महाराष्ट्र राज्य एस एस सी बोर्डाचा निकाल जाहीर : नेहमी प्रमाणे मुलींनी बाजी मारली

दहावीचा निकाल 99.95 टक्के, नेहमीप्रमाणे मुलींचीच बाजी, 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण दहावीच्या परिक्षेत कोकणाची बाजी; राज्यात सर्वाधिक १०० टक्के निकाल 




कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल विद्यार्थ्यांना आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत राज्यातल्या निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे, तो म्हणजे ९९.८४ टक्के. या निकालासाठी एकूण ७२ विषयांचं मूल्यमापन करण्यात आलं. त्यापैकी २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत दिली आहे.राज्यातल्या इतर विभागांचा निकाल खालीलप्रमाणे (निकालाची टक्केवारी)- पुणे ९९.९६, नागपूर ९९.८४, औरंगाबाद ९९.९६, मुंबई ९९.९६, कोल्हापूर ९९.९२, अमरावती ९९.९८, नाशिक ९९.९६, लातूर ९९.९६, कोकण १००.राज्यातल्या एकूण २२ हजार ७६७ शाळांपैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत हा निकाल ४. ६५ टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात यंदाही दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली असून त्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या २८ हजार ४२४ असून त्यांचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे.✍️ 

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन