Posts

Showing posts from June, 2026

परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा 'फार्स'; भेसळ माफिया बिनधास्त!

Image
परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा केवळ 'फार्स'; भेसळ माफिया बिनधास्त! आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतरही परभणीत संथ कारवाया; सहाय्यक आयुक्त चौधरी यांनी गांभीर्याने मोहीम राबवण्याची नागरिकांची मागणी कारवाई केल्याचे मिडीयाला सांगू नका असे देखील मिळाली माहिती सोमवारी अन्न व औषधी प्रशासनातील अधिकारी तपासणी करण्यास येणार आहेत अशा एका अफेनेच परभणीतील खिचडी सेंटर बंद ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून आले , यातून एक चर्चा देखील समोर आली की ह्यांना कसं काय कळाले की तपासणी होणार आहे परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी)- राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) आयुक्तपदाची धुरा धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांभाळल्यापासून विभागाला शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यांच्या पदभार स्वीकारानंतर परभणी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामार्फत आत्तापर्यंत १६ ठिकाणी कारवाया करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, या कारवाया केवळ ‘आम्ही काहीतरी करतोय’ हे दाखवण्यापुरत्याच म्हणजेच केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याचा सूर परभणीकरांमधून उमटत आहे. जिल्ह्यात अन्नप...