रेल्वे प्रवास सेवा सुरू केलेली नाहीये........कोणीही रेल्वे स्थानकावर येऊ नका

रेल्वे प्रवाशी सेवा चालू केली नाहीये ...कोणीही रेल्वे स्थानकावर येऊ नका- दमरे 
दिनांक १७ मे -२०२० रात्री २४. ०० वाजे पर्यंत  सर्व प्रवाशी रेल्वे सेवा बंद आहे - श्रमीक विशेष गाड्या मधे प्रवास करण्या करिता कुणीही  रेल्वे स्थानकावर गर्दी करु नये.   
परभणी (प्रतिनिधी):- कोविड-१९ विषाणू मुळे उद्भवलेली परिस्थिती आणि या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता दिनांक १७ मे -२०२० रोजी रात्री २४.००  वाजे पर्यंत भारतीय रेल्वे मध्ये सर्व प्रवासी रेल्वे गाड्या बंद राहतील. या कालावधीत रेल्वे माल आणि पार्सल वाहतूक सुरु राहील.
लॉकडाऊन मुळे विविध स्थळी अडकलेले मजुर, विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक आणि या परिस्थिती मुळे अडकलेले इतर लोक ज्यांना  संबंधित राज्य सरकार ने ओळखुन नोंद केली आहे अशा व्यक्ती करिताच   श्रमीक विशेष गाड्या चालविन्याचे ठरविण्यात आले आहे. 
या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या फक्त आणि फक्त राज्य सरकार च्या विनंती वरुन आणि गृह  मंत्रालयाच्या दिशा निर्देशानुसार  चालविण्यात येतील. वर उल्लेखित पैकी ज्यांना कुणाला या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी  संबंधित  राज्य सरकार च्या कार्यालयात संपर्क करावा.  
कुणाही व्यक्तिला किंवा व्यक्ती समुहाला रेल्वे स्थानकावर प्रत्यक्ष किंवा कुणाच्याही शिफारशीने या गाड्या मधे प्रवास करण्या करिता तिकिट विकत मिळणार नाही याची सर्व जनतेने नोंद घ्यावी. या मुळे कुणीही  रेल्वे स्थानकावर गर्दी करु नये. राज्य सरकार ची परवानगी असल्याखेरीज कुणालाही या विशेष रेल्वे गाड्या मधे तसेच स्थानकावर प्रवेश दिला जाणार नाही याची जनतेने नोंद घ्यावी ही विनंती. 
पुन्हा रेल्वे प्रशासनातर्फे जनतेला विनंती करण्यात येते की कुणीही रेल्वे स्थानकावर थेट प्रवेश करण्याचा प्रयत्न करु नये तसेच गर्दी करु नये.  जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन