पिचकाऱ्या मारणाऱ्या लोकांवर कारवाईची शहरातील महिला नागरिकांची कळकळीची मागणी

शहरातील महिला नागरिकांची कळकळीची मागणी

परभणीत तंबाखुजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असली तरी (पण ह्यांना ह्यागोष्टी मिळतातच कशा हे लक्षात येत नाही ) आजही रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी बरेच युवक नागरिक तंबाखू पांनमसाला गुटखा खाऊन थेट थुंकताना दिसत आहेत यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त होते हे लोक विसरले आहेत की काय ? बर हे किळसवाणा प्रकार दुचाकीवरून जाताना दररोज करताना दिसून येत आहे मागे पुढे महिला लहान मुले आहेत का हे न पाहता थेट पिचकारी मारली जाते ह्याना याबाबत हटकले असता उद्धट भाषेत सॉरी म्हणटले जात आहे अशा लोकांवर ती थुंकी जागेवर हाताने साफ करण्याची शिक्षा करणे गरजेचे झाले आहे.....अन्यथा  गरीब बिचाऱ्या पानटपरी चालकांचे दुकाने परत एकदा बंद करा.....तसेच अनेक कार्यालय बँका सर्वत्र ह्या लोकांनी घाण पसरवण्याचा चंगच बांधलेला दिसतो पण कोणत्याही कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी याबाबत कोणालाही तंबी देताना आढळून आलेला नाही तरी अशा घाणेरडा प्रकार करणाऱ्या लोकांवर जागेवरच कारवाई करण्याची  मागणी महिला नागरिकांच्या वतीने होत आहे ...

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन