स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आवाहन

 स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आवाहन

मुंबई, १३ ऑगस्ट (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्यदिनाचा   ध्वजारोहणाचा कार्यक्रम अधिकाधिक नागरिकांना घरबसल्या पहाता यावा, यासाठी आयोजकांनी या कार्यक्रमाचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. या वेळी सामाजिक माध्यमांद्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेचा प्रसार करावा, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आले आहे.

राज्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता मंत्रालयात होणार आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुणे येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. विभागीय आणि जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, हुतात्मा सैनिकांचे कुटुंबीय यांसह कोरोना योद्धा म्हणून काम करणारे आधुनिक वैद्य, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, तसेच कोरोनावर मात केले नागरिक यांनाही निमंत्रित करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे, तसेच ‘मास्क’ लावणे बंधनकारक आहे.


Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन