 1लाख 41हजार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदळाचे वाटप पूर्ण झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली आहे.             परभणी जिल्हयात अंत्योदय योजनेअंतर्गत 43 हजार 879 पात्र शिधापत्रिकाधारक असुन प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 2 लाख 5 हजार 605 तर एपीएल शेतकरी योजनेत 56 हजार 196 पात्र शिधापत्रिकाधारक आहेत . असे  तीनही योजनांसाठी पात्र कार्डधारकांची एकुण संख्या 3 लाख 5 हजार 680 इतकी असुन त्यावरील लाभार्थी संख्या 14 लाख 52 हजार 932 इतकी आहे. नियमित धान्य वाटप जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असुन 6 हजार 150 मे . टन धान्य पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेले आहे.             मोफत तांदुळ वाटपास प्रारंभ झाला असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्

औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिते शासकीय वाहनातून मद्य नेतांना पोलिसांच्या ताब्यात

Image
औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिते  शासकीय वाहनातून दारू नेतांना पोलिसांच्या ताब्यात एकीकडे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढत असतांना दुसरीकडे पराकोटीची असंवेदनशीलता आणि दायित्वशून्यता असणारे असे शासकीय अधिकारी कसे जनहीत साधणार  ?  जालना –  औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते (वय ४३ वर्षे) यांना ‘आरोग्य सेवा’ असा फलक लावलेल्या शासकीय वाहनातून ६ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम आणि ६ हजार रुपयांचे विदेशी मद्य घेऊन जातांना पोलिसांनी जिल्ह्यातील वरूडी पडताळणी चेकपोस्टवर पकडले. ही घटना १८ एप्रिल या दिवशी दुपारी १.३० वाजता घडली. वाहनाची कागदपत्रे, रोख रक्कम आणि विदेशी मद्य यांविषयी विचारलेल्या प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. प्राथमिक चौकशी करून त्यांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहनासह रोख रक्कम आणि विदेशी मद्य असा एकूण १२ लाख ७६ हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग बहुरे यांनी तक्रार प्रविष्ट

दळणवळण बंदीचे नियम शिथील करण्यावरून जागतिक आरोग्य संघटनेची चेतावणी

Image
कोरोनाच्या संकटातील खरा विनाश तर अजून दिसायचाच आहे ! – डब्लू एच ओ यांनी व्यक्त केली चिंता दळणवळण बंदीचे नियम शिथील करण्यावरून जागतिक आरोग्य संघटनेची चेतावणी जिनेव्हा (स्वित्झर्लंड)(वृत्तसंस्था) –  आमच्यावर विश्‍वास ठेवा, कोरोनाच्या संकटातील खरा विनाश तर अजून दिसायचाच आहे, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रोस घेबरेयेसस यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. हे संकट रोखायला हवे. हा एक विषाणू आहे, जो अद्यापही अनेक लोकांना समजलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रभाव अद्यापही न्यून झाला नसतांना अनेक देश दळणवळण बंदीचे निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर डॉ.घेबरेयेसस यांनी ही चेतावणी दिली; मात्र या विषाणूचा प्रादुर्भाव आणखी कसा वाढणार ?, याचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. आफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल, असा दावाही जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.

गोवा कोरोनामुक्त : शेवटच्या रुग्णाचा चाचणी अहवालही ‘निगेटिव्ह'

गोवा कोरोनामुक्त : शेवटच्या रुग्णाचा चाचणी अहवालही ‘निगेटिव्ह' कोरोनाबाधित रुग्ण नसला, तरी ३ मेपर्यंत दळणवळण बंदी रहाणार असून लोकांचे सहकार्य आवश्यक ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा पणजी (वृत्तसंस्था) – गोव्यात शेवटच्या कोरोनाबाधित रुग्णाचा चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. गोव्यात आता एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ वरून शून्यावर आल्याने मला आनंद होत आहे. यासाठी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचारी यांचे मी अभिनंदन करतो. राज्यात आता कोरोनाबाधित एकही रुग्ण नसला, तरी ३ मेपर्यंत राज्यात दळणवळण बंदी लागू रहाणार आहे. दळणवळण बंदीतील नियमांचे काटेकोरपणे पालन करून लोकांनी सहकार्य करावे. दळणवळण बंदी संपेपर्यंत गोव्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडू नये, याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

परभणीत उद्या 20 एप्रिल रोजी फक्त अत्यावश्यक सेवा व दुकाने सकाळी 7 ते दु 2 पर्यंत चालू राहतील

परभणी शहरातील नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंची खरेदी  २० एप्रिल रोजी सकाळी ७  ते दुपारी २ या कालावधीतच करावी (घरपोच वृत्तपत्र वाटप बंद राहील)           परभणी दि.19 (प्रतिनिधी) :- राज्य शासनाने करोना विषाणूचा ( कोव्हीड १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक करणेसाठी राज्य शासनाने दिनांक  १७ एप्रिल २०२०  सुधारित अधिसूचना निर्गमित केली आहे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , परभणी करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात दिनांक ३ . मे २०२० पर्यंत पूर्ण लॉकडाऊन घोषित केलेले आहे . परभणी शहर महानगरपालिका हद्दीमध्ये एक रुग्ण करोना बाधित आढळल्याने परभणी शहर व तीन किमी च्या परिसरात दिनांक . १९ एप्रिल २०२० पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती .  परभणीत असे निदर्शनास आले आहे की , नागरिकांची अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गैरसोय होण्याची शक्यता आहे . त्यामुळे परभणीचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , परभणी आदेशीत केले की , परभणी शहरातील नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदी दिनांक २० एप्रि

एस टी ची सॅनिटाईजर बस ....कर्मचाऱ्याने लढवली आयडिया...कशी बनवली वाचा

Image
एसटीची सॅनिटायझर बस ... कशी बनवली वाचा आपल्या एस टी चे कर्मचारी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चालक व वाहक व इतर कर्मचारी यांना सॅनिटाईजर व्हॅन तयार केले तेही अतिशय कमी वेळात व उपलब्ध साधनांचा वापर करून कसे केले वाचा           एक मसेज मोबाईल आला . त्यामध्ये कर्नाटक एसटीच्या सॅनिटायझर बस बद्दल माहिती होती. त्यांनी त्यांच्या राज्यासाठी हि बस बनवली होती. लगेच मनात विचार आला जर कर्नाटक एसटी करू शकते तर महाराष्ट्र एसटी का नाही ? लगेचच ह्या संदर्भातला मेसेज माझ्या अभियांत्रिक मित्रांच्या ग्रुप वर टाकला. आणि त्यांनी मार्गदर्शन केले. तसे पाहता ही सिस्टिम बनवणे सोपे आहे. परंतु मुख्य आव्हान होते "लॉकडाऊन".  मित्रांनी सांगितलेले सेन्सर्स ,फॉगर्स,  पाईप्स  मोटर इत्यादी  सामान मिळणे खूपच कठीण होते . तरी हे आव्हान घेऊन मी लगेच एसटीचे महाव्यवस्थापक राहुल तोरो सरांशी संपर्क साधला आणि त्यांच्याजवळ एसटी साठी सॅनिटाईझर बस बनवण्याची इच्छा व्यक्त केली . त्यांनी सुद्धा होकार दर्शवुन मला पुढील प्रक्रिया सांगितली . गाडी ठाण्यात बनवायची असल्याने ठाण्यातील अधिकाऱ्यांशी  संपर्क साधून

शेतकरी मित्रानो आपला कापूस विक्री करिता तयार ठेवा -द्या आपल्या मालाची ऑनलाईन माहिती - 20 एप्रिल पासून सुरू होईल खरेदी

Image
कापूस खरेदी चालू तेही  कोठेही बाहेर न पडता शासनाच्या वतीने कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे या करिता कापूस उत्पादक शेतकरी लोकांनी ऑनलाईन माहिती सरकारला काळवायची आहे  यात माहिती भरणे अगदी सोपे आहे माहिती देताना आपल्या स्वतःचा कापसाचा सोबत सेल्फी फोटो Notecam या मोबाईल अँप मधूनकाढायचा आणि तो फोटो खालील लिन्कवर क्लिक करून माहिती भरायची व  सोबत फोटो जोडायचा https://forms.gle/VUASetva7aDqkGn3A चला लागा कामाला आपला कापूस सरकार खरेदी करेल काळजी करू नका....जनहितार्थ सादर द्वारा - संपादक टिळक रत्न*

परभणीतील हे परिसर केले नागरिकांसाठी प्रतिबंधित (या भागातील नागरिकांनी बाहेर बिलकुल पडू नये)

शहरातील हे भाग केले नागरिकांसाठी प्रतिबंधित - या परिसरातील नागरिकांनी बिलकुल बाहेर पडायचे नाहीये परभणी (प्रतिनिधी)- परभणी शहरात बाहेरच्या जिल्ह्यातुन आलेल्या एक व्यक्तीस कोरोना विषाणूचा  संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या नंतर तो रुग्ण ज्या भागात वास्तव्यास होता त्या ठिकाणच्या सर्व परिसर निर्जंतुकिकरण करण्यात येत आहे त्याच बरोबर इतर कोणत्याही नागरिकांना याचा अपाय होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून याभागातील नागरिकांनी येते काही दिवस बिलकुल बाहेर पडू नये हे नागरी भाग नागरिकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे या भागाची नावे पुढील प्रमाणे आहेत दुर्गा नगर, कपिल नगर, सहारा नगर वृंदावन नगर, प्रबुद्ध नगर, महात्मा फुले नगर ,प्रियदर्शनी नगर,  अहिल्यादेवी होळकर नगर, राजे सँभाजी नगर , सुंदराई नगर ,जिजाऊ नगर ,रामदास नगर, कृषी सारथी कॉलोनी, श्रेयस नगर, समाधान नगर , मथुरा नगर, रचना नगर सोमनाथ नगर, राजेन्द्र गिरी नगर ,आंबा भवानी नगर ,गाडगेबाबा नगर,मथुरा नगर गोकुल नगर, गजानन नगर, साईबाबा नगर ,भाग्य नगर , ए वन मार्केट ह्या नगरात नागरिकांनी कोणत्याही कामा करिता बिलकुल बाहेर

शिया रवी ठाकूर या चिमुकलीने अन्नदान उपक्रमास परदेशातून पाठवले आपले खाऊचे पैसे रुपये 2100

Image
सावरकर विचार मंचच्या मोफत अन्नदान उपक्रमास  शिया ठाकूर चिमुकलीने ग्लासगो स्कॉटलँड (युके) येथून नोंदवला आर्थिक सहभाग परभणी (प्रतिनिधी):- सम्पूर्ण देशात कोरोना 19 आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी लॉक डाउन घोषित केले गेले त्यादिवसापासून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेने सावरकर विचार मंच ने गरजवंत लोकांना जेवणाची व्यवस्था करण्याचा उपक्रम राबवण्याचे ठरवून शहरात उपक्रम सुरू केला मंचच्या या कार्यात शहरातील म.श. शिवणकर प्रतिष्ठान,संत कवरराम सेवा मंडळ, वुई केअर फाउंडेशन,लायन्स क्लब प्रिन्स परभणी आदी सारख्या संस्था तन मन धन रूपाने सामील झाल्या.  आजही हा उपक्रम मोठ्या उत्साहात चालू आहे शेकडो गरजवंत लोकांना घरपोच मोफत तयार जेवण पोहचवण्यात येत आहे या उपक्रमाला सर्व ठिकानाहून मदतीचा ओघ सुरू आहे अनेक लोक विविध प्रकारे या उपक्रमात सहभागी होत आहेत. असेच या उपक्रमात परभणी येथील मूळ रहिवासी असलेले सध्या कामा निमित्ताने परदेशात ग्लासगो स्कॉटलँड (युके) येथे वास्तव्यास असलेले रवी ठाकूर यांच्या मुलीने शिया ठाकूर (वय 8 वर्ष ) आपल्या पिगी बॅंकेत खाऊ करीता साठवलेले  2100 रुपये आर टि जि एस द्वारे सावकार व

पोलिसांनी झटक्यात परभणीतील परिसर निर्जन करून दाखवला - संचारबंदी पहिला दिवस

Image
कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने 3 दिवसाचे संचारबंदीचे कठोर अंमलबजावणी आदेश काढले आजचा पहिला दिवस  परभणी (प्रतिनिधी):-   काल दि 16 एप्रिल रोजी एम आय डी सी परिसर परभणी येथे 21 वर्षीय युवक कोरोना१९ बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला सर्व प्रशासन यंत्रांणा तत्काळ  कामाला लागल्या त्या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत तसेच तो जिथे राहत होता तो परिसर सील करण्यात आला असून निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे त्यांनतर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी परभणीत संचारबंदीचे कठोर पाल करण्याचे आदेश काढले व 3 दिवस याचे पालन सर्वांनी करावे असे आव्हान केले आज  दि 17 एप्रिल परभणी शहरा मध्ये सर्वत्र संचारबंदीचे नागरिकांनी पालन केल्याचे चित्र दिसून आले शहरातील सर्वच भागात शुकशुकाट पहावयास मिळाला वसमत रोड,जायकवाडी रोड, गांधी पार्क,स्टेशन रोड,बस स्टँड परिसर,उड्डाणपूल परिसर,मोंढा परिसर,रायगड कॉर्नर,गणपती चौक भागातील क्षणचित्रे  आदी भागात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलिसांचे नियंत्रण दिसून आले .

परभणीत एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला - सगळंच बिघडले - ३ दिवस संचारबंदी

Image
एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला..सगळेच बिघडले.. आता 3 दिवस कडक संचारबंदी.... अगदी गल्ली बोळात सुद्धा बर का....! परभणी परिसरात तीन दिवसीय संचारबंदी लागू;*  *उल्लंघन करणाऱ्यावर होणार कडक कारवाई* परभणी (प्रतिनिधी):-   परभणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत मनाई आदेश लागू केला असतानाही अत्यावश्यक सेवेच्या  नावाखाली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त इतर व्यक्ती व वाहनांना नियंत्रित करणे आवश्यक असल्याने परभणी शहर महानगरपालिका हद्दीमध्ये व हद्दीबाहेरील 3 किमी परिसरात दि.17 ते 19 एप्रिल 2020 पर्यत संचारबंदी लागू केली असल्याचे आदेश परभणीचे जिल्हादंडाधिकारी  दी. म. मुगळीकर यांनी निर्गमित केले आहेत.       या संचारबंदीतुन  सर्व शासकीय कार्यालये व कर्मचारी  त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने,  सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, शासकीय निवारागृहे, कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजूना अन्न वाटप करणारे एनजीओ व त्याची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घ

भारतातील लॉक डाउन 03 मे पर्यंत वाढवण्यात येत आहे -आरोग्य सेतू मोबाइल अँप सर्वांनी आजच डाउन लोड करावे- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Image
टिळक रत्न वाचक करिता जनहितार्थ सादर* आज दि 14 एप्रिल 2020 रोजी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संबोधित केलेले मुद्दे *3 मे 2020 पर्यंत भारतातील लॉक डाउन वाढवला आहे * 1 - इतर देशांच्या तुलनेत भारत सध्या सुरक्षित 2 - भारताने वेळीच लॉक डाउन केल्याने परिस्थिती नियंत्रणात 3 - सोशल डिस्टनसिंग व लॉक डाउन चा सर्वाना लाभ झाला 4 - कोरोनाचा कुठेही संसर्ग होता कामा नये याची सगळ्यांनी दक्षता घ्यावि 5 - पुढील एक आठवड्यात कठोर पाऊल उचलले जाणार आहेत 6 - सर्व ठिकाण पिंजून काढले जाणार आहे मूल्यांकन केले जाईल 7 - 20 एप्रिल पासून काही भागात  सशर्थ शिथिलता देण्यात येईल 8 - कोणीही बेजबाबदार पणे वागू नका तसे केल्यास कारवाई केली जाईल 9 - गरीब लोकांच्या उपजीवेके करिता प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने माध्यमातून मदत केली जाणार आहे 10 - सर्व जीवनावश्यक साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे कुठंही कमतरता नाही साठेबाजी करू नका 11 - कोरोनाचा एकही हॉटस्पॉट वाढू अथवा निर्माण होऊ देऊ नका काळजी घ्या 12 - धैर्य व नियमांचे सर्वांच्या सहकार्याची गरज आहे  13 - घरातील ज्येष

ही सूचना येताच शेकडो व्हॅटसप ग्रुप बंद झाले.......जिल्हाधिकारी यांच्या त्या सूचनेचे केले स्वागत

ही सूचना येताच शेकडो ग्रुप बंद झाले.... जिल्ह्यातील सर्व व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनने संगणकीय प्रणालीवर माहिती भरावी - जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर परभणी (प्रतिनिधी):- कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यातील सर्व व्हाट्सअॅप ग्रुप अॅडमीनने त्यांच्या अधिनस्त असलेल्या व्हाटसअॅप ग्रुपचे नाव,  ग्रुपचा उद्देश आणि ग्रुपमधील सदस्य संख्या या सोबत सर्वग्रुप अॅडमीनचे नाव आणि मोबाईल क्रमांक ही माहिती ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर भरणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ॲडमिनने संपूर्ण अचूक माहिती भरून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दि.म. मुगळीकर यांनी केले याांनंतर  काही वेळातच  अनेक ग्रुप एडमीन लोकांनी माहिती दिली तर उगीच कायद्या च्या कचाट्यात कशाला अडकायचे त्या पेक्षा ग्रुप बंद केलेला बरा असे विचार करून ग्रुप एडमीन लोकांनी शेकडो ग्रुप बंद केल्याचे दिसून आले .  जिल्हाधिकारी यांनी विविध व्हाट्सअप व्हाटस ग्रुपची माहिती संकलीत करण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , परभणी मार्फत एक ऑनलाईन संगणक प्रणाली विकसीत केली असून ही प्रणाली h

30 एप्रिल पर्यंत दारू विक्री बंदीच असणार आहे.....आणि संचारबंदीकडे दुर्लक्ष करू नका...अन्यथा

Image
  जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या 30 एप्रिलपर्यंत बंदच राहणार परभणी (प्रतिनिधी) :-    कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यात  दि.1 ते 14 एप्रिल 2020 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीचा अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेशित केले होते परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता सुधारित आदेश काढण्यात आले असून त्याचा कालावधी 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे.            मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन परभणी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-3 देशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, सीएल,एफएल,टिओडी-3, देशी व विदेशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती. एफएल-3 परवाना कक्ष व एफएल,बीआर-2, बिअरची सिल बंद बाटलीतून विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारका विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमुद केले आहे. -*-*-*-*-

केशरी शिधापत्रिका धारक नागरिकांना मिळणार धान्य - राज्य शासनाची घोषणा

Image
केशरी शिधापत्रिका धारक नागरिकांना मिळणार सवलतीच्या दरात धान्य राज्य सरकारची घोषणा मुंबई (वृत्तसंस्था):- राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार केशरी रेशन कार्डधारकांना एक मेपासून स्वस्त धान्य  दुकानांतून धान्यवाटप केले जाणार आहे. स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत खुली ठेवण्यात येणार आहेत. केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेतील अन्नधान्याचा लाभ मिळत नाही.अशा केशरी शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्यांचे धान्य मिळणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केंद्रीय अन्न महामंडळाच्या गोदामामधून धान्याची उचल करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून ई-पॉस मशीनद्वारे तांदळाचे वितरण करायचे आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल, तरी त्या शिधापत्रिकाधारकांना शासनाने ठरविलेल्या दराने अन्नधान्य देण्यात यावे. अन्नधान्य वाटप करताना रेशन दुकानदराने शिधापत

सार्वजनिक बांधकाम विभागाने 11 दिवसात पूर्ण केली मेडिकल गॅस पाईपलाईन

Image
ससून रूग्णालयात मेडिकल गॅस पाईपलाईनचे काम  अवघ्या ११ दिवसांत पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशंसनीय कामगिरी मुंबई (वृत्तसंस्था):- पुणे येथील ससून रूग्णालयाच्या नव्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचे प्रत्यक्ष काम अवघ्या ११ दिवसांत पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने नवा विक्रम रचला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात ते म्हणाले, ससून रूग्णालयाची ही ११ मजली इमारत बांधून जवळपास तयार होती. कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर या इमारतीत अतिदक्षता व विलगीकरण कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी हे विशेष रूग्णालय उभारण्यामध्ये सर्वात मोठे आव्हान मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचे होते. हे काम ‘हाफकीन’कडून केले जाते. मात्र कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे त्यांच्यावरही कामाचा प्रचंड ताण असल्याने ससून रूग्णालयाच्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले. कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील ही नवीन आव्हानात्मक जबाबदारी विभागाने स्वीकारली व अवघ्या ११ दिवसांत हे

मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी DD सह्याद्रीवर जाहिरात करावी - शिवसेना नेते संजय राऊत

Image
पंतप्रधान निधीसाठी डीडी नॅशनलवर जाहिरात होतीये मग मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी डी डी सहयाद्री वर का होऊ नये जाहिरात - शिवसेना नेते संजय राऊत मुंबई (वृत्त संस्था):-    कोरोना महामारीने सगळा देश त्रस्त झाला आहे. सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर मोठं काम करते आहे. पण यामध्ये लोकांनी देखील आर्थिक मदत करून आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत. पंतप्रधान निधीमध्ये आपली रक्कम जमा करण्याचं आवाहन मोदी करत आहेत. तर विविध राज्य सरकारं त्यांच्या त्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करण्याचं आवाहन करत आहे. याच रिलीफ फंडावर आणि त्याच्या जाहिरातबाजीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. डीडी नॅशनल वर पंतप्रधान निधीसाठी जाहिरात होत आहे मग राज्य सरकारला डीडी सह्याद्रीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहीरात करायला काय हरकत आहे?, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट करून डीडी सह्याद्रीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जहिरात का करू नये, असं म्हटलं आहे.

रंगाचे झोन पाहून खुश होऊ नका.....घराबाहेर पडू नका....युद्ध अंतिम टप्प्यात आहे

Image
राज्यात 3 झोन केले आहेत....नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी नाही बर का झोनचे रंग पाहून खुश होण्याची गरज नाहीये....जो पर्यंत कोरोना 19 प्रभाव संपत नाही तो पर्यंत नागरिकांनी लॉक डावूनचे व सुरक्षा उपाय करावेत. महाराष्ट्र(वृत्त):- आज विविध वृत्तपत्र व वृत्तवाहिन्या द्वारे राज्यात झोन निर्माणची बातमी वाऱ्यासारखी पसरली ज्यात लाल केशरी हिरवा अश्या रंगाने राज्यातील जिल्हे दर्शविण्यात आले आहेत .  नागरिकांना वाटले की आपला जिल्हा लाल रंगाचा नाहीये ना मग चला टेन्शन मिटले आता कोरोनाला घाबरायची गरज नाही लागा आपापल्या रोजच्या कामाला ....परंतु थांबा ....नागरिकानो या रंगाचा अर्थ तुमच्या रोजच्या कामाशी नाहीये ....आणि तुम्हाला बाहेर फिरण्याचा परवाना देखील नाही बर का.....सावधान सध्या संपूर्ण देश कोरोना 19 च्या संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहे अनेक नागरिक या विषाणूच्या संक्रमण झाल्याने मृत्युमुखी पडले आहे. संपूर्ण देशात संचारबंदी (लॉक डाउन) 14 एप्रिल पर्यंत सरकारने घोषणा केली. त्यामुळे देशात व राज्यात परिस्थिती नियंत्रणात आणणे सोपे झाले.परंतु काही घटना पाहता राज्यातील प्रमुख शहरात कोरोना

देणाऱ्यांचे श्वास हजारो......दुबळी माझी झोळी..-डॉ गिरीश वेलणकर

जन्मभरीच्या श्वासाइतुके.... देणार्‍याचे श्वास हजारो, दुबळी माझी झोळी निसर्गाने आम्हाला भरभरून दिले आहे, पण आम्ही करंटेपणे त्याचा नीट वापर करत नाही. याआधी आपण पाहिले की श्वास हा शरीर व मन यातला, ऐच्छिक व अनैच्छिक क्रियांमधला सेतू आहे. दैनंदिन व्यवहारात आपण पाहातो की आपण धावपळ केली की (जी आपण क्वचितच करतो) श्वासगती वाढते, आराम केला की कमी होते. राग आला की वाढते, मन शांत असले की कमी होते.  सेतू शब्द फार अर्थपूर्ण आहे. सेतूवरून दोन्ही बाजूंनी ये जा करता येते. याचाच अर्थ असा की शरीर, मनाच्या व्यापारांनी जशी श्वासाची गती बदलते तशीच श्वासाच्या गतीवरील नियंत्रणातून शरीर, मनालाही नियंत्रित करता येते. सर्वसामान्यपणे श्वासाचे नियंत्रण आपल्याला नकळत लंबमज्जेकडून होत असते, पण जेव्हा आपण अभ्यासपूर्वक श्वासाला नियंत्रित करतो तेव्हा हे नियंत्रण लंबमज्जेकडून मेंदूकडे जाते. मेंदूकडून जेव्हा श्वासाची लयबद्धता नियंत्रित केल्या जाते तेव्हा शरिरातील अन्य क्रियांची लयबद्धताही नियंत्रित होते. यात ह्रदयाचे ठोके, स्नायूंचे आकुंचन प्रसरण, मानसिक व भावनात्मक आवर्तने, अंत:स्रावी ग्रंथी व अन्य स्राव यां

तुम्ही खबरदारी घ्यावी...... आम्ही जबाबदारी घेतो - ३० एप्रिल पर्यंत घरात बसावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना परिस्थिती पाहून काही ठिकाणी हे लॉकडाऊन अधिक कडक केले जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.      आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीची माहिती व घेतलेला निर्णय सांगण्यासाठी आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. *तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो * परिस्थिती नियंत्रणात असली तरी अजिबात गाफील राहून चालणार नाही, राज्यातील नागरिकांनी स्वत:च  स्वत:चा रक्षक होतांना खबरदारी घ्यावी, आम्ही जबाबदारी घेतो, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी वागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिस्त पाळली तरच ३० तारखेपर्यंत आपण बाजी मारू शकू, असेही ते म्हणाले. *लॉकडाऊनमध

धनंजय मुंडे यांचे सुचनेवरून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 4000 रु प्रदान

Image
धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून संजय गांधी निराधारांच्या 4087 लाभार्थींना चार महिन्याचे प्रत्येक 4 हजार रुपये तर श्रावणबाळ 10,890 लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्याचे प्रत्येक 2 हजार रुपये जमा-डॉ. संतोष मुंडे* _दिव्यांगांनी बँकेत गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करावे_ ● परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील संजय गांधी निराधारांच्या 4087 लाभार्थींना चार महिन्याचे प्रत्येक 4 हजार रुपये तर श्रावणबाळ 10,890 लाभार्थ्यांच्या यांच्या खात्यात दोन महिन्याचे प्रत्येकी एक हजार रुपये यांचे मानधन वर्ग करण्यात आले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दिव्यांग बांधवांनी बँकेत गर्दी न करता सोशल डिस्टन्स तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.          कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्याअनुषंगाने सुरू असलेले लॉकडाऊन यामुळे  दिव्यांग व्यक्तींना अनेक समस्या

परभणी आय टी आय च्या नवीन इमारतीत भविष्यात होऊ शकतो कोरोना विलगिकरण कक्ष

Image
परभणी आय टी आय च्या नवीन बिल्डिंग मध्ये भविष्यात होऊ शकते कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी विलगिकरण कक्ष परभणी(प्रतिनिधी):- जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथील नवीन इमारतीच्या जागेत भविष्यात कोरोना विषयक विलगीकरण व अलगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांची प्राथमिक तपासणी :डॉ. खा. श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम

Image
ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांची प्राथमिकतपासणी :डॉ. खा. श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम मुंबई(वृत्तसंस्था) : सर्वसामांन्य माणूस घरात असला तरी पत्रकार आणि पोलीस सामांन्यांसाठी रस्त्यावर आहेत.. सरकारने पोलिसांना विमा कवच आणि मदत देण्याचे जाहीर केलेले आहे.. मात्र पत्रकारांना कोणतेच संरक्षण नाही..मालक राबवून घेत आहेत आणि पत्रकारांसाठी काही करावं असं सरकारला वाटत नाही.. या पार्श्‍वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचयावतीने ठाणे जिल्ह्यातील पत्रकार आणि पोलिसांची थर्मल स्कॅनरच्या मदतीने  कोविडची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे.. एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत आज या तपासणी मोहिमेस सुरूवात झाली.. आज २०० पत्रकार आणि पोलिसांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.. स्वतःखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरांच्या भूमिकेत जाऊन तपासणी केली..ठाणे, कळवा, मुंब़ा उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली आदि ठिकाणच्या पत्रकारांनी याचा लाभ घेतला..  पत्रकारांची मोफत प्राथमिक तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एकनाथराव शिं