Posts

Showing posts from April, 2026

नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा

Image
परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण १ ते १५ मे या कालावधीत स्वगणना मोहिम स्वगणनेसाठी लिंक se.census.gov.inही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय आहे परभणी, दि. १६  (टिळक रत्न प्रतिनिधी) -- भारत सरकारकडून देशाची १६ व्या जनगणनेच्या कामास सुरुवात झालेली असुन या जनगणनेमध्ये यावेळी 'डिजिटल सेन्सस' आणि 'स्व-गणना' ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण, शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती स्व-गणने‌द्वारे भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. स्व-गणनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. प्रारंभी  दि. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्व-गणना मोहिमेबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली.     *स्व-गणना म्हणजे काय ? -* आपण स्वतः आपल्या मोबा...