Posts

Showing posts from November, 2021

मराठी न येणाऱ्या जावेद अख्तर ह्यांना मराठी साहित्य संमेलनात बोलवायचेच का - हिंदू जनजागृती समिती

Image
50 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहून ‘मराठी’ न येणार्‍या जावेद अख्तर यांना मराठी साहित्य संमेलनात पायघड्या कशासाठी ?- हिंदु जनजागृती समिती  मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेसाठी कवडीचेही योगदान नसणार्‍यांची वर्णी लागत असल्याने मराठीजनांचा अपेक्षाभंग होत आहे. मराठीजनांच्या विरोधानंतरही हिंदी आणि उर्दु गीतकार जावेद अख्तर यांना साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे म्हणजे मराठीजनांचा अपमानच आहे. जावेद अख्तर हे अर्ध्या शतकाहून अधिक काळ महाराष्ट्र राज्यात अर्थात मराठी भूमीत रहात आहेत; मात्र एवढ्या वर्षांत त्यांनी मराठीच्या हितासाठी कधीही काम केलेले नाही. ते स्वतः देखील इतक्या वर्षांत मराठी भाषा न शिकता उर्दू-हिंदी भाषेतूनच काम करत आहेत. ज्या व्यक्तीला मराठी भाषेचे कुठल्याही प्रकारचे प्रेम नाही, मराठी साहित्यात कोणतेही योगदान नाही, त्यांना मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित करणे अयोग्य आहे. एकीकडे मराठी साहित्यात भरीव योगदान देणारे, भाषाशुद्धीची चळवळ राबवून मराठीला समृद्ध करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा करण्यात येते, तर दुसरीकडे हिंदी आणि उर्दु

एस टी कामगारांनो भरघोस वेतनवाढ केली आहे उद्यापासून कामावर या...विलिनीकरण चे पुढे पाहू

Image
वेतनवाढ केली ...उद्या पासून कामावर या....विलीनीकरनाचे पुढे पाहूया..  एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१% वाढ करण्याचा सरकारचा निर्णय !!  परिवहन मंत्री अनिल परब यांनी नवीन बदल केलेले समोर ठेवले ते पुढील प्रमाणे १२००० रूपयांवर काम करत असलेल्या १ ते १० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये पगारवाढ. •११ ते २० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ४ हजार रुपये पगारवाढ •आज ज्या कर्मचाऱ्यांना १७ हजार पगार भेटतोय त्यांचा पगार २४ हजार रुपये होणार. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता मिळणार. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला १० तारखेच्या आत होणार. सर्व निलंबित कर्मचाऱ्यांचं निलंबन आणि सेवा समाप्ती रद्द केली जाणार. महामंडळाचं उत्पन्न वाढलं तर ड्रायव्हर आणि वाहकांना इन्सेंटिव्ह मिळणार. उद्या सकाळी ८ वाजल्यापासून कामावर रूजू होण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन. एसटी महामंडळाच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ करणारं हे पहिले सरकार आहे राहिला प्रश्न विलिनीकरण चा तर समिती अहवाल येईल त्याप्रमाणे पाहू असेही ते पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले याव

त्रिंबकराव कुलकर्णी (तात्या) यांचे निधन

Image
उमरखेड चिन्मयमूर्ती संस्थांनचे कुलमुखत्यार त्रिंबकराव कुलकर्णी यांचे निधन   परभणी:ता.22- उमरखेड येथील चिन्मयमूर्ती संस्थान,व,येहळेगाव संस्थानचे कुलमुकत्यार त्रिंबकराव नागोराव कूलकर्णी उर्फ तात्यासाहेब यांचे सोमवारी (ता.22) सकाळी निधन झाले. मृत्युसमयी ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, शशीन व नितीन ही दोन मुले, एक मुलगी सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिंतूर रस्त्यावरील श्रीहरी मंगल कार्यालयाचेतसेच निखिल पेट्रोल पंपाचे ते मालक होते. एक मनमिळावू धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा होती.

श्री पांडुरंगा एकच साकडे राज्यावर कृपादृष्टी कायम ठेव,राज्याची भरभराट करावी - उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे कार्तिकी एकादशी निमित्त श्री. विठ्ठलाची शासकीय महापूजा मानाचे वारकरी श्री. कोंडीबा व सौ. प्रयागबाई टोणगे यांना शासकीय महापूजेचा मान  पंढरपूर (टिळक रत्न प्रतिनिधी ):- महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठल चरणी सोमवारी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर या

विधान परिषदेसाठी भाजपकडून संजय केनेकर यांना उमेदवारी

Image
 विधान परिषदेसाठी भाजपकडून संजय केनेकर यांना उमेदवारी !  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी) : आगामी औरंगाबाद महापालिका निवडणूक आणि शिवसेनेशी थेट होणारी लढत पाहता भाजपने डाॅ. भागवत कराड यांच्यानंतर संजय केणेकर यांना बळ देण्याचे ठरवले आहे. केनेकर यांना विधानपरिषदेचे निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. १० डिसेंबर रोजी मतदान तसेच १४ रोजी मतमोजणी होणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी व भाजप यांच्यात रस्सीखेच पहायला मिळणार आहे. भाजपकडून या निवडणूकीसाठी औरंगाबाद भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. संजय केनेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस महाराष्ट्र प्रदेश भाजपातर्फे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव महाराष्ट्र भाजपतर्फे निश्चित करून शिफारस केली आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अनुम

निवृत्तीवेतनधारकांनो हयात प्रमाणपत्र देण्यासाठी धावाधाव करू नका 15 डिसेंबर 2021 पर्यंत वेळ हातात आहे

Image
निवृत्तीवेतनधारकांनो हयात प्रमाणपत्र देण्यासाठी धावाधाव करू नका, 15 डिसेंबर 2021 पर्यंत वेळ हातात आहे परभणी, दि. 11 (टिळक रत्न) :- काही दिवसाखाली अनेक प्रसिद्ध वृत्तपत्र मध्ये बातमी छापून आली होती की निवृत्त वेतन धारकांनी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत आपापले जीवन प्रमाण पत्र (हयात प्रमाण पत्र) पेन्शन मिळते त्या बँकेत जाऊन सही करावी ह्या वृत्तामुळे निवृत्ती वेतन धारकांमध्ये एकच धावपळ सुरू झाली जिल्ह्यातील पोस्ट विभाग कडे पोस्टमनकडे तसेच सी एस सी केंद्रावर जाऊन पेन्शन धारक प्रमानपत्र सादर करण्याचा कामाला लागली अनेक निवृत्तीधारकांनी आपापल्या बँकेत कसेबसे पोहचून प्रमाणपत्र सादर केले एकंदरीत त्या बातमीमुळे पेन्शन धारका मध्ये प्रमाणपत्र सादर करण्यासाठी धावपळ  होत असल्याचे चित्र दिसून आले आहे तरी सर्व पेन्शन धारकांनी अशी धावपळ थांबवावी आपल्या कडे 15 डिसेंबर 2021 पर्यंत वेळ आहे कसल्याही प्रकारे त्रास करून घेऊन प्रमाण पत्र देण्यासाठी कुठंही रांगा लावू नका निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी दि.15 डिसेंबर 2021 पर्यंत हयात प्रमाणपत्रे दाखल करणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनधारकांचे ज्या बँकेत खात

महिला सरपंचांनी कार्यपद्धतींचा अभ्यास करुन प्रभावीपणे ग्रामपंचायत चालवावी : डॉ. निलम गोऱ्हे 

Image
 महिला सरपंचांनी कार्यपद्धतींचा अभ्यास करुन प्रभावीपणे काम करावे : डॉ. निलम गोऱ्हे  औरंगाबाद (टिलक रत्न प्रतिनिधी):- गावाच्या विकासात सरपंचाची भुमिका महत्वाची असते, हे लक्षात घेऊन महिला सरपंचांनी कार्यपद्धती समजून घेत नियमावलीचा अभ्यास करुन गावाच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तापडिया नाट्य मंदीर येथे आयोजित जिल्ह्यातील महिला सरपंच परिषदेत केले. यावेळी ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष मिना शेळके, परिषदेचे संयोजक आ. अंबादास दानवे, आमदार मनिषा कायंदे, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, यांच्यासह जिल्हापरिषदेचे विविध समित्यांचे सभापती, लोकप्रतिनिधी, महिला सरपंच उपस्थित होत्या. गोऱ्हे म्हणाल्या की, महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. गाव पातळीवरील महिला ही राजकारणाच्या माध्यमातून गावाच्या विकासात हातभार लावत आहे. हे काम करताना बऱ्याच अडचणींचाही सामना करावा लागत असतो. त्यामुळे प्रत्येक महिला सरपंचांनी