Posts

Showing posts from May, 2020

कशी झाली नागठाणेकर महाराजांची हत्या वाचा सविस्तर वृत्त

Image
कशी झाली नागठाणेकर महाराजांची हत्या वाचा सविस्तर वृत्त सज्जनशक्तीवर दुर्जनांचा आघात बालतपस्वी निर्वाणरूद्र पशुपतींची धर्मभ्रष्ट माथेफिरूने केली हत्या ! नांदेड (प्रतिनिधी):- शिवसंस्कृतीचे प्रचारक आणि उमरी तालुक्यातील नागठाना मठाचे मठाधिपती बालतपस्वी श्रीगुरू निर्वाणरूद्र पशुपती शिवाचार्य महराजांची शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास लिंगायत धर्माच्याच एका धर्मभ्रष्ट माथेफिरूने गळा दाबुन हत्या केली. साईनाथ लिंगाडे असे या माथेफिरूचे नांव असुन, महाराजांची हत्या केल्यानंतर तो फरार झाला आहे. महाराजांच्या हत्येमागील स्पष्ट कारण अद्याप समोर अलेले नाही. मात्र घटनेच्या पार्श्वभूमी हाती आलेेलंयाा मााहितीनुसार महाराज नेहमी प्रमाणेच आपल्या रूममध्ये रात्री आराम करत असतांना रात्री १ च्या सुमारास साईनाथ लिंगाडे याने महाराजांच्या रूममध्ये प्रवेश करून तेथील महाराजांच्या पूजेसाठी असणार्‍य चांदीच्या काही वस्तु, सोनच्या अंगठ्या, विविध आभूूषणे आणि काही रोख रक्कम एका पिशवीत भरली. महाराजांना याची कुणकुण लागल्यानंतर ते जागे झाले असता लिंगाडे याने मोबाईल चार्जरच्या वायरने महाराजांचा गळा आवळून त्यांच

श्री श.ब्र. १०८ शिवाचार्य नागठाणकार महाराज यांच्या हत्याचे पडसाद परभणीत उमटले...हल्लेखोरांना तात्काळ फाशी देण्याची मागणी

Image
श्री श.ब्र. १०८ शिवाचार्य नागठाणकार महाराज यांच्या हत्याचे पडसाद परभणीत उमटले....तात्काळ फाशीच्या शिक्षेची मुख्यमंत्री कडे निवेदनाद्वारे मागणी परभणी   (प्रतिनिधी):-   श्री श.ब्र.१०८ सदगुरु निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य गुरुमाऊली नागठाणकर, उमरी मठ, जि. नांदेड यांची आज २४ मे रविवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली याचे पडसाद परभणीत उमटले परभणीत वीरशैव समाज वतीने मुख्यमंत्री याना निवेदनाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला या निवेदनात म्हणटले आहे की हल्लेखोर हे मठात घुसून मारत असतील तर ही बाब खुपच गंभीर आहे क्लेशदायक आहे. या आपत्कालीन परिस्थितीत साधु-संत आणि धर्मप्रचारकांवर हल्ले वाढत आहेत.  साधु-संतावर होणारे हे हल्ले केवळ दु:खदच नव्हे तर ते चिंताजनक व संतापजनक आहेत. या बाबतीत  महाराष्ट्र राज्य शासनाने गंभीर पाऊले उचलली पाहीजेत.  या जीवघेणा हल्ल्याचा तिव्र निषेध करण्यात आला आणि या प्रकरणाची सीआयडी अथवा सीबीआय मार्फत चौकशी करून हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे केल्यास धर्मप्रचारक आणि महाराजांवर यापुढे हल्ले करण्याची कोणी हिंमत करणार नाही. अशी निव

दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड परभणी औरंगाबाद चे आरक्षण केंद्र चालू - जनसम्पर्क अधिकारी दमरे

Image
दक्षिण मध्य रेल्वे आज २२ मे पासून नांदेड विभागातील सहा रेल्वे स्थानकावर आरक्षण केंद्र पुन्हा सुरु – ०१ जून पासून सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार नांदेड/परभणी (प्रतिनिधी):-  रेल्वे बोर्डाने कळविल्या नुसार  आज दिनांक २२ मे  २०२०  पासून नांदेड  विभागातील  सहा रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा प्रवाशांकरिता सुरु करण्यात आले आहे.  यात नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.         लॉक डाऊन आणि कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे आरक्षण कार्यालयाच्या वेळा पुढील प्रमाणे असतील  सकाळी - ०८.००  ते १२.००  वाजे पर्यंत दुपारी - १४.००  ते १७.००  वाजे पर्यंत  2)      तसेच रेल्वे बोर्डाने दिनांक ०१ जून २०२० पासून देशभर २०० विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. यात नांदेड विभागातून नांदेड-अमृतसर-नांदेड दरम्यान सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. हि गाडी दिनांक 1 जून रोजी नांदेड येथून गाडी संख्या ०२७१५ नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. तसेच दिनांक ०३ जून पासून अमृतसर येथून हि गाडी संख्या ०२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड विशेष

10 तासात रेखाटले 1080 गणपतीचे आर्ट स्केचेस ,महाराष्ट्र बुक ऑफ रेकोर्ड मध्ये उपक्रमाची नोंद

Image
दहा तासात बनवले १०८० गणेशा आर्ट स्केचेस                महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये  विक्रमाची नोंद    मुंबई (प्रतिनिधी):- मनोहर शिवाजी बाविस्कर (जन्म ०१ मे १९७६) हे प्रगती विद्यालय बोरवली, मुंबई या शाळेतील एक उपक्रमशील कलाशिक्षक असून त्यांनी आपल्या २०-२१ वर्षाच्या अनुभवाच्या माध्यमातून १४ मे २०२० रोजी दहा तासात १०८० गणेशा आर्ट स्केचेस बनवून एक नवा आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला. सकाळी नऊ वाजता या उपक्रमाला त्यांनी प्रारंभ केला. सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या पण काही कालावधीनंतर सराव झाल्याने त्यांचे काम पुढे सुरळीत चालू राहिले. जेवण आणि इतर गोष्टीसाठी त्यांनी दर तीन तासांनी अर्धा तास वेळ घेतला. सकाळी नऊ वाजल्यापासून दिवसभर ते आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. १०८० चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न  व काम चालू असताना त्यांच्या परिवाराने त्यांना बरीच मदत केली उदाहरणार्थ पाणी देणे, स्केच पेनने कलर देणे, लाईट, मोबाईल सिस्टम, व्हिडिओ चालू करणे या सर्व गोष्टींची त्यांनी त्यांना मदत केली. संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन कालावधी’ असल्यामुळे बाहेरून व्हिडिओ सिस्टम आणि कॅमेरा इत्यादी गोष्

श्रीराम काँग्रेसला काल्पनिक वाटतात ....मग आता मंदिराचे सोने हवे कशाला ...- हिंदू जनजागृती समिती

Image
श्रीरामाला काल्पनिक घोषित करणार्‍या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर ? 70 वर्षांतील विविध घोटाळ्यांत जनतेच्या लुटलेल्या 4 लाख 82 हजार कोटी रुपयांचा हिशेब काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावा ! - हिंदु जनजागृती समिती हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचे कपटी आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ज्या काँग्रेस पक्षाने भारताला सेक्युलर घोषित करून अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना आणि हाज यात्रा, इफ्तार, मौलानांचे वेतन यांच्यावर हजारो कोटी रुपये खर्च केले, एक रुपयाही कुठल्या मंदिराला दिला नाही, तसेच प्रभु श्रीराम काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले; रामसेतू नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही, असे सांगून रामसेतु तोडण्याचे षड्यंत्र आखले होते, त्या हिंदुविरोधी काँग्रेसला हिंदूंच्या मंदिराशी काही देणे-घेणे नसून केवळ मंदिरांतील धन आणि सोन्यावर त्यांचा डोळा आहे. मागील 70 वर्षे देशात काँग्रेसची सत्ता असतांना बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँड, 2-जी, कॉमनवेल्थ खेळ, अशा अनेक घोटाळ्यांत जनतेचे 4 लाख 82 हजार कोटी रुपये लूटल्याचे आकडेवारी सांगते. या भ्

मध्य प्रदेशातील नागरिकांना पाठवले घरी....आता गुजरातची बारी....करा नोंदणी

Image
424 मजूर व विद्यार्थी यांना मध्य प्रदेश येथे पोहचवण्यासाठी परिवहन विभागाच्या 18 बस रवाना तर जिल्ह्यात अडकलेल्या गुजरात राज्यातील नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन परभणी, ११ मे (प्रतिनिधी) - मध्य प्रदेश येथील  काही मजूर, विद्यार्थी, कारागीर, कामगार परभणी  जिल्ह्यात  लॉकडाउन काळात अडकून पडले होते. त्यानुसार आज दि 11 मे रोजी ह्या सर्व मजूर, विद्यार्थी व नागरिक यांना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून 3 बसद्वारे 48 विद्यार्थी व मजूर, पाथरी डेपो मधून 3 बसद्वारे 71, पूर्णा डेपो अंतर्गत 3 बसद्वारे 66, जिंतूर डेपो अंतर्गत 1बसद्वारे 20, सेलू डेपो अंतर्गत 4 बस द्वारे 114 आणि परभणी डेपो अंतर्गत एकूण 4 बसद्वारे 105 विद्यार्थी व नागरिक असे एकूण मिळून जिल्ह्यातील 18 बसद्वारे 424 विद्यार्थी , मजूर, कामगार व नागरिक यांना  नऊ मे रोजी च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार राज्याच्या सीमेपर्यंत मोफत प्रवासाची सोय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशान्वये करण्यात आली ..यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य ते पालन संबंधितांद्वारे करण्यात आले.. सदरील बस मधील प्रवाशाना पाथरी रोडवरील सरदेशपांडे नर्सरी प

परभणीत दस्तनोंदणी करायची असेल तर ऑनलाइन अर्ज करून तारीख मिळवा

Image
परभणी जिल्हातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी करिता ऑनलाईन अर्ज करून टोकन नंबर मिळवा परभणी(प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीसाठी  होणा-या गर्दीचे नियमन होण्यासाठी परभणी जिल्हातील दस्त नोंदवू इच्छीणा-या नागरीकांना खालील दिलेल्या लिंकवर अर्जाची नोंदणी करावी. त्यानंतर या अर्जामध्ये नमूद मोबाईल क्रमांकावर मॅसेज करून  दस्त नोंदणीसाठी तारीख कळविण्यात येईल. दस्त नोंदवू इ॑च्छीणा-यांनी त्यांचे अर्ज खालील लिंकवर दिनांक 10.05.2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत. खरेदीखत दस्त नोंदणी अर्जासाठी येथे क्लिक करा. https://forms.gle/NW5Y248HcMTgjTyD9    गहाणखत दस्त नोंदणी अर्जासाठी येथे क्लिक करा. https://forms.gle/JYKJTMDhPSXuxX6z6

दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय अयोग्य...समाज हितासाठी दारू विक्री बंद करावी - हिंदू जनजागृति समिती

Image
कोरोनाला रोखण्यासाठी अन् समाजाच्या हितासाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा ! - हिंदु जनजागृती समिती मुंबई/पुणे (प्रतिनिधी):- एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनतेच्या जिवावर बेतू नये, म्हणून सरकारांनी आर्थिक हानी सहन करत ‘दळणवळण बंदी’चा धाडसी आणि स्तुत्य निर्णय घेतला; मात्र दुसरीकडे केवळ महसूल वाढीसाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला ! यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढण्याचा धोका संभवतो. याशिवाय दारूमुळे होणारे महिलांवरील अत्याचार, मुलांवर होणारे चुकीचे संस्कार अन् उद्ध्वस्त होणारे लाखो संसार हे या निर्णयाचे फलित होऊ नये, यास्तव समाजाच्या सर्वांगीण हितासाठी आणि कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दारूची दुकाने चालू करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांनी तात्काळ मागे घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे. दारूची दुकाने उघडण्यास अनुमती मिळाल्यामुळे आज अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. देशातील कोरोनाचा प्रभाव आणि त्यामुळे होणारे मृत्यू वाढत असतांना दारूच्या दुकानांबाहेरील ही स्थिती अत्यंत भयावह आहे. सरकारांनी सा

रेल्वे प्रवास सेवा सुरू केलेली नाहीये........कोणीही रेल्वे स्थानकावर येऊ नका

Image
रेल्वे प्रवाशी सेवा चालू केली नाहीये ...कोणीही रेल्वे स्थानकावर येऊ नका- दमरे  दिनांक १७ मे -२०२० रात्री २४. ०० वाजे पर्यंत  सर्व प्रवाशी रेल्वे सेवा बंद आहे - श्रमीक विशेष गाड्या मधे प्रवास करण्या करिता कुणीही  रेल्वे स्थानकावर गर्दी करु नये.    परभणी (प्रतिनिधी):- कोविड-१९ विषाणू मुळे उद्भवलेली परिस्थिती आणि या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता दिनांक १७ मे -२०२० रोजी रात्री २४.००  वाजे पर्यंत भारतीय रेल्वे मध्ये सर्व प्रवासी रेल्वे गाड्या बंद राहतील. या कालावधीत रेल्वे माल आणि पार्सल वाहतूक सुरु राहील. लॉकडाऊन मुळे विविध स्थळी अडकलेले मजुर, विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक आणि या परिस्थिती मुळे अडकलेले इतर लोक ज्यांना  संबंधित राज्य सरकार ने ओळखुन नोंद केली आहे अशा व्यक्ती करिताच   श्रमीक विशेष गाड्या चालविन्याचे ठरविण्यात आले आहे.  या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या फक्त आणि फक्त राज्य सरकार च्या विनंती वरुन आणि गृह  मंत्रालयाच्या दिशा निर्देशानुसार  चालविण्यात येतील. वर उल्लेखित पैकी ज्यांना कुणाला या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी  संबंधित  राज्य सरकार च्या कार्यालयात संपर्क क

चलो परभणी...बाहेरगावाहून आपले स्वकीयांना घरी आणा....अर्ज करा

परभणी जिल्ह्यात अडकलेले व ज्या लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी.          माहिती भरताना सोबत खालील कागदपत्रे Upload करावीत. 1)  नजीकच्या काळातील स्पष्ट फोटो          File Size 200 kb पर्यंत 2) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) यांचे कुठल्याही फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र, 3)आपल्या पत्त्याचा पुरावा किंवा आधारकार्ड File size 500 KB  पर्यंत https://covid19.mhpolice.in/ अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करून माहिती घ्यावी  8698830761 8600847037 7020658545 02452-233383 egsdycoll.par_mh@gov.in परभणी जिल्ह्यातील ज्या व्यक्ती इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यात अडकलेले आणि परभणी जिल्ह्यात येण्यासाठी इच्छुक असलेले यांनी त्या त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्त यांचेकडे अर्ज करावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांनी कळविले आहे.