सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

परभणी सारंग स्वामी विद्यालय  2005 दहावी वर्गाच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न



परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी) -  येथील श्री सारंग स्वामी विद्यालय, परभणी येथील 2005 वर्ग 10 वी बॅचचे वर्ग मित्र मैत्रीणी स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.वीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली त्यानंतर 2005 च्या मित्र-मैत्रिणींचा वर्ग भरवण्यात आला, यावेळी स्नेह मिलन कार्यक्रम चे प्रास्ताविक मनोगत झाले आणि उपस्थित वर्ग शिक्षकांचा शाल श्रीफळ आणि भगवद्गगीता ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. नंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देत शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केल्या.

वर्गातील गमतीदार किस्से, शिक्षकांचा विशिष्ट संवाद किंवा लकब, कोणीतरी शिक्षकांपासून सुटण्यासाठी केलेले बहाणे, वर्गातील विनोदी प्रकार, चुपचाप खोड्या करणारे मित्र, गृहपाठ न केल्यामुळे मिळालेली शिक्षा, संपूर्ण वर्गाला बाहेर उभं करण्यात आलेले प्रसंग, वर्गात लपून खाद्यपदार्थ खाण्याचे गुप्त मिशन, परीक्षा आणि नकल करण्याचे किस्से, नकल करण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्न, मित्रांनी पेपर कसा सोडवला, फर्स्ट बेंचर्स कसे होते, बेंच पार्टनरशी असलेली घट्ट दोस्ती, माझे मित्र कोण, कोणाशी भांडण झाले, कोणासोबत कट्टी घेतली अशा आठवणी, खेळ आणि ग्राउंडवरील आठवणी. याची सर्वांना आठवण यावेळी झाली व सर्वांचे मन भरून आले. त्यांनतर विविध मनोरंजनात्मक खेळ खेळून स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली 

स्नेहभोजन प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक श्री निलंगे , शिक्षक श्री धर्माधिकारी, श्री पेडगावकर, श्री धुत्तरगावकर,श्री पेंडलवार ,श्री वांगंकर , शिक्षिका सौ मठपती, सौ फुलारी, सौ कोंढरे उपस्थित होत्या.त्यांनी आपल्या मनोगत व्दारे माजी विद्यार्थ्यांशी हितगुज करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक राकेश रेवलवार , सूत्रसंचालन संतोष वाडकर तर आभार प्रदर्शन जगदीश चापके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधुरी डहाळे(टेहरे),मंगेश बर्दापुरकर, दत्ता गरुड यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला