Posts

Showing posts from August, 2023

बीआरएस चा परभणीत मोर्चा सम्पन्न

Image
 परभणीत भारत राष्ट्र समितीचा भव्य मोर्चा सम्पन्न  केंद्रेकर यांचा अहवाल लागू करा : अन्य मागण्यांचाही समावेश   परभणी,दि.22(प्रतिनिधी) : सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तेलंगना मॉडेलवर आधारित शेतकरी आत्महत्येंच्या पार्श्‍वभूमीवर दिलेल्या अहवालाची त्वरीत अंमलबजावनी करावी यासह अन्य मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीने मंगळवारी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला.  शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी तेलंगाना मॉडेल लागु करा या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव कदम यांच्या नेतृत्वाखाली धडकला .यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मराठवाड्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर विभागातील दहा लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले .या दहा लाख शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणात सुमारे चाळीस टक्के शेतकरी नैराश्यात असल्याचे तर एक लाख शेतकरी आर्थिक ताणामुळे आत्महत्य

म.शं.शिवणकर प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप 

Image
 शिवणकर प्रतिष्ठान वतीने गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप  परभणी : ता.15 - (प्रतिनिधी) - म. शं. शिवणकर प्रतिष्ठान,परभणी मार्फत आज दत्तक योजने अंतर्गत महात्मा फुले,नुतन विद्या मंदिर,भारतीय बाल विद्या मंदिर,ओयासीस व बाल विद्या मंदिर शाळेतील 15 गरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकल यांचे वाटप करण्यात आले. यात दैनंदिन जीवनात लागणारे इतर साहित्याचा पण समावेश होता! म शं शिवणकर सरांच्या संस्कारांच फलीत म्हणून व आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे घडत आहे असे प्रतिपादन म. शं. शिवणकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र मुंढे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगून शिवणकर सरांबद्दल ॠण प्रगट केले. या प्रसंगी वि.म.औंढेकर व प्रतिष्ठान चे सदस्य डाॅ.नवीनचंद्र मोरे,डाॅ. सचिन पाठक, अमोल पाचपोर,प्रवीण भानेगावकर,श्री.चट्टे सर ईत्यादी सदस्य उपस्थित होते.

22 ऑगस्ट रोजी -भारत राष्ट्र समितीचा परभणीत भव्य मोर्चा आयोजन

Image
 22 ऑगस्ट रोजी बीआरएस चा परभणीत भव्य मोर्चा  तेलंगणा राज्य प्रमाणे योजना महाराष्ट्र मध्ये लागू कराव्यात व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालाची गँभिर दखल घ्यावी ह्या मागणी करिता व सरकारने त्यांचा अहवाल फेटाळला याचा निषेध करिता मोर्चाचे आयोजन  परभणी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या शेतकरयांच्या आत्महत्या तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सरकार कडे सादर केलेला 1 लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत अहवाल महाराष्ट्र सरकारने  फेटाळून लावला ही शेतकरी वर्गाकरिता घेतलेली शासनाची भूमिकेच्या विरोधात व तेलंगाणा राज्यात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजना महाराष्ट्र राज्यात शेतकरी वर्गाला देण्यात याव्यात व सुनील केंद्रेकर यांनी सादर केलेला अहवाल राज्य सरकारने फेटाळून याचा निषेधार्थ बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीच्या वतीने परभणीत 22 ऑगस्ट 2023 रोजी शनिवार बाजार मैदान येथून दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यलयावर भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करणयात आले आहे तसेच परभणीतील सर्व शेतकरी बांधवाना त्यांनी यावेळी आवाहन केले की शेतकरी हक्कासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभ

मनपा हद्दीत प्रॉपर्टी नावे करून हवे, तर दे 4500 ....एसीबी ने केली अटक

Image
मनपा हद्दीत प्रॉपर्टी नावे करून हवे असेल तर दे 4500 ....मनपा करनिरीक्षक ला एसीबीने पकडले रंगेहात मनपा कर निरीक्षक पठाण शेरखान नूरखानला 11000 रुपये घेताना पकडले एसीबीने रंगेहाथ परभणी (प्रतिनिधी) :येथील परभणी मनपा  प्रभाग समिती क चे करनिरीक्षक ह्यांचे कडे तक्रारदार गेले व आपल्या आईच्या नावाने मनपा हद्दीत स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे ती नावावर करून द्यावी ह्याबद्दल 11000 रुपये फिस लागेल असे सांगितले ते 11000 रुपये घेताना एसीबीने  मनपा करनिरीक्षक पठाण शेरखान नूरखान, वय 53 ह्याला रांगेहाथ पकडले  याबाबत सविस्तर वृत्त असे तक्रारदारने आपल्या आईच्या नावाने परभणी मनपा हद्दीत स्थावर मालमत्ता खरेदी केली त्याकरिता लागणारे हस्तांतरण पत्र आईच्या नावाने मनपा द्वारे करायचे होते त्यांनी करनिरीक्षक आलोसे पठाण शेरखान नूरखान ह्यांना भेटले तर त्यांनी सदरील काम करणे करिता 11000 रुपये खर्च येतो ज्यात 6500 रुपये मनपाला भरायचे असतात व 4500 रुपये काम करणे करिता टेबलावर द्यावे लागतात तुरी असेल तर या काम करून देतो सदरील बाब तक्रारदार ह्यांना पटली नाही त्यांनी एसीबीला सदरील प्रकार कळवळा पोलीस अधीक्षक राजकुमार शिं