Posts

Showing posts from November, 2022

देशविघातक हलाल अर्थव्यवस्थावर सर्व हिंदुत्ववादी संघटना संतप्त

Image
 देशविघातक हलाल अर्थव्यवस्थावर सर्व हिंदुत्ववादी संघटना संतप्त हलाल वर त्वरित बंदी आणावी हिंदू जनजागृती समितीची मागणी  परभणी (प्रतिनिधी)- देशविघातक हलाल अर्थव्यवस्थावर सर्व हिंदुत्ववादी संघटनां संतप्त या हलाल अर्थव्यवस्थेवर त्वरित बंदी आणावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने पत्रकार परिषद घेऊन मांडली या पत्रकार परिषदेस ऍड सतीश देशपांडे उदय बडगुजर अजय फुलारी उपस्थित होते हलाल प्रमाणपत्र केवळ मांस पुरतेच मर्यादित न राहता खाद्यपदार्थ सौदर्याप्रसाधने औषधी हॉस्पिटल बांधकाम मॉल यासाठी सुद्धा भारतात वापर सुरू केला आहे सदरील प्रमाणपत्र करिता 47000 रु घेऊन लोगो घ्यावा लागत आहे आणि अशी प्रमाणपत्र बर्याचपैकी उत्पादक कांपनीने घेतले देखील आहेत मग ह्याबाबत उत्पादक कँपणीना प्रमाणित करण्यासाठी अधिकृत व्यवस्था अस्तित्वात असताना परत हे हलाल प्रमाणपत्र खाजगी मुस्लिम संस्था कडून का घेतले जात आहे असा प्रश्न उपस्थित होतो देशातील 15% मुस्लिम समाजाला इस्लाम आधारित हलाल हवे म्हणून 85% गैरइस्लामी जनतेवर हे लादणे संवैधानिक,ग्राहक तथा धार्मिक अधिकारच्या विरोधी आहे ह्या हलाल अर्थव्यवस्था मुळे भारतीय अर्थव्यवस्

बेंगळुरू येथे अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या युनूस पाशा याच्यावर गुन्हा नोंद !

Image
बेंगळुरू येथे अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या युनूस पाशा याच्यावर गुन्हा नोंद ! बेंगळुरू (कर्नाटक) –  येथे अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांतर करण्यास दबाव टाकणे आणि तिचे लैंगिक शोषण करणे या प्रकरणी युनूस पाशा फयाज अहमद याला अटक करण्यात आली आहे. पाशा याने या मुलीला एक भ्रमणभाष दिला होता. त्यावरून व्हिडिओ कॉल करून या मुलीला गुप्तांग दाखवण्यासाठी बाध्य केले होते. हा कॉल रेकॉर्ड करून तो नंतर या मुलीला ब्लॅकमेल करत होता. या मुलीचे लैंगिक शोषण करण्यासाठी त्याने तिच्या घराच्या आवरात झोपेच्या गोळ्यांचा पाकीट फेकले आणि घरातील जेवणात मिसळण्यास सांगितले. मुलीने याला नकार दिल्यावर त्याने अश्‍लील चित्रीकरण उघड करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीने कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात गोळ्या मिळसल्यावर घरातील सर्वजण जेवण केल्यावर झोपी गेले. त्यानंतर युनूस तिच्या घरात आला आणि तिच्याशी विवाह करणार असल्याचे सांगत त्याने तिचे लैंगिक शोषण केले. ‘लैंगिक शोषणाची माहिती कुणाला सांगितली, तर आई-वडिलांना ठार मारीन’, अशी धमकी त्याने दिली. संपादकीय भूमिका  शरीयत कायद्यानुसार असले कृत्य करणारे व्यक्तीस कमरेपर्यंत

शेतकरी बांधवनो शेततळे अस्तरीकरण साठी त्वरित अर्ज करा

शेतकरी बांधवांनो शेततळे  अस्तरीकरणासाठी  अर्ज करा  परभणी, दि. 24 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सामूहिक व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे. पाणीसाठा निर्माण करणे व साठवलेले पाणी वाया जावू नये, तसेच उन्हाळ्यात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा वापर व्हावा, या हेतूने 50 टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतक-यांनी तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गंत 100 टक्के अनुदानावर शेततळ्याची योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनांमध्ये पात्र असलेल्या शेतक-यांनी महाडीबीटी (mahadbtmahait.gov.in) पोर्टलवर अर्ज करावेत, तसेच अधिक माहितीसाठी कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ****

