Posts

Showing posts from December, 2022

कोरोनाच्या नव्या लाटेशी सामना करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज

Image
कोरोनाच्या नव्या लाटेशी सामना करण्यास मनपा सज्ज, मनपा आयुक्तांनी घेतला रुग्णालयांचा आढावा   परभणी, दि 27 चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर संपूर्ण देशभरात प्रशासन सतर्क झाले असून परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने देखील नवीन लाटेशी सामना करण्यासाठी कोविड परिस्थितीशी सामना करण्‍यासाठी पूर्व तयारी म्‍हणून आज दिनांक २७.१२.२०२२ रोजी परभणी शहर महानगरपालिकेच्‍या आयुक्‍त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर व नोडल अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास जगताप यांनी कोव्हिड डेडिकेटेड हॉस्‍पीटलची पाहणी केली. पाहणी मध्‍ये कोव्हिड डेडिकेटेड हॉस्‍पीटल मधील उपाययोजनांची पाहणी केली. आज रोजी परभणी शहरात महापालिकेच्‍यावतीने कल्याण मंडमप् याठिकाणी, तसेच लाईफ लाईन हॉस्‍पीटल, स्‍वाती क्रिटीकेअर हॉस्‍पीटल व सुर्या हॉस्‍पीटल येथे कोव्हिड केअर सेंटर उभारण्‍यात आल्‍याची माहिती आयुक्‍त्त तृप्‍ती सांडभोर यांनी दिली. यापैकी महानगरपालिके मार्फत कल्‍याणमंडपम् येथे उभारण्‍यात येत असलेल्‍या कोव्हिड केअर सेंटर व Oxygen Plant ची पाहणी करण्‍यात आली. कल्‍याणमंडपम् येथील कोव्हिउ क