Posts

Showing posts from July, 2026

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

Image
परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात! ​ 📌 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (असोला) येथील धक्कादायक प्रकार; ८०० आणि ५०० रुपयांची लाच घेताना झाली अटक! ​ परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):-  मोटरसायकल स्वतःच्या नावावर करण्यासाठी गेलेल्या एका मजुराकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), असोला येथील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज (दि. ३ जुलै २०२६) अत्यंत यशस्वी सापळा रचून कनिष्ठ लिपिक मीरा नारायणराव लोकरे आणि लिपिक सय्यद जफर सय्यद अकबर या दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे परभणी महसूल आणि आरटीओ वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ​तक्रारदार (वय २८ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. धार रोड, परभणी) यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये एक मोटरसायकल खरेदी केली होती. सदर मोटरसायकल स्वतःच्या नावावर करण्यासाठी त्यांनी आवश्यक ती ऑनलाईन फी देखील भरली होती. दि. ३० जून २०२६ रोजी जेव्हा तक्रारदार आर.टी.ओ. कार्यालय, असोला येथे गेले, तेव्हा कनिष्ठ ...

परभणीत 'सनातन उत्थान'चा जयघोष! रोकडा हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण; बागेश्वर धाम सरकारचे ऑनलाईन मार्गदर्शन

Image
परभणीत 'सनातन उत्थान'चा जयघोष! रोकडा हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण; बागेश्वर धाम सरकारचे ऑनलाईन मार्गदर्शन ​ परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):  परभणी येथील प्रसिद्ध श्री रोकडा हनुमान मंदिर येथे काल, दिनांक ०१ जुलै रोजी सायंकाळी ठीक ८:१५ वाजता 'परभणी बागेश्वर धाम शिष्य मंडळा'च्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. 'सनातन उत्थानाचा संकल्प आणि दिव्य ध्येय डोळ्यांसमोर ठेवून या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. ​ बागेश्वर धाम सरकारचे ऑनलाईन मार्गदर्शन आणि शुभेच्छा ​या पठण सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हनुमान चालीसा पठणानंतर संपूर्ण भारतभरातील बागेश्वर धाम शिष्यमंडळाशी बागेश्वर धाम पिठाधीश्वर, पूज्य गुरुदेव पंडित श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी महाराज यांनी ऑनलाईन माध्यमातून थेट संवाद साधल . या ऑनलाईन संवादादरम्यान गुरुदेवांनी सर्व भाविकांना आणि शिष्यांना 'सनातन उत्थान' आणि धर्म रक्षणासाठी प्रेरित करत विशेष मार्गदर्शन केले, तसेच परभणीसह देशभरातील शिष्यांना त्यांच्या पुढील धार्मिक व सामाजिक कार्यास मन...