Posts

Showing posts from August, 2021

सारथीच्या प्रगती बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पत्र

Image
मराठा समाजातील युवकांसाठी नोकऱ्या, शिष्यवृत्ती, वसतिगृहे तसेच सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ▪️मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासदार संभाजीराजे  छत्रपती यांना पत्र      मुंबई दि १९ ऑगस्ट (प्रतिनिधी):-  मराठा समाजाच्या समाजाच्या हितासाठी राज्य शासनाने केवळ गांभीर्याने विचारच केलेला नाही तर अनेक मुद्द्यांवर कार्यवाही देखील केली आहे. याविषयीची संपूर्ण माहिती देणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिले आहे.  आरक्षणाच्या मुद्द्यावर भोसले समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल केली असून, अद्याप ती न्यायप्रविष्ट आहे. त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असेही या पत्रात म्हटले आहे. *राष्ट्रपती, पंतप्रधानांना विनंती* राज्य विधानमंडळाने देखील आरक्षणाची 50%इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता घटनेत योग्य ती सुधारणा करावी अशी शिफारस केंद्र सरकारला ठरावाद्वारे केली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र देण्यात आले असू

कोविड योद्धा किशोर कुऱ्हे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Image
 कोविड योद्धा किशोर कुऱ्हे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव नांदेड (प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर अशोकराव कुऱ्हे यांचा पालक मंत्र्याच्या हस्ते गौरव करण्यात आला. मागील दोन वर्षापासून कोविड-१९ काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल रविवार दि.१५ आँगष्ट रोजी स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी,जिल्हाधिकारी डाँ.विपीन ईटनकर,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,मनपा आयुक्त डाँ.सुनिल लहाणे,अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी आदीं उपस्थित होते.

परभणीचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल ह्यांनी काढले कर्मचारी बदलीचे आदेश

Image
 एकाच जागी सहावर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ▪️जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काढले आदेश  परभणी, दि. 9 – ज्या कर्मचाऱ्यांच्या एकाच ठिकाणी सहावर्षापेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी केल्या. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समुपदेशन करुन पात्र कर्मचारी यांच्या बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ हजर होण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात आदेश दिले. आपल्याला उपलब्धतेनुसार कर्मचाऱ्यांना मनाजोगे ठिकाण मिळालेले आहे. नवीन ठिकाणी बदली झालेले कर्मचारी यापुढेही चांगली सेवा बाजावतील असा विश्वास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला. बदली झाल्यामध्ये सहा वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेले मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, लिपिक यांचा समावेश आहे. कर्मचारी उपलब्धतेनुसार ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणीकर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी निवड मंडळाचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, सदस्य तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सदस्य तथा उपजिल्हाधिकारी सामान्