परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

 परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 



परभणी, (प्रतिनिधी) : सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) येथील तहसीलदार सचिन शंकरराव जैस्वाल (वय 43) यास वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्याकरीता 35 हजार रुपयांची लाच स्विकारतेवेळी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केल्यानंतर या खात्याच्या एका पथकाने जैस्वाल यांच्या परभणीतील बंगल्यातून 9 लाख 40 हजार रुपयांची रोकड जप्त तसेच चार मजली टोलेजंग इमारत सील केली. सिंदखेड राजा येथील एका व्यक्तीने तहसीलदार जैस्वाल याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक खात्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे या खात्याच्या पथकाने वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्याकरीता 35 हजार रुपयांची लाच स्विकारतेवेळी तहसीलदार जैस्वाल, त्याचे चालक मंगेल कुलथे, शिपाई पंजाबराव ताटे यांनाही ताब्यात घेतले. या तिघांविरोधात बुलढाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, चंद्रशेखर निलपत्रेवार, अनिरुध्द कुलकर्णी, सीमा चाटे, संतोष बेदरे, कल्याण नागरगोजे, अतूल कदम, जे.जे. कदम, अनिल नरवाडे यांच्या पथकाने जैस्वाल याच्या परभणीतील मंगलमूर्ती बंगल्याची झडती घेतली तेव्हा 9 लाख 40 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच चार मजली इमारतही सील करण्यात आली. दरम्यान, या कारवाईने शासकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे.

Comments

Popular posts from this blog

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन