अ भा ब्राहमण महासंघ आयोजित स्तोत्र पठण स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम

 अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, महिला आघाडीकडून नवदुर्गा सन्मान सोहळा गुरुवारी स्त्रोत्र पठन स्पर्धा बक्षीस वितरण समारोहाचे आयोजन 


औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी) :- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, महिला आघाडी औरंगाबाद यांच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे गुरुवारी क्रांती चौकातील कलश मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. आपल्या अवतीभवती अनेक स्त्रिया समाजासाठी सतत काही न काही करत असतात. स्त्री म्हटलं की तिला संसार, मुलं, नातीगोती हे सगळं सांभाळावे लागतेच. आणि तरीही सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून आपण समाजाचे काही देणे लागतो. या एकमेव भावनेतून तारेवरची कसरत करून त्या त्यांच्या परीने सतत जीव ओतून काम करत असतात. अश्याच काही स्त्रियांचा, नवदुर्गांचा कौतुक सोहळा अ. भा. ब्रा. म., महिला आघाडी जिल्ह्याच्या वतीने आयोजित केला आहे. (टिप ह्या कार्यक्रमात महिलांचे विविध खेळ ही घेण्यात येतील. तसेच बक्शीसे देखील देण्यात येनार आहे. गुरुवारी 3.30 मिनिटांनी हा कार्यक्रम कलश मंगल कार्यालय क्रांती चौक येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेखा पारवेकर जिल्हा सचिव (महिला आघाडी) किरण शर्मा महिला आघाडी, (मराठवाड़ा उपाध्यक्ष) स्मिता जोशी, (जिल्हासंघटक), ॲड. अश्विनी कुलकर्णी, सीमा नांदापूरकर (जिल्हासंघटक), रश्मि ढापरे (जिल्हासंघटक), अंजली पराड़कर (जिल्हासंघटक), स्मिता नगरकर (जिल्हासंघटक), मीना महाजन (जिल्हासंघटक) गायत्री न्यायाधीश (शहर संघटक) वर्षा कुलकर्णी (संघटक), मयूरी जोशी (संघटक) प्राजक्ता तांबोळी (संघटक) व सर्व महिला पदाधिकारी तसेच सुधीर नाईक जिल्हाअध्यक्ष , ॲड. प्रकाश महाजन, संजय टोनपे (पेंशनर आघाडी), कुणाल वैद्य (पूर्व शहर संघटक), प्रमुख शहर संघटक तसेच सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन