Posts

Showing posts from January, 2022

अखेर स्वर्णम उर्फ डुग्गु सापडला

Image
अखेर स्वर्णम उर्फ डुग्गु सापडला मागील आठवड्यात झाले होते त्याचे बाणेर येथून अपहरण  पुणे (टिळक रत्न प्रतिनिधी)-  पुण्यातील बाणेर परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या चिमुरड्या मुलाचे एक व्यक्तीद्वारे 6 दिवसखाली अपहरण करण्यात आले होते . पोलीस यंत्रणा कसून त्याचा शोध घेण्यास कामाला लागली होती ,पोलिसांच्या तपासाला यश मिळाले . अखेर हा चिमुरडा पोलिसांना पुनावळे येथे आज दि 19 जानेवारी रोजी सापडला . पिंपरी - चिंचवड परिसरातील पुनावळे येथे पोलिसांना तो सापडला . मागील आठवड्यात बालेवाडीमधून चार वर्षांच्या स्वर्णमचे अपहरण केले गेले होते . त्यानंतर स्वर्णमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती . पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती , खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता , जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते . अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश मिळाले.बातमी हाती लागे पर्यंत मुलाला पालकांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू होती अपहरण करणारे व्यक्तीने कोणत्या कारणास्तव हे केले ह्याचा

पोकराच्या 327 गावांसाठी 130 कोटींचा आराखडा मंजूर

Image
 ‘पोकरा’च्या 327 गावांसाठी 130.88 कोटींचा आराखडा मंजूर नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या सनियंत्रण समितीची बैठकीतील निर्णय  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी) : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत जिल्ह्यातील 327 गावच्या 130.88 कोटींच्या मृद व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेसंदर्भात जिल्हा सनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.आर. देशमुख, जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड आदींसह कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील 327 गावांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील 45, पैठण 53, फुलंब्री 24, वैजापूर 54, गंगापूर 35, खुलताबाद 11, सिल्लोड 30, सोयगाव 22 आणि कन्नड तालुक्यातील 53 गावांचा समावेश आहे. कृषी विभाग आणि ग्राम संजिवनी समिती

दैनंदिन व्यवहारात 10 रुपयांचे नाणे व्यापारी आणि विक्रेते ह्यांनी स्वीकारले पाहिजे ,नकार देणे चालणार नाही

Image
व्यापारी व विक्रेते नागरिक यांनी 10 रुपयांचे नाणे व्यवहारात घ्यावीत -नकार देणे चालणार नाही   रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने स्पष्ट निर्देश देऊनही दहा रुपयांची नाणी स्विकारण्यास दुकानदार, विक्रेते इत्यादी नकार देत असल्याविषयी योग्य कार्यवाही होण्यासाठी नांदेड – परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सुराज्य अभियान’च्या वतीने निवेदन सादर  भारतीय चलन पद्धतीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) वेगवेगळ्या प्रसंगी १४ प्रकारची १० रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. आजपर्यंत रिझर्व बँकेने वर्ष २००९ मध्ये आणि २०१० मध्ये प्रत्येकी २ वेळा, वर्ष २०११, २०१२, २०१३, २०१४ मध्ये प्रत्येकी १ वेळा, तसेच वर्ष २०१५, २०१६ आणि २०१७ मध्ये प्रत्येकी २ वेळा १० रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. एकूणच आत्तापर्यंत १४ वेळा चलनात आणलेली ही सर्व १० रुपयांची नाणी ही वैध असल्याचे भारतीय रिझर्व बँकेने प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळवले आहे. प्रत्यक्षात मात्र १० रुपयांची सर्व नाणी वैध असूनही समाजात पसरलेल्या अफवा / गैरसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी

स्टेच्यु ऑफ युनिटी एक्सप्रेस लवकरच सुरू करू : डॉ. कराड 

Image
स्टेच्यु ऑफ युनिटी एक्सप्रेस लवकरच सुरू करू : डॉ. कराड   औरंगाबाद ( टिळक रत्न प्रतिनिधी )- केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या कडे मराठवाडा व महाराष्ट्रातील नागरिकांना स्टेच्यु ऑफ युनिटी परिसर व व्यापारी हितासाठी 'स्टेच्यु ऑफ युनिटी एक्सप्रेस' सुरू करावी अशा मागणीचे निवेदन दि.१५ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टी चे जिल्हा कार्यालयमंत्री व्यंकटेश कमळू यांचे सह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ' केवडिया' , जिल्हा नर्मदा ,गुजरात.येथे भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा व म्युझियम ( स्टेच्यु ऑफ युनिटी) परिसरात अत्यंत सुंदर पर्यटन परिसर विकसित केला आहे.स्टेचू ऑफ युनिटी च्या दर्शनाने भारतावासीयांचे राष्ट्रप्रेम जागृत होते. महाराष्ट्रातुन व मराठवाडयातून ही खूप मोठ्या प्रमाणात जनता ' स्टेच्यु ऑफ युनिटी ' केवडिया येथे पाहण्यासाठी जात असते. स्टेच्यु ऑफ युनिटी,गरुडेश्वर मंदिर, नीलकंठ धाम- पोईचा, कुबेर भंडारी असा मोठा पर्यटन परिसर तिथे आहे.रेल्वे मार्ग सुर