Posts

Showing posts from September, 2020

कोविड 19 च्या आपद्ग्रस्त परिस्थितीत कार्यालयात अधिकारी कर्मचारी उपस्थिती 100% हवी - राज्य सरकार, अधिकारी म्हणतात ही जबरदस्ती योग्य नाही

कोविड 19 च्या आपद्ग्रस्त परिस्थितीत कार्यालयात अधिकारी कर्मचारी उपस्थिती 100% हवी - राज्य सरकार, अधिकारी म्हणतात ही जबरदस्ती योग्य नाही , कोविडवर ठोस उपाययोजना केल्या शिवाय येणार नाही कार्यालयात आम्ही  परभणी (प्रतिनिधी) :- राज्य शासनाच्या वतीने कोविड 19 च्या आपद्ग्रस्त काळात राज्य कार्यालयात अधिकाऱ्यांच्या उपस्थिती 100% असावी असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे पण अमलबाजवणी होताना दिसून येत नाही यावर अधिकारी वर्गाचे कर्मचाऱ्यांचे असे म्हणणे आहे की  कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ह्यात अनेक अधिकारी मृत्युमुखी देखील पडले आहेत यावर राज्य शासनाने कोणत्याही प्रकारे ठोस उपाय आद्यप पर्यंत केले नाहीत कसे काय आम्ही कार्यालयात 100% उपस्थित कसे रहायचे असा सवाल त्यांनी यावर उपस्थिती केला आहे. अधिकारी वर्गाची 100% उपस्थिती राज्य शासनास हवी असल्यास एकदम सर्वांना वेठीस न धरता टप्याटप्याने वाढवण्यात यावी सर्व अधिकारी लोकांना विमा कवच देण्यात यावे कोविड 19 विशेष रजेचे प्रावधान मंजूर करावे व कोविडला तातडीच्या आजारात समावेश करावा क्षेत्रीय भेटी दरम्यान अधिकारी वर्गाला पी पी ई किट देण्यात यावेत त

सनातनचे मडगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपी साधक निर्दोष मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडून शिक्कामोर्तब

सनातनचे मडगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपी साधक निर्दोष मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडून शिक्कामोर्तब मडगाव (गोवा) – मडगाव येथे वर्ष २००९ मध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्फोटाच्या प्रकरणी ६ आरोपींच्या निर्दोषत्वावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने शिक्कामोर्तब केले.या प्रकरणी विनय तळेकर, दिलीप माणगावकर, विनायक पाटील, प्रशांत जुवेकर, धनंजय अष्टेकर आणि प्रशांत अष्टेकर या ६ जणांना गोव्यातील विशेष न्यायालयाने ३१ डिसेंबर २०१३ या दिवशी निर्दोष ठरवले होते. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान याचिका (अपील) प्रविष्ट केली होती. यावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद १६ सप्टेंबरला पूर्ण होऊन निर्णय राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर १९ सप्टेंबर या दिवशी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत ‘एन्.आय.ए.’ची आव्हान याचिका (अपील) फेटाळून लावली. या वेळी एन्.आय.ए.च्या बाजूने अतिरिक्त शासकीय अधिवक्ता प्रवीण फळदेसाई यांनी, तर आरोपींच्या बाजूने अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि अधिवक्ता ना

परभणीत १ कोटी ८४ लाखांचा फळपीक विमा परतावा मंजूर - जिल्हा कृषी अधिकारी संतोष आळसे

Image
परभणीत १ कोटी ८४ लाखांचा फळपीक विमा परतावा मंजूर करण्यात आले आहेत  परभणी (प्रतिनिधी ):- पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत सन २०१९-२० मधील अंबिया बहारातील संत्रा, केळी, आंबा या फळविकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील १ हजार १०० शेतकऱ्यांना १ कोटी ८४ लाख ७५ हजार ८६९ रुपये विमापरतावा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिली.पुनर्रचित हवामान आधारित फळपीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षी जिल्ह्यातील ३७ कर्जदार आणि १ हजार २८७ बिगर कर्जदार असे एकूण १ हजार ३२४ शेतकऱ्यांनी ४५ लाख ४८ हजार ४३४ विमा हप्तात भरुन १ हजार ८८.७९ हेक्टरवरील फळपिकांसाठी ९ कोटी ९ लाख ६८ हजार ६८० रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या हिश्शाचा प्रत्येकी २ कोटी ३१ लाख ३१ हजार ८६ रुपये तसेच शेतकऱ्यांचा ९ कोटी ९ लाख ६८ हजार ६८० रुपये मिळून एकूण ५ कोटी ८ लाख १० हजार ६०६ रुपये विमा हप्ता विमा कंपनीकडे भरण्यात आला होता. जिल्ह्यातील ११८ केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ७ लाख ३ हजार २३० रुपये विमा हप्ता भरून १०६.५५ हेक्टरवरील केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते.

पिचकाऱ्या मारणाऱ्या लोकांवर कारवाईची शहरातील महिला नागरिकांची कळकळीची मागणी

Image
शहरातील महिला नागरिकांची कळकळीची मागणी परभणीत तंबाखुजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असली तरी (पण ह्यांना ह्यागोष्टी मिळतातच कशा हे लक्षात येत नाही ) आजही रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी बरेच युवक नागरिक तंबाखू पांनमसाला गुटखा खाऊन थेट थुंकताना दिसत आहेत यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त होते हे लोक विसरले आहेत की काय ? बर हे किळसवाणा प्रकार दुचाकीवरून जाताना दररोज करताना दिसून येत आहे मागे पुढे महिला लहान मुले आहेत का हे न पाहता थेट पिचकारी मारली जाते ह्याना याबाबत हटकले असता उद्धट भाषेत सॉरी म्हणटले जात आहे अशा लोकांवर ती थुंकी जागेवर हाताने साफ करण्याची शिक्षा करणे गरजेचे झाले आहे.....अन्यथा  गरीब बिचाऱ्या पानटपरी चालकांचे दुकाने परत एकदा बंद करा.....तसेच अनेक कार्यालय बँका सर्वत्र ह्या लोकांनी घाण पसरवण्याचा चंगच बांधलेला दिसतो पण कोणत्याही कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी याबाबत कोणालाही तंबी देताना आढळून आलेला नाही तरी अशा घाणेरडा प्रकार करणाऱ्या लोकांवर जागेवरच कारवाई करण्याची  मागणी महिला नागरिकांच्या वतीने होत आहे ...

माहीती व जनसंपर्क संचालनालय विभागीय संचालक गणेश रामदासी 12 सप्टेंबर रोजी परभणी आकाशवाणीवर

Image
माहीती व जनसंपर्क संचालनालय विभागीय संचालक गणेश रामदासी यांचा परभणी आकाशवाणीवर लढा कोरोनाशी कार्यक्रम  प रभणी (प्रतिनिधी):- माहिती व जनसंपर्क संचालनालय चे संचालक गणेश रामदासी यांचे कोरोना काळात वृत्तसंकलन करताना पत्रकारांनी घ्यावयाची काळजी याविषयी दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी "लढा कोरोनाशी"या कार्यक्रमांतर्गत भाषण परभणी आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणार आहे पत्रकार व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.

परभणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशीसह तिघे साडेचार लाख रुपयांची लाच घेतांना ए सी बी च्या जाळ्यात

Image
परभणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशीसह तिघे साडेचार लाख रुपयांची लाच घेतांना ए सी बी ने पकडले ... लाचलूचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई ः रंगेहात पकडले   परभणी, दि. 8 (प्रतिनिधी) )ः येथील निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, अभियंता हमीक अब्दूल खय्युम तसेच अव्वल कारकुन श्रीकांत करभाजने या तिघांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या पथकाने साडेचार लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल मंगळवार दि08 सप्टेंबर रोजी दुपारी रंगेहात ताब्यात घेतले. गंगाखेड येथील नगर पालिकेअंतर्गत विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत नगर परिषद विभागाने संबंधित नगरसेवकाच्या वतीने साडेचारलाख रुपयांची लाच मागीतली. तेव्हा संबंधितांनी याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. या ए सी बी च्या पथकाने काल सोमवार दि07 सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली तेंव्हा नगर पालिका प्रशासन विभागातील अव्वल कारकुन श्रीकांत विलासराम करभाजने, अभियंता अब्दूल हकीम अब्दूल खय्युम यांनी तक्रारकर्त्याकडून कामाच्या दीड टक्केप्रमाणे म्हणजे अंदाजे साडेचार लाख रुपये पं

परभणीत लॉक डाउन .... ? कोरोना बधितांची संख्या वाढतच चालली आहे..!

Image
परभणीत कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी एक वेळ कडक लॉक डाउन हवाच ..! लॉक डाउन केल्यावर घरोघर जाऊन थर्मल स्क्रीनींग व लागल्यास रॅपिड अँटिजेंन टेस्ट कराव्यात  परभणी (प्रतिनिधी) :- परभणी हे राज्यातील सर्व प्रथम जिल्हा होता ज्याने सर्वात आधी लॉकडाउन लावले व जिल्हयाच्या सीमा बंद करून टाकल्या नागरिकांनी देखील सोशल डिस्टन्स पाळले अनवश्यक घरातून बाहेर पडणे टाळले स्वच्छतेचे पालन केले त्यामुळे बरेच महिने परभणी कोरोना संसर्ग मुक्त राहिली नन्तर जस जसे लॉकडाउन शिथिल केल्या जाऊ लागले तसं तसे परभणीत कोरोना बाधितांची ख्या वाढत जाताना दिसून आली गंगाखेड ने संसर्ग कसा वाढतो याची झलकच दाखवली नागरिकांनी देखील सर्व नियम पाळण्यात शिथिलता आणल्याने परभणीत 1 रुग्ण आढळून येत नव्हता तेथे दररोज किमान 50 च्या वर कोरोना संसर्ग बाधित रुग्ण  मििळून येेे आहेेेत. पाहता पाहता परभणीत 3000 च्या वर कोरोना संसर्ग बाधित रुग्ण आढळून आले आणि ही संख्या वाढतच चालली आहेनागरिकांनी पण स्वतःचे कर्तव्य व कोरोना संसर्ग समबंधीत उपाय योजना पाळण्यात काटेकोरता पाळावी. व्यापारी लोकांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट केली असता शेकडो व्यापारी कोरोना पोस

SCR कडून 12 सप्टेंबर रोजी हैद्राबाद-परभणी-हैद्राबाद रेल्वे धावणार

Image
  SCR कडून 12 सप्टेंबर रोजी हैद्राबाद-परभणी-हैद्राबाद रेल्वे धावणार परभणी, (प्रतिनिधी)- देशातील अनलॉकच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून गेल्या बऱ्याच महिन्यांपासून बंद केलेल्या रेल्वेगाड्या हळूहळू सुरू करण्यात येवू लागल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने शनिवारी(दि.5) देशभरात एकूण 80 रेल्वेगाड्या 12 सप्टेेंबरपासून सुरू करण्याचे घोषित केले. यामध्ये दक्षिण मध्य रेल्वे विभागातंर्गत परभणी ते हैद्राबाद(07564) व हैद्राबाद ते परभणी(07563) ही एक्सप्रेस विशेष गाडी म्हणून दररोज नांदेड मार्गे धावणार आहे.गाडी क्र. 07563 हैदराबाद-परभणी दैनंदिन विशेष रेल्वे हैदराबाद येथून रात्री 10.45 वाजता निघून सिकंदराबाद, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा मार्गावरून परभणी स्थानकावर दुस-या दिवशी सकाळी 6.30 ला पोहोचणार आहे.परतीत गाडी क्र. 07564 परभणी-हैदराबाद दैनंदिन विशेष रेल्वे परभणी स्थानकावरुन रात्री 10.30 वा निघून वरील मार्गाने हैदराबाद येथे दुस-या दिवशी सकाळी 6.45 वाजता पोहोचणार आहे. याकरिता 10 सप्टेंबरपासून आरक्षण सुरू होणार आहे. रेल्वे बोर्डाने  परिपत्रका द्वारे घोषित केले.