Posts

Showing posts from September, 2026

चला मराठा बांधवांनो कुणबी प्रमाण पत्र घ्यायला

Image
  परभणी जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्रासाठी १० ते १७ सप्टेंबर दरम्यान विशेष शिविरांचे आयोजन; जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन ​ परभणी: जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांच्या निर्देशांनुसार परभणी जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र जलद गतीने मिळण्यासाठी मंडळ स्तरावर १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान विशेष शिविरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिविरांचा लाभ सर्व पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे (प्रेसनोट) केले आहे. ​ विविध तालुक्यांतील शिविरांचे वेळापत्रक व ठिकाणे ​ परभणी: टाकळी कु., झरी,ेडगाव, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी, जांब, परभणी शहर/ग्रामीण (दि. ११/०९/२०२६) ​ गंगाखेड: मरडसगाव (१०/०९/२०२६), महातपुरी (११/०९/२०२६), माखणी (१२/०९/२०२६), पिंपळदरी (१३/०९/२०२६), राणीसावरगाव (१५/०९/२०२६) ​ पूर्णा: ताडकळस, लिमला, चुडावा (१०/०९/२०२६), पूर्णा, कातनेश्वर, कावलगाव (११/०९/२०२६) ​ पालम: पालम (पुंयणी), चाटोरी (१०/०९/२०२६), पेठशिवणी (भोगाव) (११...

महाराष्ट्र शासनाचा ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ वेदमूर्ती उमेश अनंतमहाराज टाकळीकर यांना जाहीर

  महाराष्ट्र शासनाचा ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ वेदमूर्ती उमेश अनंतमहाराज टाकळीकर यांना जाहीर ​ परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी) :  प्राचीन भारतीय संस्कृती, वेदविद्या आणि गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या पुनरुज्जीवनासाठी गेली चार दशके अविरत योगदान देणारे श्रीसद्गुरू वेंकटेश दाजीमहाराज संस्थान (श्रीक्षेत्र टाकळी) चे संस्थानाधिपती वेदमूर्ती श्री. उमेश अनंतमहाराज टाकळीकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ (वेदमूर्ती विभाग) जाहीर झाला आहे. या घोषणेने संस्कृत आणि वैदिक वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ​ चार दशकांचे ऋषितुल्य योगदान वेदमूर्ती उमेश महाराज यांनी गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ वेदाध्यापन, गुरुकुल उभारणी, गोरक्षण आणि विविध धार्मिक-सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. ऋग्वेद संहिता, शिक्षा चतुष्टय, अष्टाध्यायी, तर्कसंग्रह, ऐतरेय ब्राह्मण, आरण्यक, पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ, घनपाठ यासह श्रौत, निरुक्त, गृह्यसूत्र व ऋग्वेद कर्मकांड अश...