Posts

Showing posts from June, 2020

खरीप हंगामातील पिक कर्ज वाटप बाबत बँकांना आता दररोज ऑनलाईन प्रणाली द्वारे अहवाल सादर करावे लागणार

Image
खरीप हंगामातील पिक कर्ज वाटप बाबत बँकांना आता दररोज ऑनलाईन प्रणाली द्वारे अहवाल सादर करावे लागणार परभणी (प्रतिनिधी):-  खरीप हंगाम 2020 पिककर्ज साठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करावयाचे पीककर्ज वाटप तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बँकांमार्फत करावयाचे कर्ज वाटप याविषयी सहकार आयुक्तालय मार्फत आढावा घेण्यात आला त्यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना 16626 लक्षाचा लक्षांक उद्दीष्ट देण्यात आले होते त्यात मध्ये 12382 लक्षषांक 74% उद्दिष्ट साध्य केले आहे  यामुळे आढावा परिषदेच्या आदेशाने असे सांगितले गेले आहे की शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी योजनेचा मिळालेला नाही अश्या शेतकऱ्यांना बॅंकांनी थकबाकीदार न समजता खरीप हंगामामध्ये पिककर्ज पिककर्ज वाटप करावे याकरीता शेतकरी बांधवानी आपल्या खाते असलेल्या बँकेशी सम्पर्क साधावा व पि एम किसन कार्ड करिता अर्ज भरून द्यावा असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले होते त्या नंतर  शेतकरी वर्गाकडून खरीप हंगाम पीक कर्ज करिता बँक कर्मचारी चालढकल करत असल्याचे तक्रारी प्राप्त होऊ ल

आता जर सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क/रुमाल न वापरल्यास दंड तर होईलच सोबत सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याचा गुन्हा देखील दाखल होईल-सावधान

Image
टिळक रत्न बातमीचा इम्पॅक्ट प्रशासनाने दिले सक्त कारवाईचे आदेश  आता जर सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क/रुमाल न वापरल्यास दंड तर होईलच सोबत सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याचा गुन्हा देखील दाखल होईल-सावधान परभणी (प्रतिनिधी):- टिळक रत्न ने काल दि 27 जून रोजी एक बातमी प्रसारित केली होती की परभणीत छोट्या मोठ्या व्यवसायिक लोकांना मास्क/रुमाल बांधायची एलर्जी आहे की काय असे वृत्त प्रसारित केले होते आज याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने सक्त करवाईचे आदेश जारी केले आहेत आधी केवळ मनपा च्या वतीने किरकोळ स्वरूपात कारवाई करण्यात येत होत्या आणि मास्क/रुमाल न वापरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल केला जात होता पण आता गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे यात पोलीस प्रशासन देखील कारवाईत पुढे असणार आहेत  ज्यात यापुढे कोणीही विना मास्क/रुमाल तोंडावर सार्वजनिक ठिकाणी येईल अशांना पहिले 200 रु व दुसरे वेळी असे वागल्यास 500 रु दंड आनि परत असेच वागल्यास सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याचा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे  त्यामुळे आता तरी नागरिकांनी व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी यापुढे जागरूक राहून सार्वजनिक ठिकाणी मास्

परभणीत छोट्या-मोठया व्यावसायिकांना मास्कची ऍलर्जी ?

Image
परभणीत छोट्या-मोठया व्यावसायिकांना मास्कची ऍलर्जी आहे का ? परभणी (प्रतिनिधी):- कोरोना विषाणू संसर्ग प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाने सर्व नागरिकांना घराबाहेर पडताना तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधण्याची सक्ती केली आहे . मात्र आज सुद्धा बाजारात अनेक ठिकाणी परभणीतील छोटे मोठे व्यावसायिक तोंडावर मास्क रुमाल न बांधता आपला व्यवसाय आथवा कामे करताना दिसून येत आहेत काही महाभाग ते मास्क हनुवटीवर बांधून ठेवलेले दिसून आले तर काहींनी रुमाल मानेभोवती बांधलेला दिसून आला सॅनिटाईजर बाटली केवळ पाहण्यासाठी अनेक दुकानात अढळून येत नाहीत ते बरेच फळ व भाजी विक्रेते तर चक्क असे म्हणटले की मास्क रुमाल तोंडावर बांधला तर आम्हाला जोरात ओरडून भाजी किंवा फळ विक्री करताना अडचण येते काही तर केवळ नुसता कपडा तोंडावर झाकतात जर आपण मास्क किंवा रुमाल बांधयला सांगितलं तर ह्या अश्या हलगर्जी पणामुळे त्याच्या पासून अथवा त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे परभणी मनपाची प्रशासनाद्वारे सार्वजनिक ठिकाणी मास्क रुमाल न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरू आहे ती पण केवळ देखाव्यापुरती आहे की काय असेच

खरीप हंगामातील पिक कर्ज वाटप वितरण चालू झाले आहे बँकांशी सम्पर्क करावा

Image
खरीप हंगामातील पिक कर्ज वाटप वितरण चालू झाले आहे बँकांशी सम्पर्क साधावा परभणी (प्रतिनिधी):- खरीप हंगाम 2020 पिककर्ज साठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करावयाचे पीककर्ज वाटप तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बँकांमार्फत करावयाचे कर्ज वाटप याविषयी सहकार आयुक्तालय मार्फत आढावा घेण्यात आला त्यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना 16626 लक्षाचा लक्षांक उद्दीष्ट देण्यात आले होते त्यात मध्ये 12382 लक्षषांक 74% उद्दिष्ट साध्य केले आहे  यामुळे आढावा परिषदेच्या आदेशाने असे सांगितले गेले आहे की शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी योजनेचा मिळालेला नाही अश्या शेतकऱ्यांना बॅंकांनी थकबाकीदार न समजता खरीप हंगामामध्ये पिककर्ज पिककर्ज वाटप करावे याकरीता शेतकरी बांधवानी आपल्या खाते असलेल्या बँकेशी सम्पर्क साधावा व पि एम किसन कार्ड करिता अर्ज भरून द्यावा असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे

परभणीत फेरफार नक्कल बाबत शेतकरयां मध्ये संभ्रम

परभणीत पीक कर्ज साठी फेरफार नक्कल बाबत शेतकरीवर्गात संभ्रम परभणी (प्रतिनिधी):- राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायचे घोषित केले आणि शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत आपापले पीक कर्ज मागणी अर्ज घेऊन दाखल होत आहेत. सदरील पीक कर्ज मागणी अर्जात आवश्यक कागदपत्रे जुळवा जुळव करून अर्ज दाखल करावी लागतात ज्यात शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड,सातबारा ,नमुना नं 8 अ ,फेरफार नक्कल, सोबत असल्यास पॅनकार्ड अशी सर्व कागद पत्रे जोडून बँकेत अर्ज करावा लागतो, यात फेरफार नक्कल प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात जावे लागते अर्ज देऊन नककलची मागणी करावी लागते आता शेतकरी तहसील मध्ये गेल्यास तेथील अधिकारी कोरोना चे संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नका असे सांगतात पण ही नक्कल सर्वाना कर्जा करिता आवश्यक आहे तर सर्व शेतकरी लोकांची एकाचवेळी गर्दी होणे सहाजिक आलेच तसेच  तहसील प्रशासनाने थेट आदेश काढला आहे की बँकेने सध्याच्या कोविड काळात कर्ज खातेदारास फेरफार नक्कलकरीता आग्रह करू नये सदरील सर्व खातेदाराची फेरफार नक्कल ची प्रत बँकांना पोहचती करण्यात आल्या आहेत असे नमूद असलेले  न्यायदंडाधिकारी तथा अध्यक्ष यांच्या

गणेश भक्तांवर सूडबुद्धीने हद्दपारीची कारवाई - गणेश मंडळच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिले नुकसानभरपाई पोटी 10 हजार रुपये

Image
गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांचेवर सूडबुद्धी ने  हद्दपारी कारवाई केल्याने...अखेर हानीभरपाईपोटी पोलीस-प्रशासनाने गणेश मंडळ कार्यकर्त्यांना  दिलेे 10 हजार रुपये !  नंदुरबार 11 मे (वृत्तसंस्था) :-   नंदुरबार येथे गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाने बोलवलेल्या बैठकीत ‘वेळेत गणेश विसर्जन न झाल्यास थेट गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना पोलीस दलाच्या वतीने देण्यात आल्या होत्या यावेळी बैठकीस आलेल्या गणेश उत्सव मंडळाचे काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी प्रतिप्रश्न केले  ‘तुम्ही न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करणार असाल, तर त्याचप्रमाणे पहाटे 5 वाजता मशिदींवर वाजणार्‍या अवैध भोंग्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार का?’, असा रास्त प्रश्‍न गणेश मंडळे यांनी विचारला होता. त्यावर तत्कालीन नंदूरबारचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन यांनी सुडबुद्धीने कारवाई करत 77 जणांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई केली. या अन्याय्य कारवाईच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आणि मयुर चौधरी यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सत्र

मॉर्निगवॉक करिता विद्यापीठ चे गेट उघडता का ..

काळीकमानीचे गेट बंद पहारा लावला पण  विद्यापीठाचे गेट लगत अतिक्रमण बसलेले विद्यापीठ प्रशासनास कसे दिसत नाही - मॉर्निग वॉक करणारे लोक व ग्रामीण भागातील लोकांना जाणे येणे झाले कठीण परभणी,दि.10(प्रतिनिधी) - कोरोना विषाणुुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वसमत रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वार(काळीकमान) बंद केले व पहारेकरी बसवले ते गेट आज दि 10 जून रोजी पर्यंत खुले केले गेलेले नाही.  पण ह्याच सुरक्षेसाठी लावलेल्या पहारेकरी लोकांना अथवा विदयापीठ प्रशासनाला गेट बाहेर बसलेले अतिक्रमण कसे काय चालते ही समजण्या पलीकडले झाले आहे, कोरोना मुळे गेट जवळील भाजीपाला विक्री करणे बंद केले होते पण हे भाजी विक्रेते परत येऊन बसले आहेत ही बाब विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकारी वर्गाला का दिसली नाही तसेच हे अतिक्रमण मनपाने सुद्धा सोयीस्कर डोळेझाक केल्याचे दिसते. आज गेट बंद आहे तर काही अधिकारी ओरड करत आहेत की आम्हाला दुरून जावे लागते मग गेट बाहेर भिंती लगत अतिक्रमण बसू न देणे ही जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण होतो. कृषी विद्यापीठाचे कुलसचिव रणजीत पाटील हे धडा

नवीन नळ कनेक्शन साठी मनपा आपल्या दारी उपक्रम - मनपाने जुन्या सर्व नळ धारक यांना मनपा वतीने थेट जोडनी द्यावी नागरिकांची अपेक्षा

Image
जून्या जलवाहिन्या हळू हळू करण्यात येणार आयुक्त देविदास पवार यांची माहितीः नवीन कनेक्शनसाठी मनपा आपल्या दारी उपक्रम जुन्या नळधारकाना मनपाने स्वतःहून जोडणी द्यावी व त्यांचेकडून जोडणी झाल्यावर पैसे वसूल करावेत परभणी, दि.8(प्रतिनिधी)- महानगरपालिकेतंर्गत  युआयडीसी  व अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसह जलवाहिन्या अंथरण्याचे काम पूर्ण झाले असून आता नवीन जलवाहिन्यांद्वारेच, नवीन कनेक्शनद्वारेच शहरवासियांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. हळूहळू जुन्या जलवाहिन्या वापरासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त देविदास पवार यांनी दिली. कोरोना काळात नागरिकांकडून अशी मागणी होत आहे की जुने नळ कनेक्शन ज्यांचे कडे आहेत व ज्यांनी वेळेवर नळ पट्टी व घरपट्टी नियमित भरली आहे व भरतात अशांना मनपा ने स्वतः जोडणी द्यावी व त्याचे लागलेले खर्च नळधारकाकडून नन्तर वसूल करावा अशाने सर्व नळ जोडण्या त्वरित पूर्ण होतील अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे  

भविष्य निर्वाह निधीचे प्राधिकार पत्र खुले करा - शिक्षकांची मागणी

Image
भविष्य निर्वाह निधीचे प्राधिकार पत्र खुले करा - शिक्षकांची मागणी परभणी, दि. ६ (प्रतिनिधी) - भविष्य निर्वाह निधी चे खात्याचे "बीडीएस" (प्राधिकार पत्र) बंद केल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह सेवा निवृत्तांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे   शिक्षकांचे काही घरगुती तातडीचे कामास पैसे लागत असून ते खात्यात शिल्लक असताना देखील केवळ प्राधिकार पत्र देणे बंद असल्याने खात्यावरील रक्कम मिळत नसल्याने शिक्षक संघटनेने सदरील भविष्य निर्वाह निधी मधून पैसे काढण्यास प्राधिकार पत्रे खुली करून शिक्षकांना दिलासा द्यावा हे खाते तात्काळ खुले करण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघाने शासनाकडे केली आहे.        मराठवाडा शिक्षक संघ चे जिल्हा अध्यक्ष प्राचार्य भगवान पुर्णे असे म्हणाले की, राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते शासनाकडे असते. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा रक्कम कपात करून या भ. नि. नि. च्या खात्यात वेतन पथकामार्फत जमा केली जाते. कर्मचाऱ्यांच्या आडचणीच्या प्रसंगी म्हणजे विवाह, आजारांवरील उपचार, प्लॉट - घर खरेदी, मुलांचे शिक्षण वग