Posts

Showing posts from October, 2021

ऐतिहासिक वारसा असणारी पंजाबी भाषा आहे - कुलगुरू डॉ उद्धव भोसले

Image
 पंजाबी भाषेला एैतिहासिक वारसा आहे  : कुलगुरू डॉ. उद्धव भोसले  नांदेड (टिळकरत्न प्रतिनिधी) : पंजाबी भाषा ही एक महत्वाची भारतीय भाषा आहे. पंजाबी भाषेला एैतिहासिक वारसा आहे. असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. विद्यापीठातील श्री. गुरु गोबिंदसिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या बेसिक पंजाबी भाषा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वितरीत करताना ते बोलत होते.   यावेळी कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, स. किरणजीतकौर, या केंद्राचे समन्वयक डॉ. दीपक शिंदे, उपकुलसचिव व्ही. पी. रामतीर्थे यांची प्रमुख उपस्थिती होती.  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पुढाकार घेतल्याने श्री. गुरु गोबिंदसिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या वतीने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला सुरळीत चालवण्याकरिता श्री. सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सहकार्य केले जाते.  पुढे कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले की, विद्यापीठातील श्री. गुरु गोबिंदसिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र जागतिक दर्जाचे होईल व त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे प्रय

राज्य सरकारच्या आश्वासन आतिषबाजी मुळे,शेतकऱ्यांची दिवाळी काळी

Image
आश्वासनांची आतषबाजी करून शेतकऱ्याची फसवणूक खोटारड्या महाविकास आघाडी सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी ! भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे यांचा आरोप  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी): ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास  महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची तसेच शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी शनिवार पत्रकार परिषदेत केली. राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जमिनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही, आणि ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पु

स्वा वीर सावरकर टपाल तिकिट च्या किमत, म्हणजे तीच राष्ट्रभक्तांची किंमत असे कोणीही ठरवू नये - हिंदू जनजागृती समिती

Image
  टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्तांची किंमत ठरत नसते  !  -  हिंदु जनजागृती समिती       स्वा .  विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अपमान करणार्‍या काँग्रेसच्या उर्जामंत्री नितीन राऊत यांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते .  वीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान स्व .  इंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट काढले ;  मात्र आज त्यांच्याच पक्षाचे मंत्री हे त्यावर टिप्पणी करून आपल्या नेत्यांचा अपमान करत आहेत .  जर इंदिरा गांधी यांनी स्वा .  सावरकर यांच्यापेक्षा माकडाच्या तिकिटाची किंमत अधिक ठेवली ,  असे मंत्री महोदयांना म्हणायचे असेल ,  तर काँग्रेसी संस्कृतीत आज देशभक्तांपेक्षा मर्कट उड्या मारणार्‍यांना अधिक महत्त्व का आले आहे ,  हे त्यातून लक्षात येते .  माननीय मंत्रीमहोदय ,  एखाद्या टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्ताची किंमत ठरत नसते ,  याचे भान ठेवा ,  असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे .      राष्ट्रभक्तांची किंमत जर टपाल तिकिटांवर ठरवायची झाली ,  तर गांधीजींच्या टपाल तिकिटाची किंमत दीड आणा म्हणजे  9  पैसे ;  मोतीलाल नेहरू ,  जवाहरलाल नेहरू ,  कस्

वनामकृवि 23 वा दीक्षांत समारंभ 25 ऑक्टोबर रोजी

Image
  वनामकृविचा २३ वा दीक्षांत समारंभ सोमवारी दीक्षांत समारंभात तीन वर्षातील १० , ९९७ स्‍नातकांना विविध पदवीने  अनुग्रहीत  करण्‍यात येणार  .......  कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांची पत्रकार परिषदेत माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा तेवीसावा दीक्षांत समारंभ दिनांक २५ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १ १ . ०० वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने आयोजित करण्‍यात आला असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू ,  दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्‍यक्ष तथा कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ मा डॉ सी डी मायी हे उपस्थित राहुन दीक्षांत भाषण करणार आहे ,  अशी माहिती कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिनांक २३ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली . पत्रकार परिषदेस शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले ,  संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर ,  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर ,  कुलसचिव डॉ धीरजकुमा

इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करावी :   जिल्हाधिकारी   सुनील चव्हाण

Image
 इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करावी :   जिल्हाधिकारी   सुनील चव्हाण प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन देणार, फॉरमोसो आणि अहमनी उद्योगाला केले आवाहन  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी)  :  औरंगाबाद परिसरात उद्योगाला पुरक  पायाभुत सुविधा उपलब्ध असल्याने येथे अनेक उद्योग भरभराटीला आलेले आहेत. सध्या बाजारात इलेक्ट्रीकल वाहनांना मोठी मागणी असल्याने  ऑरीक सिटीमध्ये इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी केले.            हॉटेल ताज येथे तैवान मधील तयत्रा या संस्थेच्या पुढाकारातुन आयोजित एका सेमिनारमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी  तयात्राचे  संचालक वेलबर्ग वँग, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती कंपनी अहमनीच्या सचिव श्रीमती ची, तयत्राच्या पदाधिकारी हरजीत गुलाटी, यांच्यासह औरंगाबाद बिझनेस डेव्हलपमेंट क्लस्टरचे पदाधिकारी रमण अजगावकर, रविंद्र कोंडेकर, श्रीधर वेलंगी, श्रीकांत जोशी यांसह उद्योजकांची उपस्थिती होती.    जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, उद्योग वाढीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात पोषक वातावरण आहे

दिवाळीच्या भेटवस्तू फराळ ग्रामीण भागातील बचत गटाकाडून खरेदी करावीत

Image
 दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तू आणि साहित्य ग्रामीण भागातील महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे आवाहन - डॉ. हेमंत वसेकर   परभणी,(टिळक रत्न प्रतिनिधी) . : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेले साहित्य खरेदी करावे आणि ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी उद्योग क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्राला केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांची व्यापक चळवळ अत्यंत प्रभावीपणे राज्यात राबविली जात आहे. गरिबी निर्मूलनाचे ध्येय असलेल्या या राष्ट्रीय ध्वजांकित कार्यक्रमात ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटीत केले आहे. अभियानात महिलांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यात आलेले आहे. अभियानांतर्गत ग्र

गोपाळकाला म्हणजे श्रीकृष्नणा चा अमृत तुल्य प्रसाद - हभप जयश्री महाराज तिकांडे

Image
श्रीकृष्णाच्या हातचा अतुल्य प्रसाद म्हणजे गोपालकाला - हभप जयश्री महाराज तिकांडे मीनाताई ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता  वैजापूर (टिळक रत्न प्रतिनिधी): औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता झाली. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार रमेश बोरणारे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कृष्णाने सकाळीच घाइघाईत सगळे मित्र सवंगड्यांना आवाज दिला अन सर्वांनी आपापल्या घराततील शिदोर्‍या घेऊन गाई चारण्यासाठी रानात गेले. दुपारी सगळ्यांनी आपापल्या शिदोर्‍या सोडल्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्या शिदोर्‍या एकत्र करून त्याचा काला केला. नंतर तो काला सर्वजण एकमेकांना प्रेमाने भरवू लागले. असा कृष्णाच्या हातचा अमुल्य प्रसाद म्हणजेच गोपालकाला असल्याचा श्रीकृष्णाच्या हातचा अतुल्य प्रसाद म्हणजे गोपालकाला - हभप जयश्री महाराज तिकांडे मीनाताई ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता वैजापूर : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय मह

अ भा ब्राहमण महासंघ आयोजित स्तोत्र पठण स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम

Image
 अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, महिला आघाडीकडून नवदुर्गा सन्मान सोहळा गुरुवारी स्त्रोत्र पठन स्पर्धा बक्षीस वितरण समारोहाचे आयोजन  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी) :- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, महिला आघाडी औरंगाबाद यांच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे गुरुवारी क्रांती चौकातील कलश मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. आपल्या अवतीभवती अनेक स्त्रिया समाजासाठी सतत काही न काही करत असतात. स्त्री म्हटलं की तिला संसार, मुलं, नातीगोती हे सगळं सांभाळावे लागतेच. आणि तरीही सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून आपण समाजाचे काही देणे लागतो. या एकमेव भावनेतून तारेवरची कसरत करून त्या त्यांच्या परीने सतत जीव ओतून काम करत असतात. अश्याच काही स्त्रियांचा, नवदुर्गांचा कौतुक सोहळा अ. भा. ब्रा. म., महिला आघाडी जिल्ह्याच्या वतीने आयोजित केला आहे. (टिप ह्या कार्यक्रमात महिलांचे विविध खेळ ही घेण्यात येतील. तसेच बक्शीसे देखील देण्यात येनार आहे. गुरुवारी 3.30 मिनिटांनी हा कार्यक्रम कलश मंगल कार्यालय क्रांती चौक येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेखा पारवेकर जिल्हा सचिव (महिला आघा

प्रत्येक 18 वर्षे पूर्ण केलेल्या अनाथ मुलांना हक्काचे घर,कुटुंब मिळायला हवे-श्रीकांत भारतीय

Image
अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक अनाथ मुलाला हक्काचे घर, कुटुंब मिळाले पाहिजे : - श्रीकांत भारतीय  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी): प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालाने ह्या वर्षी 22 व्या वर्षात पदार्पण केले आहे. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ' अनाथ ? नव्हे स्वअनाथ ' या विषयावर तर्पण फाउंडेशन चे सीईओ तथा भारतीय जनता पार्टी चे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी विचार मांडले. भारतात देशांमध्ये अनाथ ही संकल्पना ब्रिटिश काळापासून मोठ्या प्रमाणात रुजविल्या गेली, तत्पूर्वी इतिहासामध्ये असणार्‍या प्रत्येक व्यक्तीला एक कुटुंब होते राजाश्रय होता, त्यामुळे तो व्यक्ती कधी अनाथ राहिला नाही आणि त्यांचे पालकत्व स्वीकारल्या जात होते, परंतु मागील दोनशे वर्षांपासून अनाथांची समस्या खूप मोठ्या प्रमाणात जाणवायला लागली,सध्या हयात असणारा कायदा हा वयाच्या अठरा वर्षापर्यंत अनाथ मुलांना बालगृहात ठेवण्याची परवानगी देतो परंतु त्यानंतर मात्र त्या व्यक्तीची कुठलीही व्यवस्था नसते ,त्याला पालक नसतात त्यांची स्वतंत्र ओळख नसते आपल्या देशामध्ये बाहेर देशातून आलेल्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना आधार कार्ड, र

सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली पाहणी नागरिकांच्या तक्रारी व समस्या तातडीने दुरुस्तीची सूचना

Image
सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली पाहणी नागरिकांच्या तक्रारी व समस्या तातडीने दुरुस्तीची सूचना  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी) : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत आलेल्या तक्रारी नुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी केली. रस्त्यावर पडलेले खड्डे व पुलाजवळ तडे आणि चिरा तातडीने दुरुस्ती करावे, अशी सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या. तसेच फतीयाबाद, टापरगाव, गल्ले बोरगाव - देवगाव  फाटा, कसाबखेड - शिवूर रोड आदी रस्त्यांची पाहणी करून दुरुस्ती सूचना यावेळी खैरे यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ (२११) सोलापूर - धुळे रस्त्यांचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. मात्र स्थानिक नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लक्ष्य घातले. या पाहणीस शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत, प्रकल्प संचालक अविनाश काळे, महेश पाटील, आशिष देवतकर, बिपीन वर्मा, संघर्ष समिती अध्यक्ष तथा शिवसेना तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, अंधानेर सरपंच अशोक दाबके, राजू राठोड, डॉ. एस. जे. जाधव, डॉ. सदाशिव पाटील, विभागप

मराठवाड्यात 20 ऑक्टोबर पासून कॉलेज सुरू होणार

Image
२० ऑक्टोबरपासून महाविद्यालये नियमित सुरु होणार   नांदेड (टिळक रत्न प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसरातील सर्व शैक्षणिक संकुले, लातूर व परभणी येथील उपपरिसर, हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेज आणि किनवट येथील कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रातील शैक्षणिक वर्ग दि. २० ऑक्टोबर,२०२१ पासून सुरु करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे काही नियम व अटीचे पालन करून महाविद्यालयातील वर्ग नियमित सुरु करण्यात येणार आहेत. १८ वर्षावरील विद्यार्थी ज्यांनी कोव्हीड-१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तेच विद्यार्थी/ विद्यार्थिनी विद्यापीठ किंवा महाविद्यालयात उपस्थित राहू शकतील. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही त्यांच्यासाठी महाविद्यालयाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही शासनाकडून देण्यात आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी कोव्हीड-१९ लस घेतलेली नाही त्यांच्या करिता विद्यापीठाने, संबंधित संस्थेच्या प्रमुख किंवा महा

राष्ट्रीय टपाल सप्ताह निमित्ताने परभणी मुख्य डाकघर येथे रक्तदानं शिबिर सम्पन्न

Image
राष्ट्रीय टपाल सप्ताह निमित्त परभणी मुख्य डाकघर येथे रक्तदान शिबीर संपन्न परभणी (टिळकरत्न प्रतिनिधी):-. राष्ट्रीय टपाल सप्ताह निमित्ताने परभणी मुख्य डाकघर येथे रक्तदान शिबिर 16 ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. शिबीराचे ऊद्घाटन लाईफ लाईन हाँस्पपीटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डाँ.ज्ञानेश्वर हरबक(माऊली)यांचे हस्ते दीपप्रज्वलन व म,गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाले .या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन लाईफ लाईन हाँस्पीटलचे डाँ.गजानन कानडे हे होते.या शिबीरा मध्ये हुजुर साहेब रक्तपैढीचे संचालक श्री ज्ञानेश्वर खटींग यांचे सहकारी उपस्थित होते .या कार्यांयक्रमाची सुरुवात डाँ.ज्ञानेश्वर माऊली , डॉ्.गजानन कानडे व श्री.खतींग यांचा पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले . या प्रसंगी शिबीरास मार्गदर्शन करतांना डाँ.माऊली सरांनी रक्तदानाचे महत्व पटवुन सांगितले .प्रस्तावीकात परभणी डाकविभागाचे सहा.डाकअधिक्षक श्री विनोद कुलकर्णी यांनी शिबीराचे महत्व विशद करतांना आज सद्यपरिस्थित रक्तदानाची गरज का? हे रक्ताच्या तुटवड्याच्या आकडेवारी नुसार उपयुक्त माहीती सांगितली .रक्तपेढीचे संचालक माऊली खटींग यांनी संबोधीतकरत

मराठवाड्याचा हवामानाचा अचूक अंदाज करिता रडार आवश्यक - मयुरेश प्रभुणे

Image
मराठवाड्याच्या हवामानाचा, अचूक अंदाजा साठी रडारची आवश्यकता : मयुरेश प्रभुणे  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी) : प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यान माले चे दुसरे पुष्प आज स्व.गोविंदभाई श्रॉफ सभागृहात गुंफण्यात आले. बदलत्या हवामानाचे आव्हान या विषयावर प्रसिद्ध हवामान अभ्यासक मयुरेश प्रभूने यांनी विचार मांडले ते बोलत असताना असे म्हणाले की, हजारो वर्षापासून पृथ्वीवर सूर्यामुळे व सूर्यावरील सौर डागांमुळे हवामानामध्ये थंड ,गरम किंवा अति पर्जन्य वृष्टी असे बदल वेळोवेळी होत असतात. या बदलामुळे मानवी जीवनावर व शेतीवर तथा शहरीकरणावर परिणाम होणार आहेत. अशा होणाऱ्या परिणामांचा वेळेआधीच अभ्यास करून समाजाला अगोदरच सुचित करता येते. त्यासाठी हवामान अभ्यास चळवळ उभारावी लागेल. तसेच हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांमध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे . शहरीकरण जागतिकीकरण व ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे आज खूप मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होत आहे. त्याचा परिणाम हा शेती व मानवजातीवर होत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी अभ्यास करून वेळोवेळी नवीन बदल स्वीकारले पाहिजेत. सरकारने देखील नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान

दहशतवाद संपवण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध

Image
भारतामधील दहशतवाद संपविण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध : सुनील देवधर  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी)  : मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित 'स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेचे हे बावीसावे वर्ष आहे . या व्याख्यानमाले चे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प 'जागतिक दहशतवाद आणि भारत' या विषयावर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव ,आंध्र प्रदेश प्रभारी सुनील देवधर यांनी गुंफले. ते आंध्र प्रदेश येथील कडप्पा जिल्ह्यामधून ऑनलाइन बोलत होते ,भव्य एलईडी स्क्रीन वर सभागृहात ते प्रदर्शित करण्यात आले. सुनील देवधर बोलत असताना त्यांनी स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा दिला, त्यानंतर जागतिक दहशतवाद आणि भारत या विषयावर आपले विचार मांडले ते बोलत असताना असे म्हणाले की भारत हा सर्वगुणसंपन्न असणारा देश आहे, या देशांमध्ये विविधतेत एकता आहे, परंतु या देशातील काँग्रेस प्रणित , यूपीए सरकार व त्यांच्या गृहमंत्री व पंतप्रधाणांनी, दहशतवादी कारवाया व दहशतवाद या विषयावर कुठलीही ठोस व आग्रही भूमिका घेतली नाही. कारण मतपेटीच्या द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत - आमदार अंबादास दानवे

Image
ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - आमदार अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन साधला संवाद  औरंगाबाद : शेतकरी बांधवांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही, "ठाकरे सरकार" कायम आपल्या पाठीशी भक्कम पणे उभे आहे असे आश्वासन देत शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा दिला. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची दखल घेत नुकतेच महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना १० हजार कोटीची मदत जाहीर केली आहे. यानिमित्ताने शिवसेना औरंगाबादच्यावतीने जिल्ह्यात तीन दिवस शेतकरी संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शेतकरी संवाद दौरा च्या माध्यमातुन जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे व आमदार उदयसिंह राजपूत यांनी आज (दि. १६ ) रोजी कन्नड तालुक्यातील टापरगाव व जैतापूर या गावातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला या संवादात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आपल्याला अर्थसाह्य म्हणून मदत जाहीर केली आहे, याची माहिती दिली. व शेतकरी कुटुंबांना धीर दिला.

मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला

Image
 मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला  औरंगाबाद (प्रतिनिधी) : मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला वर्ष 22 वे औरंगाबाद येथे दिनांक 16 ,17 व 18 ऑक्टोबर 2021 रोजी स्व.गोविंदभाई श्रॉफ सभागृह, स.भु.शिक्षण संस्था परिसर,स.भु.शहर बस स्थानक जवळ,औरंगाबाद येथे संपन्न होत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेने व सामाजिक प्रबोधन करण्याच्या हेतूने मराठवाडा युवक विकास मंडळा च्या वतीने गेल्या 21 वर्षापासून स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित करीत आहोत,या व्याख्यानमालेत सर्व स्तरातून दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यंदा व्याख्यानमालेचे हे 22 वे वर्ष आहे. व्याख्यानमालेत आज पर्यंत विविध विषय हाताळण्या साठी प्रदेश व राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध वक्ते लाभले आहेत. रा. स्व.संघाचे दत्तात्रेयजी होसबळे,गोपीनाथराव मुंडे,नितीन गडकरी,महाराष्ट्राचे चे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,सुधीर मुनगंटीवार,चंद्रकांत दादा पाटील , स्व.बिंदुमाधव जोशी, प्रशांतजी हरताळकर, तरुण विजय ,द.मा. मिरासदार,शेषेराव मोरे,

दीपावलीला फटाके विक्रीसाठी लागणाऱ्या परवान्यासाठी अर्ज करावे

Image
दिपावली सणाच्यानिमित्ताने फटाके विक्रीसाठी लागणाऱ्या परवान्यासाठी अर्ज करावे परभणी, दि.04 (टिळक रत्न ):- नोव्हेंबर 2021 रोजीपासून दिपावली सण साजरा करण्यात येणार आहे. दिपावली सणानिमित्त इच्छुक व्यक्तींना पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी फटाके विक्रीसाठी तात्पुरते फटाके परवाने देण्यासंबंधी विस्फोटक अधिनियम 2008 मधील विहीत नमुन्यातील अर्ज मंगळवार दि.5 ऑक्टोबर 2021 रोजीपर्यंत स्विकारले जाणार आहेत. तरी जिल्ह्यात फटाके दुकाने लावण्यास इच्छुकांनी आपले अर्ज मुदतीत सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. फटाक्याच्या परवान्यासाठी प्रत्येक फटाके विक्री दुकानातील अंतर हे कमीत कमी तीन मिटरचे असावे. दुकाने मोकळ्या जागी व्यवस्थित कोणत्याही प्रतिबंधित इमारतीपासून 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर नसावीत. प्रत्येक फटाके विक्री दुकानातील स्टॉक मर्यादा जास्तीत जास्त 100 किलो राहील. पोलिस अधिक्षकांचे कायदा व सुव्यवस्था, अर्जदाराची वर्तणूक आणि दुकानाचे बाबतीत अर्जदाराने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले किंवा कसे याबाबत सर्वकष अहवाल. महाराष्ट्र नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 196