Posts

Showing posts from January, 2024

पठाण मागतो लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता देणेकरिता पाच हजाराचा हिस्सा .. एसीबीने केले गजाआड

Image
पठाण मागतो लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता देणेकरिता पाच हजाराचा हिस्सा .. एसीबीने केले गजाआड परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी) - यातील तक्रारदार यांचे नावे गजानन नगरी गंगाखेड येथील जागेवर प्रधानमंत्री नागरी आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे.त्याचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. त्यानंतर बाकीचे हप्ते कधी मिळतात याबाबत विचारणा करण्यासाठी तक्रारदार हे नगरपरिषद गंगाखेड येथे गेले असता आरोपी तेथील सर्व्हेयर सरफराज पठाण यांनी तक्रारदार यांना तुमच्या घराचे जिओ टॅगिंग चे काम केल्याने तुम्हाला साठ हजार रुपयाचा दुसरा हप्ता तुमच्या खात्यावर पडणार आहे.घरकुलाचे उर्वरित अनुदानासाठी जिओ टॅगिंग चे काम करून अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावर जमा करणे कामी मला पाच हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणुन लाचेची मागणी केली. घरकुलाचे अनुदानाचा दुसरा हप्ता जमा झाल्यानंतर दि.29/01/24 रोजी तक्रारदार यांना यातील आरोपी यांनी तुमच्या बँक खात्यात अनुदानाचा दुसरा हप्ता जमा झाला आहे, तुम्हाला यापूर्वी सांगितल्या प्रमाणे मला येऊन भेटा असे फोनवर कळविले. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रार

महायुतीचा समन्वय मेळावा 14 जानेवारीला तिळगुळ घ्या गोड गोड बोला

Image
परभणीत महायुतीचा 14 जानेवारीला तीळगूळ घ्या गोड गोड बोला कार्यक्रम.... महायुतीचा मित्रपक्ष पदाधिकारी कार्यकर्ते समन्व्य मेळावा परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी )- येथील पाथरी रोड वरील रेणुका मंगल कार्यलयात 14 जानेवारी रोजी महायुतीचा समन्व्य मेळावा आयोजित केला आहे अशी माहिती आज (दि 12 जाने ) रोजी सावली विश्राम गृह मध्ये पत्रकार परिषद मध्ये महायुतीचे समन्व्यकांनी दिली लोकसभा निवडणूक व इतर निवडणूक ह्या येत्या काळात भाजपा शिवसेना (शिंदेगट ), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) व इतर मित्रपक्ष सोबत लढवणार आहेत, करिता पक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते ह्याचे मध्ये सर्व माहिती पोहचवणे व सर्वांनी समानव्य साधून महायुतीचा उमेदवार निवडून आणणे करिता समन्व्य साधण्यासाठी 14 जानेवारी मकर संक्रांत निमित्याने मेळाव्यात महायुतीच्या सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले पत्रकार परिषद करिता माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आ. मेघना बोर्डीकर,आ. बाबाजनी दुर्रानी, हरिभाऊ लहाने,वेंकटेश शिंदे, राजेश विटेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख,संतोष मुरकुटे, आनंद भरोसे, सुरेश भुमरे,माजी खासदार सु