Posts

Showing posts from May, 2024

विद्यापीठाचे ऐम्बेसेडर तर मेहनती शेतकरी -कुलगुरू डॉ इंद्रमणी

Image
 विद्यापीठाचे राजदूत हें मेहनती शेतकरी आहेत कुलगुरु डॉ. इंद्रमणि   परभणी,दि.04(प्रतिनिधी) : मेहनती शेतकरी हे विद्यापीठाचे राजदूत आहेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी केले. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वनामकृवि येथील सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि कानसूर येथील प्रगतशील शेतकरी हभप अच्युत महाराज शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी तालुक्यातील मौजे कानसूर येथे ‘किसान गोष्टी’ कार्यक्रइंद्रमाणी माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रगतशील शेतकरी नागोरावजी आरबाड हे होते. कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, प्राचार्य डॉ. विश्‍वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. पी.एच. वैद्य, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. कलालबंडी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून तसेच योग्य आच्छादन आणि ठिबक सिं