पदवीधर निवडणूकीसाठी असे करा मतदान 

 पदवीधर निवडणूकीसाठी असे करा मतदान  



परभणी दि 28 (प्रतिनिधी) :-  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 1 डिसेंबरला मतदान होत आहे. ही निवडणूक लोकसभा व विधानसभा निवडणुकीपेक्षा वेगळी असल्यामुळे यातील मतदान पद्धती सुद्धा थोडी वेगळी आहे. यात ईव्हीएम मतदान यंत्राचा वापर होत नसून कागदी मतपत्रिकेचा वापर करण्यात येतो. मतदारांनी मतदान करण्यापूर्वी मतदान कसे करावे हे एकदा समजून घेऊनच या निवडणुकीतील मतदानाला जावे. या निवडणुकीत योग्य पद्धतीने मतदान न केल्यास मतदाराचे मत अवैध ठरू शकते व ते उमेदवारासाठी उपयुक्त ठरत नाही. मतदान कसे करावे मतदान प्रक्रियेत मतदाराला मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच मतदानासाठी वापर करायचा आहे. स्वतःचा कोणत्याही शाईचा पेन मतदार वापरू शकत नाहीत. कोणत्याही शाई, पेन, पेन्सिल, बॉल पेनचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर मतपत्रिकेच्या 'पसंतीक्रम' या स्तंभात इंग्रजी किंवा मराठी किंवा रोमन भाषेत १ हा अंक लिहून मत नोंदवावे. या १ ला अवतरण चिन्ह, कंस इत्यादी करू नये. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर अंकात नोंदवू शकता. आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील 'पसंतीक्रम' या स्तंभात २,३,४ इत्यादी प्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे अंकात नोंदवू शकता. एका उमेदवाराच्या नावासमोरील स्तंभात एकच पसंतीक्रम अंक नोंदवावा. तो पसंती क्रमांक इतर कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर नोंदवू नये. पसंतीक्रम हे केवळ इंग्रजी किंवा मराठी किंवा रोमन भाषेत 1,2,3/१,२,३/ I,II,III अशा अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक, दोन, तीन याप्रमाणे शब्दांमध्ये नोंदविण्यात येऊ नयेत. मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द/चिन्ह लिहू नये. तसेच मतपकत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवतांना टिकमार्क ", " किंवा क्रॉसमार्क "X" अशी खूण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अनिवार्य आहे. अन्य पसंतीक्रम नोंदविणे हे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. मतदारांनी या बाबी लक्षात घेऊन मतदान करावे. अशी माहिती परभणीचे जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी दि एम मुगळीकर यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन