सिनेट निवडणूक जिंकण्यासाठी युवसैनिकांना सज्ज व्हा : वरुण सरदेसाई 

सिनेट निवडणूक जिंकण्यासाठी युवसैनिकांना सज्ज व्हा : वरुण सरदेसाई 



 औरंगाबाद / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट निवडणूक युवासेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यामुळे आतापासून पूर्वतयारी सुरू झाली असून तळागाळातील युवक शिवसेना युवासेना यांच्याकडे आशेने पाहत आहे. त्यामुळे येणाऱ्या सिनेट निवडणूक जिंकण्यासाठी युवसैनिकांना सज्ज व्हा. असे आवाहन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी निश्चय मेळाव्यात मंगळवारी केले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन करतांना शिवसेना हा चळवळीतुन निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे सहकार, शिक्षण, आरोग्य, रोजगार, आदीसह अनेक क्षेत्रात जबरदस्त कामगिरी करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाप्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना राज्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शिवसैनिक व युवासैनिक हे एक दिलाने काम करून विद्यापीठावर भगवा फडकवू असे सांगितले. यावेळी युवासेना कोषाध्यक्ष अमेय घोले, माजी उपमहापौर उपसचिव राजेंद्र जंजाळ, नगरसेवक ऋषिकेश खैरे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, विभागीय सचिव निखिल वाळेकर, अभिमन्यू खोतकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर महापौर नंदकुमार घोडेले, युवासेनेचे अक्षय ढोबळे, अविनाश खापे, सिनेट सदस्य सुप्रिया करंडे, योगेश निमसे, चेतन नाईक, कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल, जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, किशोर चौधरी, कैलास जाधव, मॅचिंद्र देवकर, भाऊसाहेब घुगे, सागर बहिर, भाविसे विद्यापीठ सदस्य तुकाराम सराफ, नगरसेवक सिध्दांत शिरसाठ, युवती सेनेच्या अश्विनी जैस्वाल, पूजा घुगे, सरचिटणीस किरण तुपे, मिथुन व्यास, नारायण सुरे आदीची व्यासपीठावर उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन