म.शं.शिवणकर प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप 

 शिवणकर प्रतिष्ठान वतीने गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप 




परभणी : ता.15 - (प्रतिनिधी) - म. शं. शिवणकर प्रतिष्ठान,परभणी मार्फत आज दत्तक योजने अंतर्गत महात्मा फुले,नुतन विद्या मंदिर,भारतीय बाल विद्या मंदिर,ओयासीस व बाल विद्या मंदिर शाळेतील 15 गरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकल यांचे वाटप करण्यात आले. यात दैनंदिन जीवनात लागणारे इतर साहित्याचा पण समावेश होता! म शं शिवणकर सरांच्या संस्कारांच फलीत म्हणून व आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे घडत आहे असे प्रतिपादन म. शं. शिवणकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र मुंढे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगून शिवणकर सरांबद्दल ॠण प्रगट केले. या प्रसंगी वि.म.औंढेकर व प्रतिष्ठान चे सदस्य डाॅ.नवीनचंद्र मोरे,डाॅ. सचिन पाठक, अमोल पाचपोर,प्रवीण भानेगावकर,श्री.चट्टे सर ईत्यादी सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन