Posts

Showing posts from March, 2020

शिवसेनेची आपत्ती काळात रुग्णांकरिता गुलाबी रिक्षा सेवा सुरू

Image
ठाणे येथे रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेच्या गुलाबी रिक्शा ठाणे (वृत्तसंस्था) –  देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने रस्त्यावरील वाहतूकव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे रुग्णाईत व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठीही वाहने उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत रुग्ण सेवेविना राहू नयेत म्हणून ठाणे जिल्हा शिवसेनेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ठाणे शहरातील रुग्णांच्या साहाय्याला शिवसेनेच्या गुुुलाबी रिक्शा रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रशासनाने २५ गुुुलाबी रिक्शा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना दूरध्वनीद्वारे या रिक्शांसाठी मागणी नोंदवता येईल. शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून ही सेवा दिली जात आहे.ठाणे शहर, कोपरी, वागळे इस्टेट, माजिवडा विभाग, कॅडबरी परिसर, टेंभी नाका परिसर आदी ठिकाणी या गुुुलाबी रिक्शा रुग्णांना सेवा देणार आहेत. प्रतिदिन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही सेवा चालू रहाणार आहे. ज्यांना खरच आवश्यकता आहे, अशा रुग्णांनी विनायक सुर्वे यांना ९९६७३ १२१७६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखी

भगवंत पांडुरंगा कडून 1 कोटींचा निधी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी

Image
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांचे साहाय्य ४ एप्रिल या दिवशी होणारी चैत्र यात्रा रद्द पंढरपूर (प्रतिनिधी) –  राज्यातील कोरोना विषाणूच्या आपत्तीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी घोषित केला. याविषयी मंदिर समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. मंदिर समितीच्या सर्व सदस्यांच्या संमतीने हा निर्णय मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी घेतला आहे. १४ एप्रिलपर्यंत केंद्रशासनाने दळणवळण बंदी घोषित केली असल्याने ४ एप्रिल या दिवशी होणारी चैत्र यात्रा रहित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त पारंपरिक नित्योपचार केले जाणार आहेत.

आसाराम बापू यांची पण सुटका करावी - भा ज पा खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी

Image
आसाराम बापू यांचीही सुटका करावी ! –  डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, खासदार, भाजप नवी दिल्ली (वृत्तसंस्था)–  कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने केंद्र आणि राज्य सरकार देशातील कारागृहांमध्ये अटकेत असलेल्या हजारो बंदीवानांची सुटका करणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ‘जर सरकार दोषी बंदीवानांची सुटका करणार असेल, तर खोट्या आरोपांवरून दोषी ठरवण्यात आलेले ८५ वर्षीय संतश्री आसाराम बापू यांची प्रथम सुटका करावी’, अशी मागणी भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ‘ट्वीट’ करत केली.

खाजगी दवाखाने 24 तास चालू ठेवा....अन्यथा....-जिल्हाधिकारी दि एम मुगळीकर

Image
जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर यांचे आवाहन; जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा 24 तास सुरू ठेवावी परभणी दि.30:-  जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोशियशन , आयुर्वेदिक व्यासपीठ असोशियसन , निमा असोशियशन , अध्यक्ष होमिओपॅथी असोशियशन आणि जिल्हयातील इतर वैद्यकीय सेवा देणा-या संघटनांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा 24 तास अखंडितपणे सुरू ठेवाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी केले आहे.           राज्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परभणी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा खंडित करण्यात येवून शहरी व ग्रामीण भागातील दवाखाने बंद असल्यामुळे आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी एकवटत असल्याचे निदर्शनास येत आहे .      तरी कोरोना विषाणू संसर्गच्या या आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा खंडित करण्यात येऊ नयेत तसेच आपण आपल्या ओपीडी आणि इतर सर्व वैद्यकीय सेवा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी २४ तास नियमितपणे सुरु ठेवण्यात याव्यात. जेणेकरून दि. १४ एप्रिल २०२० पर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये आरोग्य सेवेसाठी नागरिकांची एका ठिकाणी गर्दी होणार नाही आणि

गरीब व मजूर व्यक्तींनी शिवभोजन योजनेचा लाभ घ्यावा

Image
* गरीब व मजूर व्यक्तींनी 'शिवभोजन' योजनेचा लाभ घ्यावा *                     - जिल्हाधिकारी           परभणी दि.30:-  जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना मोफत व स्वस्त धान्य वितरीतकरण्याबाबत कोणत्याही स्वरूपाच्या सुचना शासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने गरीब, मजुर तसेच गरजू कुटुंबांना 'शिव भोजन' योजनेच्या संकल्पनेतून माफक दरामध्ये जेवणाची व्यवस्था जिल्हा व तालुकास्तरावर करण्यात आली आहे. तरी गरीब व गरजू व्यक्तींनी 'शिवभोजन' या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.           कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये याबाबत दक्षता म्हणून शासनाच्या निर्देशानूसार पात्र शिधापत्रीका धारकांना माहे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्याचे धान्य वितरीत करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरून करण्यात येत आहे.          शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना मोफत व स्वस्त धान्य वितरीतकरण्याबाबत सुचना शासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींची कोणत्

राशन कार्ड बाबतचा तो संदेश बनावट....विश्वास ठेवू नका

Image
*रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...* *अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा*  मुंबई,,दि.३० मार्च :-  रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म  उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे.  सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभा

दानशूर व समाजकार्य करणारे व्यक्ती ...आपले आर्थिक सहकार्य ....मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये करा

Image
सर्व दानशूर व समाजकार्यात सहभाग नोंदवू ईच्चीत व्यक्ती व संस्था आदींना जर सध्या आपल्या देशावर व राज्यावर आलेल्या कोरोना-१९ संकट समयी आर्थिक स्वरूपात मदत करावयाची असल्यास ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या एस बी आय 39239591720 फोर्ट शाखा IFSC SBIN0000300 खात्यात करून आपला मदतीचा हात पुढे करावा जनहितार्थ प्रसारित

परदेशातून गावो गावी आलेल्या नागरिकांनी तात्काळ माहिती देणे ....अन्यथा

Image
परदेशातून आलेल्या नागरिकांनी माहिती देणे अनिवार्य औरंगाबाद, (विमाका) :- जे नागरिक 1 मार्च 2020 नंतर परदेशातून आले आहेत, त्यांनी आपल्याबद्दलची  संपूर्ण माहिती जिल्ह्याधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकेला द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.     तसेच जीवनावश्यक वस्तुंची कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहुन आपल्या बद्दलची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकेला द्यावी. तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकानेही उघडी राहतील, त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये. सामानाची मोठया प्रमाणात साठवणूक करू नये, असे आवाहनही विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

गर्दी टाळावी.... सर्व जीवनावश्यक वस्तू मुबलक आहेत..कोणीही साठेबाजी करू नका

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन;  जीवनावश्यक वस्तूचा साठा मुबलक असल्याने गर्दी टाळावी  9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले   कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना २१ दिवसाच्या लॉगडाऊनच्या काळात जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा आणि अन्न - धान्याचा साठा मुबलक  असून कोणताही तुटवडा होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतलेली आहे. तरी जीवनावश्यक वस्तू , औषधी आणि अन्नधान्य , भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.        नागरीकांनी काही अडचण असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष  दूरध्वनी क्रमांक ०२४५२ २२६२४४ व्हॉटसअप क्रमांक - ७७४५८५२२२२ व आपत्ती प्रशासन कक्षातील दूरध्वनी क्रमांक ०२४५२ - २२६४०० येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.          कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालयात एकूण 121 रुग्णांची नोंद झाली असून 74 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह

भारत बंद...21 दिवस ....कोरोनाला हद्दपार करा...

Image
भारत बंद...सर्व जीवनावश्यक वस्तू मिळणार...गर्दी करू नका...साठेबाजी करू नका...कोरोना लागणीची साखळी मोडा.... अवघ्या देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउन; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. मोदी म्हणाले, ‘जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधन नाहीत, असं नाही. पण, हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. देशात करोना आजाराचा उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचं ट्विट करून सांगितलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी

लॉक डाउन घोषित .....31 मार्च पर्यंत....अत्यावश्यक सेवा चालू राहणार

दि २२ मार्च २०२० मुख्यमंत्री यांचे “लाईव्ह” प्रसारणातील मुद्दे आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे.  जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.  महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.  रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील  अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.   आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.  ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.  चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत.  ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सु

जनता कर्फ्यु 100% ....जबरदस्त फाईट देत ....कोरोना विरुद्ध...युद्ध सुरू

Image
🚷🙋🏻‍♂ *जनता कर्फ्यु* अगदी भाजीपाला फळ व दुध विक्रेते सुद्धा घरी बसून आहेत....(कालीकमान परिसर)त्यामुळे कोणीही या खरेदी करायच्या बहाण्याने कोणी बाहेर पडू नका....आणि हो ही परिस्थिती सर्वत्र आहे .....उगीच पेट्रोल जाळून बाहेर फिरू नका...... *शाब्बास परभणीकर.....परभणी जनता सर्वत्र बंद आहे* *जनता कर्फ्यु 100%* पाळला जात आहे उगीच आता कोणी पाहायला बाहेर पडू नका-आज 22 मार्च रोजी रात्री 9 पर्यंत आपण हा बंद पाळणार आहोत.....उद्या 23 मार्च सुद्धा गरज नसेल तर बाहेर पडू नका.....आणि काही माहिती हवी असल्यास एकमेकांना फोन करून विचारा ..आणि काही बातमी घटना तुम्हाला दिसली तर *9764028372* वर व्हाट्सएप करा *मंदार कुलकर्णी* *संपादक टिळक रत्न* (जनहितार्थ प्रसिद्ध) ✌🏼🙋🏻‍♂✌🏼🙋🏻‍♂✌🏼🙋🏻‍♂🚷

हिंदू जनजागृती समितीचे मानवत येथे कोरोना संदर्भात नागरिकांचे प्रबोधन

Image
मानवत (परभणी) येथे हिंदू जणजागृती समितीच्या वतीने नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले 22 मार्च जनता करफीयुला समस्त नागरिकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन मानवत (प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की कोविद-19 (कोरोना-19) विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी 22 मार्च रोजी सकाळी 7 रात्री 9 पर्यंत जनता कर्फ्यु चे आवाहन केले आहे पंतप्रधान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जगभरात पहिल्यांदाच नागरिकांनी राष्ट्र हितासाठी स्वतःहून लावून घेतलेला बंद असेल या उपक्रमात सहभागी होणे हे सर्व नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे कोरोनाच्या संकटकाळी हिंदू जन जागृती समितीही या उपक्रमात सहभागी आहे 21 मार्च रोजी सर्वत्र देशव्यापी प्रबोधन करण्यात आले मानवत येथे भाजी मंडई परिसर बस स्थानक परिसर मध्ये कार्यकर्ते हातात प्रबोधणं फलक घेऊन उभारले होते यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांनी देखील सहभाग नोंदवला  सर्वांनी सॅनिटाईजर व मास्कचा वेळोवेळी वापर करावा, यात नागरिकांनी कोरोना 19 च्या विरोधात लढण्यासाठी समबंधीत खात्याने सांगितल्या प्रमाणे  सर्व सूचनांचे काटेकोर पालन सर्वांनी करावे, 22 मार्च

मास्क वापरकर्त्यानो जर लक्ष द्या....हे काय करताय

Image
* मास्क वापरकर्त्यांनो लक्ष द्या *                        😷😷😷😷😷😷😷😷 कोरोनाशी लढण्याची संपूर्ण तयारी सरकारने व नागरिकांनी केली आहे पण आज सर्वत्र एक चित्र दिसून येत आहे की जो तो एक सॅनिटाईजर बॉटल प्रत्येक वेळी वापरात आहेत आणि हिरवा रंगाचा सिंगल युज मास्क बिनधास्त वापर करताना दिसत आहे तसेच हे मास्क वापरताना दिवसभरातून कित्येक वेळा तो तोंडावरून काढला देखील जातो आहे वापर झाल्यावर कुठेही मास्क फेकण्यात येत आहे हा गंभीर प्रकार नागरिक करत आहेत.  सर्व डॉक्टर सांगत आहे की सगळ्यांनी मास्क लावण्याची गरज नाहीये मास्क कोणी लावावा ज्यांना सर्दी खोकला सारखे त्रास आहेत त्यांनी मात्र लावावे आणि सिंगल युज वापर नंतर थेट फेकून न देता मास्क व्यवस्थित गुंडाळून डस्टबिन मध्ये टाकावे नागरिकांनी यापुढे काळजी घ्यावी. गरज पडल्यास धुतलेला स्वच्छ रुमाल तोंडावर बांधवा वापरा नन्तर गरम पाण्यात धुवावा....तसेच विनाकारण मास्क घालण्याचे टाळावे .... * जनहितार्थ सादर * * संपादक टिळक रत्न *😷😷😷😷

पुणे मुंबई इत्यादी महानगर मधून आलेल्यांनि 14 दिवस घरातच राहावे ....गर्दीत येऊ नये

परभणी (प्रतिनिधी):- कोरोना बाधित शहरातून सरकारने लॉक डाउन घोषित केल्याने नागरिक विद्यार्थी सुरक्षा कारणास्तव मोठ्या प्रमाणात हे  शहरे सोडून आपापल्या गावी परत येत आहेत  पुणे मुंबई इत्यादी महानगरातून परभणीत व इतर गावात दाखल होत असलेल्या नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी येते 14 दिवस म्हणजे 31 मार्च पर्यंत बाहेर गर्दीत न येता घरीच राहावे व स्वच्छते बाबतीत सर्व उपाय करावेत जर श्वसनाचा काही त्रास होत असल्यास त्वरित शासकीय रुग्णालयाशी 02452-223458 वर सम्पर्क करावा व उपचार करून घ्यावेत असे प्रशासनाच्या वतीने  परभणी जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी आवाहन केले आहे

राशन दुकानात लाभार्थ्यांना अंगठा अथवा बोट न लावता राशन मिळणार.....

Image

कोरोना मुळे मंगल कार्यालयात होणारा विवाह रद्द करून...गर्दी न जमवता घरीच कार्य उरकायचे ठरले

Image
बीड :- येथिल प्रसिद्ध संगीतशिक्षक, गायक सुदर्शन धुतेकर यांचा मुलगा युवाउद्योजक कौशिकचा शुभविवाह १९ मार्चला २०२० रोजी घरीच मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होणार आहे. धुतेकर कुटुंबाने घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे.घरातले  पहिले मंगलकार्य असल्यामुळे काही महिन्यांपासून तयारी सुरु होती.मोठ्या थाटामाटात हा सोहळा होणार होता.परंतु ऐनवेळी आलेले कोरोना संकट लक्षात घेऊन हा सोहळा पुढे न ढकलता घरीच करायचे ठरवले.बाहेर गावच्या नातेवाईकांना, मित्रांना  न येण्याची विनंतीही केली .शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत ,सामाजिक भान जपत धुतेकर आणि कुलकर्णी परिवाराने घेतलेला निर्णय खरंच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.संपर्क टाळणे हाच कोरोनापासून बचाव आहे. कौशिक-श्रावणी यांना  शुभेच्छा आणि आशिर्वाद 

प्रतिबंधित मागूर माशांचा मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला

Image
प्रतिबंधित मागूर माशांच्या मत्स्यसाठ्यावर कारवाई अलिबाग (वृत्तसंस्था)- राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांनी दि. 22 जानेवारी 2019 च्या आदेशान्वये विदेशी मागूर (Clarius gariepinus) याचे देशातील अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग या कार्यालयाने जिल्ह्यातील मागूर मत्स्यसाठ्यांवर कारवाई करण्यास सूरूवात केली आहे.  दि. 6/3/2020 रोजी पनवेल तालूक्यातील पनवेल, कामोठे, खारघर आणि तळोजे येथील मासळी विक्री केंद्रास भेट देण्यात आली. यावेळी कामोठे येथील एक व तळोजा येथील आठ मत्स्यविक्रेते मागूर माशांची विक्री करताना आढळले. या विक्रेत्यांना नोटीस देण्यात आली असून या माशांची या पुढे विक्री करू नये अशी समज देण्यात आली.  दि. 7/3/2020 रोजी खालापूर तालूक्यातील या विभागाच्या पथकाने पाहणी केली असता महड गावातील एका मत्स्यसंवर्धकाच्या तलावामध्ये प्रतिबंधित मागूर मत्स्यसाठा आढळला. या मत्स्यसंवर्धनास यापूर्वी नोटीस देऊन देखील मत्स्यसाठा नष्ट केला नव्हता. त्याअनुषंगाने या कार्यालयाच्या पथकाने मत्स्यसंवर्धन तळ्यांच्या बाजूला ख

परभणीत चिरायू हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण आढळून आला ही बातमी अफवा आहे

Image
परभणी :- आज परभणीत चिरायू हॉस्पिटल येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात विविध सोशल मीडियावर व काही न्युज चॅनेल व्हायरल झाली होती परंतु सम्पूर्ण पडताळणी नंतर असे निदर्शनास आले की ही बातमी अफवा होती तसेच हॉस्पिटल प्रशासनाने लेखी कळवल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण सौम्य झाले  प्रशासनाने हा खोडसाळपना करणाऱ्या लोकांचा तपास करून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले  आहेत आता पर्यंत जिल्ह्यात 3 संशयित रुग्ण आढळून आले आहेत त्याना आयसोलेशन वॉर्ड मध्ये दाखल केले असून त्यांचे नमुने तपासणी करिता पुणे येथे लॅबकडे पाठवले आहेत पण त्या या कोरोना झालाच आहे असे नाही उद्या पर्यंत याचा अहवाल प्राप्त होईल त्यानुसार त्यांचेवर पुढील उपचार सुरू केले जातील बाकी सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कळवण्यात आले आहे नागरिकांनी कोणत्याही बातमीची शहानिशा न करता कोणत्याही पोस्ट अथवा व्हिडीओ किंवा फोटो समाज माध्यमातून व्हायरल करू नयेत अन्यथा अफवा पसरवण्याच्या गुन्हा दाखल केले जातील असे जिल्हाधिकारी दि म मुगळीकर यांनी कळवले आहे

आपत्काळ म्हणतात तो हाच ...सर्व ठिकाण उद्या पासून बंद दिसणार..नागरिकांनी सावधगिरी पाळावी

Image
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सिनेमागृहे, मॉल इतर दुकाने नाटयगृहे बंद  *नगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्या राहणार बंद * 31 मार्च 2020 पर्यंत असणार बंद परभणी (प्रतिनिधी):- शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1887 दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागु करून अधिसूचना निर्गमित केली आहे. करोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका,  सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा व अंगणवाडया,  महाविदयालो व आयुक्त, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये, निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदी नुसार सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेने दिनांक 31 मार्च ,2020 पर्यत बंद ठेवणे बाबत सूचित करण्यात आले आहे.      उपसचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे दिनांक 14 मार्च 2020 च्या पत्रानुसार  सर्व नगरपालिका, सर्व नगरपंचायत क्षेत्रातील 10 वी व 12 वी च्या परिक्षा

उन्हामुळे अथवा उष्णतेने खरंच कोरोना मरेल का ?

Image
उन्हामुळे खरंच कोरोना मरेल का ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे आणि सगळे पण हेच म्हणत आहेत की होऊद्या उन्हाळा सुरू कोरोना पळून जाईल पण सत्यता काय आहे  सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे ४,५०० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले आहेत. भारतामध्ये लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. वाढत्या तापमानामध्ये कोरोना जिवंत राहू शकत नाही, असं बोललं जात होतं. पण उन्हामुळे कोरोना मरतो, हे सिद्ध करणारा कोणताही अभ्यास झालेला नाही किंवा तसे पुरावेही नाहीत, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. याकरिता नागरिकांनी प्रत्येकवेळी स्वच्छता राखलेली बरी राहील हाच खूप महत्त्वाचा व अत्यावश्यक उपाय सर्वांनी सातत्याने करावेत अश्याने किमान करोनाची लागण होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणत टाळता येतो कोरोना व्हायरस दूर ठेवणं कठीण आहे. कोरोनावर लस तयार करायला निदान एक ते दीड वर्ष लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतातल्या ३० विमानतळांवर १०.५ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसंच दीड हजार जणं निरिक्षणाखाली आहे, असंही आरोग्य मंत्राल

मनपाने पाणी पुरवठा वेळापत्रक माहिती वेळोवेळी वृत्तपत्र व वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याची मागणी

Image
परभणी(प्रतिनिधी):- परभणी शहर महानगर पालिकेने पिण्याचे पाणी पुरवठा करताना वेळापत्रक याची माहिती नागरिकांना द्यावी अशी मागणी नागरिकांकडूूून केेली जात आहे .  मनपा द्वारे कधी व कोठे व कोणत्या दिवशी पाणी पुरवठा होईल याची माहिती सध्या सर्व नगरसेवक आपापल्या व्हाट्सएपच्या प्रभागाच्या केलेल्या ग्रुप मधून करतात पण त्यांच्या ह्या ग्रुप मध्ये सर्वच नागरिक असतील याची खात्री नसते त्याच बरोबर पाणीपुरवठा मध्ये शहरातील काही भागात दुजाभाव केला जात असल्याचे पण बोलले जात आहे.काही भागात पाणी पुरवठा सुरू असला तरी नळाला पाणी येत नाही तर काही भागात पुरवठा कधीही होतच असतो असे प्रकार दिसत आहे, नागरिक तर येथपर्यंत चर्चा करत आहेत की मनपाला खात्री नाही की ते सांगतात त्यावेळच्या खरच पाणी जाते की नाही म्हणून ते नगरसेवकांवर ही बाब सोडून मोकळे होत आहेत. तसेच बरेच नागरिक पाणी पुरवठा नियोजन माहीत नसल्याने पाण्यापासून वंचित राहतात. अथवा शेजाऱ्याने मोटार लावली याचा आवाज ऐकून पाणी आल्याचे ग्राह्य धरतात. पाणी न मिळाल्यास 15 दिवस पाणी विकत घायवे लागत आहे हा आर्थिक भुरदण्ड नागरिकांना सहन करावा लागत आहे  त्यामुळे जर अध

आमदारांना गाडी घेण्यासाठी सरकारकडून ३० लाख..!

Image
आमदारांना गाडी घेण्यासाठी सरकारकडून ३० लाख..! मुंबई :- विधानसभेत सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली. अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर सन्माननीय सदस्यांकडून तारांकित प्रश्नांच्या तासाला प्रश्न उपस्थित केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी उपस्थित प्रश्नांची उत्तरे दिले. दरम्यान,आमदारांना गाडी घेण्यासाठी सरकारकडून १० लाखाची रक्कम दिली जाते. त्यात वाढ करून ३० लाखांवर नेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे अजित पवारांनी आज स्पष्ट केले.

राज्यातील प्रत्येक उद्योगामध्ये 80% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिलाच पाहिजे

Image
मुंबई :- राज्यातील उद्योगांमध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार देण्याबाबत कायदा असून त्याची सर्व उद्योगांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.  पण याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसून येत नाहीये  स्थानिकांना रोजगार का मिळत नाहीयेत व त्यांना स्वतःचे गाव सोडून दुसऱ्या गावात रोजगार प्राप्तीसाठी जाण्याची वेळ का येते याकडे पण लक्ष देणे आवश्यक झाले आहे. दरम्यान जे उद्योग या नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कठोर निर्बंध लादण्याच्या सूचना उद्योग संचालनालयास देण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या कारवाईमुळे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास-पोलीस कारवाईचे सर्वस्तरातून झाले कौतुक

Image
परभणी(प्रतिनिधी):- परभणीतील वर्दळीच्या ठिकाणी हातगाडीवाल्यानी ठीक ठीकानी रस्ते अडवून आपले व्यवसाय थाटले आहेत यामुले शहरातील वाहतूक कोंडी होत होती अनेकवेळा याविषयी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या पण कारवाई पुरते गाडीवाले गायब होत होते व पोलीस गेले की परत रस्त्यावर येत असत यात मनपा केवळ बघ्याची भूमिका बजावत आली आहे .आज परभणीत पोलिसानी परत एकदा कारवाई केल्याने रस्त्यानि मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आज आर आर टॉवर परिसर,अष्टभुजा मंदिर परिसर,गांधी पार्क,गुजरी बाजार,आदी भागातील रस्ते हातगाडीमुक्त दिसून आले, पोलिसांनि केलेल्या करवाईवर सर्वस्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे यात आता मनपाने नेहमी प्रमाणे केवळ बघ्याची भूमिका न घेता इतर अतिक्रमण देखील तात्काळ दूर करून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करण्यास पोलीस प्रशासनच्या हातात हात मिसळून कार्य करावे नागरिकांना वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी हीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत

आमदारांच्या PA ला 25 हजार पगार तर ....ड्रायव्हरची मजा .....आता सरकारी पगार मिळणार

Image
मुंबई (वृत्तसंस्था):-  आमदारांच्या वाहनचालकाला देखील आता दरमहा 15 हजार रुपये वेतन मिळणार आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. त्‍यामुळे या अधिवेशनात आमदारांच्या विकासनिधीतही एक कोटींनी वाढ होऊन तो आता तीन कोटी रुपये झाला आहे. आमदारांच्या वाहनचालकांचाही पगार आता सरकार देणार आहे. यामुळे सरकारवर दरवर्षी 6.60 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी याबाबतचे विधेयक विधानसभेत मांडलं. आधी स्वीय सहायकाला दरमहा 15 हजार रुपये पगार मिळायचा. मागच्या सरकारने त्‍यात वाढ करून तो 25 हजार रुपये केला. वाहनचालकाला देखील सरकारने पगार द्यावा, अशी आमदारांची मागणी होती. त्‍याला अनुसरून हे विधेयक मांडण्यात आलं. एकमताने ते मंजूरही करण्यात आलं आहे.

