Posts

Showing posts from February, 2024

लोकमान्य नगर मधील श्री शनी मंदिर जीर्णोधार कार्य पूर्ण

Image
लोकमान्य नगर मधील श्री शनी मंदिर जीर्णोधार कार्य पूर्ण सुशोभीकरण कार्य मध्ये विशेष सहभाग बद्दल परभणी विधानसभा आमदार डॉ राहुल पाटील यांचा मंदिर संस्थान वतीने जाहीर सत्कार करण्यात आला परभणी (प्रतिनिधी ) - येथील लोकमान्य नगर श्री शनी मंदिर चे जीर्णोधार कार्य गेली सहा महिने पूर्वी सुरु करण्यात आले होते. लोकमान्य नगर श्री शनी मंदिर जीर्णोद्धार कार्य पूर्ण झाले त्यानिमित्ताने आज दि 09 फेब्रुवारी सायं 7 वा जीर्णोद्धार कार्यात तन मन धन रूपाने सेवा देणारे भाविक भक्त यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम मध्ये परभणी विधानसभा आमदार डॉ राहुल पाटील यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला मंदिर सुशोभीकरण कार्य करिता आमदार डॉ पाटील यांनी विशेष योगदान केले होते.मंदिर संस्थानचे वतीने सर्वांचा शाल श्रीफल पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी श्री शनी मंदिर संस्थानचे अध्यक्ष नितीन पारवेकर, प्रा.जयप्रकाश गायकवाड , सुरेश फड, सुधाकर सिंग,शिवा चव्हाण, संजय ठकारे, रमेश चांदिवाले, संतोष पाठक, भारत कुलकर्णी, महेश सावंत, प्रकाश पाटील,जगन्नाथ घोडके,गजानन पिसे, प्रहलाद जाधव, रितेश जैन