Posts

Showing posts from March, 2022

सिनेट निवडणूक जिंकण्यासाठी युवसैनिकांना सज्ज व्हा : वरुण सरदेसाई 

Image
सिनेट निवडणूक जिंकण्यासाठी युवसैनिकांना सज्ज व्हा : वरुण सरदेसाई    औरंगाबाद / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट निवडणूक युवासेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यामुळे आतापासून पूर्वतयारी सुरू झाली असून तळागाळातील युवक शिवसेना युवासेना यांच्याकडे आशेने पाहत आहे. त्यामुळे येणाऱ्या सिनेट निवडणूक जिंकण्यासाठी युवसैनिकांना सज्ज व्हा. असे आवाहन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी निश्चय मेळाव्यात मंगळवारी केले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन करतांना शिवसेना हा चळवळीतुन निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे सहकार, शिक्षण, आरोग्य, रोजगार, आदीसह अनेक क्षेत्रात जबरदस्त कामगिरी करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाप्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना राज्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शिवसैनिक व युवासैनिक हे एक दिलाने काम करून विद्यापीठावर भगवा फडकवू असे सांगितले. यावेळी युवासेना कोषाध्यक्ष अमेय घोले, माजी उपमहापौर उपसचिव राजेंद्र जंजाळ, नगरसेवक ऋषिकेश खैरे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, विभा

दोन वर्ष जनसेवेची, 'महाविकास' आघाडीची, लोककलेच्या माध्यमातून आजपासून जिल्ह्यात होणार जागर 

Image
 दोन वर्ष जनसेवेची, 'महाविकास' आघाडीची, लोककलेच्या माध्यमातून आजपासून जिल्ह्यात होणार जागर   औरंगाबाद / प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी शासनमान्य यादीवरील लोककला पथकांमधील तीन पथकांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास' आघाडीची’ या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शासनमान्य यादीवरील 22 लोककला पथकांना पटकथेसह सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. त्यातील शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, औरंगाबाद, भारूडरत्न निरंजन भाकरे आणि मंडळ, मु. पो. रहिमाबाद, ता. सिल्लोड आणि लोकजागृती बहुउद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था, औरंगाबाद या लोककला पथकांची पथनाट्य सादरीकरणासाठी औरंगाबाद जिल्ह्यासाठी निवड केली आहे. 9 मार्च, 2022 पासून

ओबीसी समाजास राजकारणातून हद्दपार करण्याचा सरकारचा डाव : आ. अतुल सावे

Image
 ओबीसी समाजास राजकारणातून हद्दपार करण्याचा सरकारचा डाव : आ. अतुल सावे   प्रतिनिधी / औरंगाबाद राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचा कुटिल डाव अमलात आणण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक न्यायालयासमोर त्रुटी असलेला तपशील सादर केला, असा थेट आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणिस आमदार अतुल सावे यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने, ठाकरे सरकारचा ओबीसी समाजाविरुद्धचा आकस स्पष्ट झाला आहे. पुढील पाच वर्षे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व राहू नये यासाठीच सरकारने वारंवार चालढकल केली, अशी टीकाही त्यांनी केली. ओबीसी समाजाच्या मागासलेपणाचा इंपिरिकल डेटा देण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारच्या आयोगाचीच होती. पण सरकारने सव्वादोन वर्षांत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले नाहीच. उलट आपल्या नाकर्तेपणाचे अपयश केंद्र सरकारवर ढकलण्याचे राजकारण केले, असेही ते म्हणाले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम करण्यासाठी दोन महिन्यात इंपिरिकल डेटाचे काम