आजच्या युगात आपण आपल्या माणसांच्या अधिक जवळ आलो आहोत की दूर विचारा मनाला

Image
आपण आज काल खूप तुसडे का वागतो आहोत ? हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो. पूर्वी कुठल्याही सणा - समारंभाला माणसे जमली की एकमेकांना भेटत असत. गप्पा तर संपता संपत नसत. कार्यक्रमस्थळी म्हणजे घरामध्ये, मंडपामध्ये, कार्यालयामध्ये एखादे कुटुंब शिरले की त्याचे सहजपणे विभाजन होऊन पुरुष मंडळी आपापल्या वयाच्या पुरुष गटात, स्त्रिया त्यांच्या गोतात तर लहान मुले इतर मुलांमध्ये झटकन मिसळून जात असत. पुरुष पानसुपारीच्या तबकाभोवती किंवा एखाद्याची चंची उघडून गप्पाष्टक सुरु करीत. मुलांचा कुठलेही खेळणे उपलब्ध नसले तरी धुडगूस सुरु होत असे. तमाम स्त्रियांच्या वनितवृंदाचा खास एपिसोड सुरु होई. त्यावेळीही कुटुंबाकुटुंबांमधील मानापमान, माणसांमधील हेवेदावे होते. बायकांमधली असूया, धुसफूस, अबोला असायचा. मुलांचे एकमेकांना चिडवणे, बोचकारणे असायचे. तरीदेखील यासर्व गोष्टींच्या अस्तित्वासह लोकं एकमेकांना भेटत होती, एकमेकांकडे जात होती, बोलत होती. लग्नांमध्ये मानापानांवरून भांडणे व्हायची, रुसवे फुगवे व्हायचे. वितुष्ट,अबोला असला तरी तो फार थोड्या प्रमाणात असायचा. हे सारे अगदी बळवंतराव, सदुकाका, दामुअण्णा, अनुसूया

ऑपरेशन लोटस ज्योतिरादित्य सिंधिया भाजपात दाखल होणार- मोदी व शहा यांची घेतली भेट

Image
(नवी दिल्ली वृत्तसंस्था) -  मध्य प्रदेशातील  राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली, या बैठकीत कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत.  काँग्रेस  नेते ज्योतिरादित्य शिंदे पक्षावर नाराज असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आज केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा  यांच्यासह ज्योतिर्रादित्य शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. मध्य प्रदेश मध्येे राजकीय भूकंप घडला आहे  ऑपरेेेशन लोटस ला यश आले असे म्हणावे लागेल  आणि ज्योतीरादित्य सिंधिया यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी नक्कीच धोक्याची घंटा आहे 

होळी, रंगोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारीनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

Image
होळी, रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या वैशिष्ट्यांसह साजरा होत असलेल्या रंगांच्या या सणाच्या माध्यमातून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री व बंधुभाव वृद्धिंगत होतो व त्यातून राष्ट्रीय ऐक्यभावना दृढ होते. या आनंददायी सणानिमित्त मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भर आंदोलनात शिव्या देणे पडले महागात-झाली अटक

(परभणी : वृत्तसंस्था)  सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. तसेच राज्यातही या कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. परभणीच्या पाथरीत याच आंदोलना दरम्यान दिलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींना शिवी देण्यात आली आहे. शिवी देणं या व्यक्तीला चांगलंचं भोवलं आहे. भाजप तालुकाध्यक्षाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाथरी पोलीस ठाण्यात पंतप्रधान यांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर प्रकरणी शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला पाथरी पोलिसांनी मानवत येेेथिल शेख गणी  शेेेख रहमान यांना अटक केली आहे. पाथरी तहसील कार्यालया समोर सुरू असलेल्या सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात आंदोलनात मानवत येथील रहिवाशी शेख गणी शेख रहमान यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केली आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओव सर्वत्र व्हायरल होत आहे. याच व्हिडीओचा आधार घेऊन भाजप शहराचे जिल्हाध्यक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या शेख गणी शेख रहमान यांच्याविरोधात कलम 112 आणि 117 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची

हातगाड्यावर अन्न पदार्थ विक्रेत्यांना ड्रेसकोड ठरला तो परिधान करून व्यवसाय करावा

Image
हातगाड्यांवरील अन्न पदार्थ विक्रेत्यांना आता ‘ड्रेसकोड’ ·अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ड्रेसकोड वाटपाचा शुभारंभ · ॲप्रॉन, हॅन्डग्लोज व कॅपचे वाटप,   (बुलडाणा/प्रतिनिधी) :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून राज्यातील सर्व हातगाड्यांवरील अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ड्रेस कोड लागू करण्यात येत आहे. . त्यानुसार सदर मोहिमेची सुरूवात आजपासून बुलडाणा शहरातून करण्यात आली. अन्न्‍ व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज चिंचोले चौक, चौपाटी येथे हातगाडीवर पाणीपुरी, पावभाजी, भेळ, चायनीज, आईसस्क्रीम आदी अन्न्‍ पदार्थ व्रिकेत्यांना ॲप्रॉन, हॅन्डग्लोज व कॅपचे या ड्रेसकोडचे वाटप केले. तसेच विक्रेत्यांच्या हातांची, नखांची स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून तपासणी करीत त्यांचे परवानेही तपासले.     यावेळी  पालकमंत्री म्हणाले, सर्व हातगाडीवरील अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी चांगल्या व स्वच्छ वातावरणात विक्री करावी. त्यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळावी.

आजच्या तरुणाईने देश धर्म माता व पिता यांना अभिमान वाटावा असे कार्य करावे

Image
आजच्या युवकांनी देश धर्म माता व पिता यांना अभिमान वाटावा असे कार्य करावे (परभणी/प्रतिनिधी )शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि त्याचा गाभा अभिमान वाटावा असे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले त्यामुळे प्रत्येक मुलांनी आपल्या आई-वडिलांना देशाला व धर्माला अभिमान वाटावा असे असे विधायक कार्य करावेत असे  प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचे शिष्य डॉक्टर रामपाल महाराज धारकर यांनी केले. शहरातील कारेगाव रोड वरील उघड़ा महादेव येथे (दी.8) रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवसेना उपशहरप्रमुख सचिन पाटील यांच्यावतीने  आयोजित  किर्तन आणि व्याख्यान सोहळ्याच्या  प्रसंगी डॉ.रामपाल महाराज धारकर बोलत होते.  यावेळी  झी टॉकीज फेम,युवा कीर्तनकार  विनोदाचार्य ह भ प शिवलिलाताई पाटील महाराज,  डॉ.रामपाल महाराज ,महापौर अनिता रविंद्र कांबळे, शिवसेना महिला आघाडी  जिल्हाध्यक्ष सखुबाई लटपटे ,मनपा सदस्य  विशाल बुधवंत , विधिज्ञ पवन निकम , प्रा.डॉ.शिवाजी पौळ, आयोजक  तथा शिवसेना उपशहर प्रमुख सचिन पाटील आदींची उपस्थिती होती . पुढे बोलताना

कामगार कल्याण मंडळ आयोजित नाट्य स्पर्धेत परभणीच्या सृजनमयसभा नाटकाला पारितोषिक

Image
कामगार कल्याण मंडळ आयोजित नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत परभणीच्या सृजनमयसभा या रविशंकर झिंगरे लिखित व दिग्दर्शित नाटकाला सांघिक चतुर्थ पारितोषिक तसेच अभिनया साठी किशोर पुराणिक व अर्चना चिक्षे यांना तर नेपथ्यासाठी  रेवती पांडे यांना वयक्तिक पारितोषिके जाहीर झाली. सर्व कलाकारांवर परभणीतील नाट्य प्रेमीकडून शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे

शहरातील खाद्य पदार्थांचे ठेले व गाडे बनताहेत मद्यपीचे मिनी वाईनबार

*शहरातील खाद्य पदार्थांचे ठेले व गाडे बनताहेत मिनी वाईनबार* परभणी शहरात रस्त्याच्या कड्याला अनेक खाद्य पदार्थांच्या गाड्यांची चांगलीच संख्या दिसून येते. त्या गाड्यांवर जावून नागरिक सुद्धा आपल्या जिभेचे लाड पुर्ण करतात. अशाच गाड्यांमध्ये अनेक ठिकाणी अंडाभुर्जीच्या गाड्या सुद्धा लागतात. परंतु, या अंडाभुर्जी विक्रेत्यांकडून ग्राहकांना त्यांच्या दुकानाजवळ टाकण्यात आलेल्या बाकड्यांवर बसून खुलेआम मद्य पिण्याची मुभा देण्यात येते. त्यामुळे या चायनीज  व अंडाभुर्जीच्या गाड्या दिवसेंदिवस अनधिकृतरित्या मिनी वाईनबारच होत असल्याचे चित्र शहरातून दिसत आहे .बेरोजगारीचे  प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे. शिक्षण घेवूनही नोकर्‍या मिळत नसल्याने अनेकांनी हातगाड्यांवर विविध धंदे करायला सुरुवात केली आहे. कोणी फळे विकतो, कोणी भाजीपाला, कोणी कपडे तर कोणी खाद्यपदार्थ विकतात. जास्तीचे पैसे कसे मिळतील याकडे त्यांचा सर्वाधिक लक्ष असल्याने, आपल्याकडून अवैध धंदे होत आहेत, याची पुसटशीही कल्पना याना नसते. त्यातून अवैध धंदे दिवसेंदिवस भररस्त्यावर वाढताना दिसत आहे. काही बेरोजगारांनी खाद्य पदार्थांबरोबरच चायनीज व अंडा