1 डिसेंबर पासून कलम 36 लागू राहील

  जिल्ह्यात एक डिसेंबरपासून कलम  36  लागू   परभणी  दि .24 :-    जिल्ह्यात डॉ .  बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ,  बाबरी मशीद  – रामजन्मभूमी संदर्भाने सर्व धर्म वेगवेगळा दिवस पाळतात .  तसेच राज्यातील शेतकरी संघटनेतर्फे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ,  यासाठी  1  ते  15  डिसेंबरदरम्यान मुंबई पोलीस कायदा कलम  36  लागू करण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर .  यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे . परभणी जिल्ह्यात या कलमाअन्वये पोलीस विभागाची तारीख ,  वेळ ,  सभेची जागा ,  मिरवणुकीचा मार्ग त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा निश्चित केल्याशिवाय आयोजित करु नयेत .  तसेच यादरम्यान कोणत्याही नियमांचे किंवा आदेशाचे उल्लंघन होणार नाही ,  याची काळजी घ्यावी .  हा आदेश लग्न वरात ,  प्रेतयात्रा व धार्मिक कार्यक्रमास लागू होणार नाही .  असे त्यांनी आवाहनात सांगितले आहे .

कपाळावर तिलक गंध का लावावे - स्वामी नारायनदास महाराज,

Image
 कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया.धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, 'तू कपाळावर ही विभूती का लावतोस?' त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला, 'माझी आई मला सांगते म्हणून!' मित्रांनो, सोळा वर्षीय प्रज्ञानंधाच्या जागी आपण असतो, तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा! मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. *'देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील, तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांचा आदेश !

Image
  अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांचा आदेश ! मुंबई  – अन्न आणि औषध प्रशासनाकडून १५ वर्षांनंतर प्रथमच राज्यातील विक्रेत्यांकडील चिकन अन् मासे यांची पडताळणी करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याविषयी आदेश काढले. याआधी केवळ स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून त्यांची पडताळणी केली जात असे; पण आता त्यांचे नमुनेही पडताळण्यात येणार आहेत. खरेतर कायद्यात तशी तरतूद असतांनाही आतापर्यंत तसे झाले नाही.  (गेली १५ वर्षे या संदर्भातील कायद्याची कार्यवाही न करणार्‍या अधिकार्‍यांवरच कारवाई करणे अपेक्षित आहे. – संपादक)  प्रशासनाच्या प्रयोगशाळेत अशी पडताळणी न झाल्याने, तसेच सुविधांचा अभाव असल्यामुळे खासगी प्रयोगशाळेत हे नमुने पडताळणीसाठी पाठवले जाणार आहेत.  (प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील असुविधा तातडीने दूर करायला हव्यात ! – संपादक)

 थेट कर्ज योजनेसाठी अर्ज आमंत्रित

  थेट कर्ज योजनेसाठी अर्ज  आमंत्रित   परभणी ,  दि.  22   :-  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून  2022-23  या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांकडून  20  डिसेंबरपर्यंत कर्ज प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत   असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रकांत साठे यांनी केले आहे.              जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुकांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हे अर्ज मागविण्यात येत असून ,  यासाठी त्यांना  40  लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदाराचे वय  18  वर्षे पूर्ण व  50  पेक्षा जास्त नसावे. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसावे. आणि त्याने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराने अर्ज तीन प्रतींमध्ये मूळ कागदपत्रांसह  प्रत्यक्ष  उपस्थित राहून दाखल करावा.   इच्छुक अर्जदारांन ी   योजनेच्या अटी व शर्थी आणि अधिक माहितीसाठी 28  नोव्हेंबर ते  20  डिसेंबर  2022  पर्यंत सकाळी  10  ते सायंकाळी  5  वाजेपर्यंत साहित्यरत्न अण्ण

जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित

  जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित परभणी ,  दि. 22 :  जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय, कारेगाव नाका, सुपर मार्केट जवळ, परभणी येथून घर नं. 147, शांतीनिकेतन, शिवाजी नगर, योग साधना केंद्राच्या बाजूला, परभणी येथे  स्थलांतरित झाले आहे, असे  महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, परभणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगारांसाठी शनिवारी रोजगार मेळावा

  सुशिक्षित बेरोजगारां साठी  शनिवारी   रोजगार मेळावा परभणी ,  दि.  22  :  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,  प्रधानमंत्री कौशल्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शनिवारी (दि.  26 ) सकाळी साडेनऊ वाजता प्रधानमंत्री कौशल्य केंद्र पॉलिटेक्निक वर्कशॉप श्री शिवाजी महाविद्यालय परिसर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास विविध नामांकित कंपनीतील उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून सदर रोजगार मेळाव्यामध्ये युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त  प्र.सो. खंदारे यांनी केले आहे.  या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी  www.mahaswayam.gov.in     या  संकेतस्थळावर  नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ९८९०८२८७९७ ,  ९८६००१५३८३ आणि ९६२३०२०९३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून  सोनपेठ, पाथरी, मानवत येथील आरोग्य यंत्रणेचा आढावा

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून  सोनपेठ, पाथरी, मानवत येथील  आरोग्य यंत्रणेचा आढावा परभणी ,  दि.  22  :-   कोविड काळात जिल्ह्यात आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात आली होती. कोविडअंतर्गंत जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या वैद्यकीय संसाधने, यंत्रसामुग्री आणि आरोग्य सुविधांचा उपयोग व मनुष्यबळाचा वापर नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी होत आहे की नाही, याबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज भेट देत यंत्रणेच्या प्रत्यक्ष वापराबाबत पाहणी केली. आज पहिल्या दिवशी सोनपेठ, पाथरी आणि मानवत येथील ग्रामीण रुग्णालयांची त्यांनी तपासणी केली. तसेच वैद्यकीय यंत्रणेकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेचाही त्यांनी आढावा घेतला.               उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, सोनपेठचे तहसीलदार सारंग चव्हाण, पाथरीच्या तहसीलदार श्रीमती प्रतिभा थेटे, सोनपेठचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत चव्हाण, पाथरीचे डॉ. सुमंत वाघ, मान

ब्रिटिशांनी आपली समृद्ध शैक्षणिक परंपरा नष्ट करून आपल्यात न्यूनगंड निर्माण केला ! – डॉ. प्रभाकर मांडे, ज्येष्ठ लोकसाहित्यकार

  ब्रिटिशांनी आपली समृद्ध शैक्षणिक परंपरा नष्ट करून आपल्यात न्यूनगंड निर्माण केला ! – डॉ. प्रभाकर मांडे, ज्येष्ठ लोकसाहित्यकार पुणे –  भारताला समृद्ध अशी शैक्षणिक परंपरा होती; परंतु ब्रिटिशांनी ही परंपरा नष्ट केली आणि आपल्यात न्यूनगंड निर्माण केला. हा सगळा इतिहास वाचण्याची आवश्यकता आहे. नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला विद्येच्या परंपरेला जागे करण्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे. त्यादृष्टीने धोरणाकडे पहायला हवे, असे मत ज्येष्ठ लोकसाहित्यकार डॉ. प्रभाकर मांडे यांनी व्यक्त केले. चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने लोकसाहित्याचे लेखन केलेल्या डॉ. मांडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्र सरकारच्या सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, पुरातत्वशास्त्राचे तज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रंगसंमेलनात या पुरस्काराचे वितरण झाले. संपादकीय भूमिका भारतियांनो, ब्रिटिशांनी नष्ट केलेली आपली शैक्षणिक परंपरा समृद्ध होण्यासाठी प

बलून (फुगे) सोबत यंत्र आढळून आल्यास माहिती द्यावी

Image
 संशोधनासाठी सोडलेले बलून्सची माहिती देण्याचे आवाहन   परभणी, दि. 21 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान अवकाशात 10 बलून फ्लाईट्स सोडण्यात येत आहेत. या बलून्समध्ये वैज्ञानिक उपकरणे असून काही दिवसानंतर ती रंगीत पॅराशुटसह परभणी जिल्ह्यात जमिनीवर पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या उपकरणांना स्पर्श करू नये किंवा कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. अशी उपकरणे आढळून आल्यास जवळचे पोलीस ठाणे, टपाल कार्यालय, स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनास संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांनी केले आहे. परभणी जिल्ह्याशिवाय औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर येथेही ही उपकरणे जमिनीवर आढळून येऊ शकतात. अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बलून फॅसिलिटीमधून फुगे सोडले जात आहेत. हे