Posts

Showing posts from May, 2023

शासन आपल्या दारी' अभियान एक क्रांतिकारी निर्णय : मुख्यमंत्री शिंदे

Image
 कन्नड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ   सुमारे दीड लाख लाभार्थ्यांना ५ हजार ४५७ कोटींच्या निधीचे वाटप  शासन आपल्या दारी' अभियान एक क्रांतिकारी निर्णय : मुख्यमंत्री शिंदे  छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्याने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्ह्यातील कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्य शासनाने सुरु केलेल्या 'शासन आपल्या दारी' अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे , कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, रमेश बोरनारे , उदय सिंग राजपूत, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य

परभणीत कृषी विद्यापीठात खरीप पीक परिसंवाद उत्साहात संपन्न 

Image
परभणीत कृषी विद्यापीठात खरीप पीक परिसंवाद उत्साहात संपन्न  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन ,  मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षाचे औचित्‍य. विस्तार शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचा संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन . परभणी (प्रतिनिधी ) - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन ,  मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षाचे औचित्‍य साधुन विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप पिक परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात  अमेरिकेतील कनेक्‍टीकट विद्यापीठाचे अधिष्‍ठाता तथा संचालक मा प्रा इंद्रजीत चौबे,  गुजरात   येथील बन्‍सी गीर गोशाळेचे अध्‍यक्ष मा श्री गोपालभाई सुतारीया ,  शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले ,  संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर ,  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर ,  कृषि अधिकारी श्री रवि हारणे आदींच्या हस्ते दि पप्रज्वलन व स

सामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू मिळणार - राधाकृष्ण विखे पाटील 

Image
सामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू मिळणार - राधाकृष्ण विखे पाटील  (छ. सं. नगर / प्रतिनिधी ) शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया , अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले शासनाने घरकुल धारकांना मोफत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार असून गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अवैध वाळू उपसा केल्याने होणारी पर्यावरणाची हानी आता या शासकीय वाळू केंद्रामुळे नक्कीच कमी होणार आहे. या उपक्रमात परिवहन विभागाची मह

परभणी येथे 7 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Image
 परभणी येथे 7 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी) - परभणी येथे 7 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.परभणी येथे सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा- 2023 चे आयोजन जिंतूर रोडवरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर 7 मे रोजी करण्यात आले आहे. यामध्ये 35 जोडपे विवाहबद्ध होणार असून सर्व जोडप्याना आयोजक समिती द्वारे 50000 रु पर्यंत चे संसारउपयोगी साहित्य व 20000 धनादेश दिला जाणार आहे आणि सर्व तयारी व नियोजन मध्ये केवळ परभणीतील धर्मदाय संघटना संस्था सहभागी असून कोणातही शासन निधी ह्याकरिता घेण्यात आलेला नाहीये तसेच सदरील सोहळ्यास अंदाजे 5000 नागरिक उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगितले गेले आहे .या विवाह सोहळ्याविषयी विस्तृत माहिती अ‍ॅड किरण दैठणकर यांनी 5 मे रोजी पत्रकार परिषद द्वारे दिली पत्रकार परिषदेस  कृषिभूषण कांतराव काका देशमुख, अ‍ॅड. किरण दैठणकर, भीमराव वायवळ, शरद लोहट, प्रिया ठाकूर डॉ पवन चांडक, अ‍ॅड प्रमोद सराफ, विठ्ठल शहाणे, मनचक वाघ, अ‍ॅड हनुमान अरसुले, नितीन लोहट, आदी उपस्थित होते.