Posts

Showing posts from November, 2020

पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार

पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार परभणी,दि.29 (प्रतिनिधी) :- आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रा

पदवीधर निवडणूकीसाठी असे करा मतदान 

Image
 पदवीधर निवडणूकीसाठी असे करा मतदान   परभणी दि 28 (प्रतिनिधी) :-  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 1 डिसेंबरला मतदान होत आहे. ही निवडणूक लोकसभा व विधानसभा निवडणुकीपेक्षा वेगळी असल्यामुळे यातील मतदान पद्धती सुद्धा थोडी वेगळी आहे. यात ईव्हीएम मतदान यंत्राचा वापर होत नसून कागदी मतपत्रिकेचा वापर करण्यात येतो. मतदारांनी मतदान करण्यापूर्वी मतदान कसे करावे हे एकदा समजून घेऊनच या निवडणुकीतील मतदानाला जावे. या निवडणुकीत योग्य पद्धतीने मतदान न केल्यास मतदाराचे मत अवैध ठरू शकते व ते उमेदवारासाठी उपयुक्त ठरत नाही. मतदान कसे करावे मतदान प्रक्रियेत मतदाराला मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच मतदानासाठी वापर करायचा आहे. स्वतःचा कोणत्याही शाईचा पेन मतदार वापरू शकत नाहीत. कोणत्याही शाई, पेन, पेन्सिल, बॉल पेनचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर मतपत्रिकेच्या 'पसंतीक्रम' या स्तंभात इंग्रजी किंवा मराठी किंवा रोमन भाषेत १ हा अंक लिहून मत नोंदवावे. या १ ला अवतरण चिन्ह, कंस इत्यादी करू नये. निवडून द्यावयाच्य

कोरोनाचा संसर्ग परत वाढण्याची भीती ; उपाय योजना म्हणून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा राज्य सरकार करण्याची शक्यता

कोरोनाचा संसर्ग परत वाढण्याची भीती ; उपाय योजना म्हणून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा राज्य सरकार करण्याची शक्यता मुंबई (वृत्तसंस्था) :- गेल्या 8 महिन्याच्या लॉकडाउननंतर आता कुठे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत करोनाची लाट आली आहे. त्यामुळे करोना झपाट्यानं पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून आली आहे. मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता वाटत आहे.

परभणीत पदवीधर संघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ भाजपद्वारे फेरी

Image
परभणीत पदवीधर मतदारसंघ चे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ भाजपद्वारे फेरी  परभणी,दि.20(प्रतिनिधी) ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष- भारतीय रिपब्लिकन पक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.20) शासकीय-निमशासकीय कार्यालयांमधून प्रचारफेरी काढली. महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मोहन कुलकर्णी, संजय शेळके, एन.डी. देशमुख, राजेश देशमुख, प्रशांत पार्डीकर, रितेश जैन, मुकुंद खिल्लारे, दिनेश नरवाडकर, संजय रिझवानी, अरविंद शहाने, रामदास पवार, संदीप शिंदे, दिपक शिंदे, अनंत गिरी, संतोष जाधव आदींनी जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा व सत्र न्यायालयातील अधिकारी - कर्मचारी, वकील या पदवीधर मंडळींशी संपर्क साधून बोराळकर यांना पहिल्या पसंतीच्या क्रमांकाचे मत द्यावे, असे आवाहन केले.

परभणीत विशेष पोलीस पथकाने शिवराम नगर मधील जुगार अड्ड्यावर मारला छापा ....लाखोंचा मुद्देमाल जप्त

Image
परभणीत विशेष पोलीस पथकाने शिवराम नगर मधील जुगार अड्ड्यावर मारला छापा ....लाखोंचा मुद्देमाल जप्त  परभणी (प्रतिनिधी) :-   पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. शहरातील शिवराम नगर वसाहतीत हा जुगार अड्डा सुरू होता. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मध्यरात्री धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली आहे. या जुगाऱ्यांकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य, असा एकूण 3 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .  पोलिसांनी छापा मारला तेव्हा, शेख हबीब शेख मासूम, मतीन खान मकसूद खान, युसूफ खान शब्बीर खान पठाण, किशोर श्रीकिशन तोष्णीवाल, सिध्दार्थ हरिभाऊ खाडे, सय्यद हनीफ सय्यद अहमद व गोविंद एकनाथ काकडे या 7 जुगाऱ्यांचा पत्याचा डाव रंगला होता. तेव्हा पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मिना यांच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील शिवराम नगर परिसरात हा छापा टाकला. शिवराम नगरातील गोविंद काकडे यांच्या घरात चालणाऱ्या या  जुगार अड्ड्यावर 'झन्नामन्ना' नावाचा ज