ही सूचना येताच शेकडो व्हॅटसप ग्रुप बंद झाले.......जिल्हाधिकारी यांच्या त्या सूचनेचे केले स्वागत

ही सूचना येताच शेकडो ग्रुप बंद झाले....
जिल्ह्यातील सर्व व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनने संगणकीय प्रणालीवर माहिती भरावी - जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर
परभणी (प्रतिनिधी):- कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यातील सर्व व्हाट्सअॅप ग्रुप अॅडमीनने त्यांच्या अधिनस्त असलेल्या व्हाटसअॅप ग्रुपचे नाव,  ग्रुपचा उद्देश आणि ग्रुपमधील सदस्य संख्या या सोबत सर्वग्रुप अॅडमीनचे नाव आणि मोबाईल क्रमांक ही माहिती ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर भरणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ॲडमिनने संपूर्ण अचूक माहिती भरून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दि.म. मुगळीकर यांनी केले याांनंतर  काही वेळातच 
अनेक ग्रुप एडमीन लोकांनी माहिती दिली तर उगीच कायद्या च्या कचाट्यात कशाला अडकायचे त्या पेक्षा ग्रुप बंद केलेला बरा असे विचार करून ग्रुप एडमीन लोकांनी शेकडो ग्रुप बंद केल्याचे दिसून आले .
 जिल्हाधिकारी यांनी विविध व्हाट्सअप व्हाटस ग्रुपची माहिती संकलीत करण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , परभणी मार्फत एक ऑनलाईन संगणक प्रणाली विकसीत केली असून ही प्रणाली https://www.collectorpbn.in/ लिंकवर उपलब्ध आहे. या प्रणालीत एका ग्रुपच्या केवळ एकाच ॲडमिनने संपूर्ण अचूक माहिती भरावी. तसेच यात शासकीय कार्यालयांनी त्यांच्या शासकीय संदेशवहनासाठी तयार केलेल्या ग्रुपची माहिती भरण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक ॲडमिनने त्याच ग्रुपसाठी पुन्हा तीच माहिती भरण्याची आवश्यकता नाही असे देखील यात कळवले आले होते.
सदरील सूचना सर्वत्र व्हायरल होताच शेकडो ग्रुप लगेच बंद झाल्याचे दिसून आले आहे.
किमान यामुळे नागरिकांमध्ये चुकीचे संदेश जाणे बंद झाले व यामुळे सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत झाली म्हणावे लागेलं...सर्वत्र जिल्हाधिकारी यांच्या सुचनेचे स्वागत होत आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन