मॉर्निगवॉक करिता विद्यापीठ चे गेट उघडता का ..

काळीकमानीचे गेट बंद पहारा लावला पण 
विद्यापीठाचे गेट लगत अतिक्रमण बसलेले विद्यापीठ प्रशासनास कसे दिसत नाही - मॉर्निग वॉक करणारे लोक व ग्रामीण भागातील लोकांना जाणे येणे झाले कठीण

परभणी,दि.10(प्रतिनिधी) - कोरोना विषाणुुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वसमत रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वार(काळीकमान) बंद केले व पहारेकरी बसवले ते गेट आज दि 10 जून रोजी पर्यंत खुले केले गेलेले नाही. 
पण ह्याच सुरक्षेसाठी लावलेल्या पहारेकरी लोकांना अथवा विदयापीठ प्रशासनाला गेट बाहेर बसलेले अतिक्रमण कसे काय चालते ही समजण्या पलीकडले झाले आहे, कोरोना मुळे गेट जवळील भाजीपाला विक्री करणे बंद केले होते पण हे भाजी विक्रेते परत येऊन बसले आहेत ही बाब विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकारी वर्गाला का दिसली नाही तसेच हे अतिक्रमण मनपाने सुद्धा सोयीस्कर डोळेझाक केल्याचे दिसते.
आज गेट बंद आहे तर काही अधिकारी ओरड करत आहेत की आम्हाला दुरून जावे लागते मग गेट बाहेर भिंती लगत अतिक्रमण बसू न देणे ही जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण होतो.
कृषी विद्यापीठाचे कुलसचिव रणजीत पाटील हे धडाडीचे निर्णय घेतात अशी चर्चा चालली आहे मग ते सुद्धा गेट जवळील अतिक्रमण बाबत गप्प कसे .
हे गेट बंद असल्याने विद्यापीठ मार्गाने लोहगाव बलसा सायाळा जवळील तीन चार खेड्यातून नागरिकांना येणे जाणे करणे कठीण होऊन बसले आहे ह्या भागातील लोकांना लांबून फिरून शहरात यावे लागते आहे. असे असतांना कुलसचिव पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकले.व तेथे पहारेकरी बसवले व तेथून य्े-जा करण्यास पुर्णतः बंदी घातली. त्याचे अधिकारी, कर्मचा-यांनी स्वागत केले खरे. परंतू कुलसचिव पाटील मग त्यांनी गेट जवळील अतिक्रमण देखील परत कसे बसू दिले ते त्वरित काढून टाकन्यास का राजी होत नाहीयेत हे अनाकलनीय आहे
त्यामुळे असल्या बोटचेपी धोरणामुळे अधिकारी, कर्मचा-यांना आता दोन किमी पर्यंत आंतरकापून विद्यापीठात ये-जा करावी लागत आहे. यात मॉर्निगवॉक करणा-यां व्यक्तींवरच निर्बंध आले आहेत असे दिसते. त्यामुळे प्रशासनाने केवळ मॉर्निगवॉकला येणा-व्यक्तींवरच दिर्घकाळ निर्बंध न लादता इतर सर्व बाबतीत पण विद्यापीठ प्रशासनाने कडक धोरणं राबवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन