Posts

Showing posts from July, 2021

महाराष्ट्र राज्य एस एस सी बोर्डाचा निकाल जाहीर : नेहमी प्रमाणे मुलींनी बाजी मारली

Image
दहावीचा निकाल 99.95 टक्के, नेहमीप्रमाणे मुलींचीच बाजी, 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण दहावीच्या परिक्षेत कोकणाची बाजी; राज्यात सर्वाधिक १०० टक्के निकाल  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल विद्यार्थ्यांना आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत राज्यातल्या निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे, तो म्हणजे ९९.८४ टक्के. या निकालासाठी एकूण ७२ विषयांचं मूल्यमापन करण्यात आलं. त्यापैकी २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत दिली आहे.राज्यातल्या इतर विभागांचा निकाल खालीलप्रमाणे (निकालाची टक्केवारी)- पुणे ९९.९६, नागपूर ९९.८४, औरंगाबाद ९९.९६, मुंबई ९९.९६, कोल्हापूर ९९.९२, अमराव

हिंगोली व नांदेड मध्ये जाणवले भूकंप चे सौम्य धक्के...परभणी सुरक्षित

Image
हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जाणवले भूकम्पाचे भूगर्भातून आवाजासहित सौम्य धक्के रवीवार दि 11 जुलै 2021 रोजी सकाळी साडेआठ च्या सुमारास हिंगोली व नांदेड जिल्ह्यात भूकम्पाचे सौम्य हादरे बसले भूगर्भातून आवाजसहित हादरे बसल्याचे नागरिकांनी सांगितले कळमनुरी तालुक्यातील नांदापूर पोतरा देवरा वारंगा फाटा दांडेगाव जवळा पांचाळ वडगाव ह्या परिसरात हादरे जाणवले वसमत औंढा कळमनुरी हिंगोली शहर व नांदेड मध्ये हादरे जाणवले तसेच ह्याबाबत तहसीलदार ह्यांनी लातूर भूकम्प मापक केंद्राशी सम्पर्क केल्याचे सांगितले आहे. सदरील भूकम्पा मुळे सध्या कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचे कळविले आहे.  सदरील हिंगोली व नांदेड ला हादरे बसल्याने बाजूचा जिल्हा परभणी मध्ये नागरिकांतून घबराहट दिसून आल्याने परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ह्यांनी सांगितले की बाजूच्या जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असले तरी परभणी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले नाही किंवा हादरे देखील झालेले नाहित नागरिकांनी अजिबात घाबरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केली आहे. रविवारी यवतमाळ हिंगोली नांदेड या परिसरात काही धक्के जाण