Posts

Showing posts from August, 2020

17 ऑगस्ट रोजी आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी विशेष परीसंवादाचे आयोजन

Image
आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी विशेष परीसंवादाचे आयोजन   सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. त्या अनुषंगाने घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कसा साजरा करावा ? असा प्रश्‍न सामान्यांसह गणेश मंडळांच्या प्रतिनिधींच्या मनात आहे. सध्या कोरोनाच्या वा तत्सम आपत्काळातही काही पर्याय सांगितले आहेत. ते पर्याय नेमके काय आहेत, तसेच अन्य दिशादर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ यावर एका विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या संवादाचे सोमवार, 17 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 7 ते 8.30 या वेळेत ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांवरून थेट प्रसारण केले जाणार आहे. 🔸 या संवादाद्वारे गणेशभक्तांच्या मनात येणार्‍या पुढील प्रकारच्या प्रश्‍नांवर उत्तरे दिली जातील : 1. सध्या कोरोना महामारी असल्याने श्री गणेशचतुर्थीच्या ऐवजी माघी गणेशजयंतीला मूर्ती प्रतिष्ठापना करावी का ? 2. बाजारातून आणलेली मूर्ती ‘सॅनिटाइझ’ करावी का ? 3. कोरोना महामारीमुळे पुरोहितांना घरी बोलाव

आपत्काळात घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा

Image
 आपत्काळात घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा ? १. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने धर्मशास्त्रात सांगितलेला पर्याय अर्थात् ‘आपद्धर्म’ ! सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. भारतातही विविध राज्यांमध्ये  लॉकडाऊन आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला, तरी तेथे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेतच. यामुळे हिंदूंचे विविध सण, उत्सव, व्रते नेहमीप्रमाणे सामूहिकरित्या करण्यावर बंधने आली आहेत. कोरोनासारख्या आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे ‘आपत्काळात धर्मशास्त्राला मान्य असलेली कृती.’ २. गणेशचतुर्थी व्रत कशा प्रकारे करावे ? गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ हजार पटींनी कार्यरत असते. सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. या अनुषंगाने आपद्धर्म आणि

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांची मुलगी स्नेहलता साठे यांचे निधन

Image
  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांची मुलगी स्नेहलता साठे यांचे निधन मुंबई, १३ ऑगस्ट (प्रतिनिधी) –  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहान बंधू नारायणराव सावरकर यांची कन्या स्नेहलता सदाशिव साठे (वय ८२ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने दादर येथे त्यांच्या रहात्या घरी निधन झाले. त्या कर्करोगाने आजारी होत्या. त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतणी आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वर्गीय विक्रमराव सावरकर यांच्या भगिनी होत्या. स्नेहलता साठे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या त्या सक्रीय सदस्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर विस्तारित व्हावे, यासाठी त्यांची तळमळ असायची. लहानपणापासून त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. विवाहानंतर त्यांनी एम्.ए.ची पदवी संपादन केली. विक्रमराव सावरकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या जडणघडणीत त्यांचा मोठा हातभार होता. विक्रमराव सावरकर यांच्या अनेक राजकीय चळवळीतही त्यांनी सक्रीय

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आवाहन

Image
  स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आवाहन मुंबई, १३ ऑगस्ट (प्रतिनिधी) –  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्यदिनाचा   ध्वजारोहणाचा कार्यक्रम अधिकाधिक नागरिकांना घरबसल्या पहाता यावा, यासाठी आयोजकांनी या कार्यक्रमाचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. या वेळी सामाजिक माध्यमांद्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेचा प्रसार करावा, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आले आहे. राज्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता मंत्रालयात होणार आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुणे येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. विभागीय आणि जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, हुतात्मा सैनिकांचे कुटुंबीय यांसह कोरोना योद्धा म्हणून काम करणारे आधुनिक वैद्य, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, तसेच कोरोनावर मात केले नागरिक यांनाही निमंत्रित करण्याचे आवाहन शासनाकडून

ट्रेड इंडिया’ या साईटद्वारे तिरंग्याच्या रंगातील मास्कची विक्री करून अवमान

Image
ट्रेड इंडिया’ या साईटद्वारे तिरंग्याच्या रंगातील मास्कची विक्री करून अवमान पुणे –  ‘व्हाईट तिरंगा इंडियन प्लॅग एन् ९५ मास्क’ या नावाने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ ‘ऑनलाईन’ विक्रीसाठी ठेवले आहेत.  www.tradeindia.com/products/tiranga-indian-flag-n९५-mask-६४७२८२२.html   या मार्गिकेवर हे ‘मास्क’ विक्रीसाठी आहेत. यापूर्वीही भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी अनेक उत्पादने अ‍ॅमेझॉन आणि अन्य आस्थापनांकडून साईटवर विकली जात होती. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास भारतीय कायद्यानुसार ३ वर्षांचा कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

छत्रपती श्री शिवाजी महाराज व माँ जिजाऊ बद्दल मोबाईलवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या पालम येथील त्या पोलीस कर्मचाऱ्यासअटक

Image
छत्रपती श्री शिवाजी महाराज व माँ जिजाऊ बद्दल मोबाईलवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या पालम येथील त्या पोलीस कर्मचाऱ्यासअटक परभणी  ( प्रतिनिधी) :- पालम येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ बद्दल मोबाईलवर बदनामीकारक अपशब्द वापरले होते ही ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली सदरील वक्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यावर करवाई करण्यात यावी याकरिता पालम बंद पुकारला गेला होता ह्यावर परभणी याचे परिणामी सदरील कर्मचाऱ्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक उपाध्याय यांनी सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. अपशब्द वापरणाऱ्या पालम येथील पोलीस कर्मचारी जगन्नाथ गंगाराम काळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. पालम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या जगन्नाथ गंगाराम काळे याने छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ बद्दल अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. याच्या निषेधार्थ पालम बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यानंतर काळे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून कळविले आहे तसेच सदरील ऑडियो  क्लिप कोणीही यापुढे वायरल करू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.