महायुतीचा समन्वय मेळावा 14 जानेवारीला तिळगुळ घ्या गोड गोड बोला

परभणीत महायुतीचा 14 जानेवारीला तीळगूळ घ्या गोड गोड बोला कार्यक्रम....
महायुतीचा मित्रपक्ष पदाधिकारी कार्यकर्ते समन्व्य मेळावा

परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी )- येथील पाथरी रोड वरील रेणुका मंगल कार्यलयात 14 जानेवारी रोजी महायुतीचा समन्व्य मेळावा आयोजित केला आहे अशी माहिती आज (दि 12 जाने ) रोजी सावली विश्राम गृह मध्ये पत्रकार परिषद मध्ये महायुतीचे समन्व्यकांनी दिली

लोकसभा निवडणूक व इतर निवडणूक ह्या येत्या काळात भाजपा शिवसेना (शिंदेगट ), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) व इतर मित्रपक्ष सोबत लढवणार आहेत, करिता पक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते ह्याचे मध्ये सर्व माहिती पोहचवणे व सर्वांनी समानव्य साधून महायुतीचा उमेदवार निवडून आणणे करिता समन्व्य साधण्यासाठी 14 जानेवारी मकर संक्रांत निमित्याने मेळाव्यात महायुतीच्या सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले

पत्रकार परिषद करिता माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आ. मेघना बोर्डीकर,आ. बाबाजनी दुर्रानी, हरिभाऊ लहाने,वेंकटेश शिंदे, राजेश विटेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख,संतोष मुरकुटे, आनंद भरोसे, सुरेश भुमरे,माजी खासदार सुरेश जाधव,संजय शेळके,प्रमोद वाकोडकर, भाजपा युवा मोर्चा अक्षय डहाळे, रामदास पवार, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न