अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला
महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत नामफलक शिवसेनेच्या तीव्र आक्षेपानंतर तात्काळ हटविला
परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील स्मशान भूमी जवळील घटना
परभणी,दि.27(टिळक रत्न प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्या वसमत रस्त्यावरील एका चौकात काही व्यक्तींनी अचानक अनाधिकृतपणे लावलेल्या नामफलकावर शिवसेनेच्या पदाधिकार्यांसह संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदविल्यानंतर महापालिका प्रशासनाने तो नामफलक हटविला.
गेल्या काही महिन्यांपासून काही व्यक्ती किंवा संस्थांकडून परस्परच पाट्या लावून शहरातील चौकांचे, रस्त्याचे नामकरण करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. असाच एक प्रकार वसमत रस्त्यावर स्मशानभूमीजवळ अलि कॉर्नर नावाचा एक नामफलक काही व्यक्तींनी रातोरात झळकवला. सोमवारी तो प्रकार निदर्शनास आल्याबरोबर शिवसेनेच्या संतप्त पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी त्या अनाधिकृत फलकावर तीव्र आक्षेप नोंदविला व महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे धाव घेतली. स्मशानभूमी परिसरातील वसमत रस्त्यावरील अली कॉर्नर हा फलक पूर्णपणे अनधिकृत असल्याचे नमूद करत, त्याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, महानगर प्रमुख माणिक पोंढे, शहर प्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटक संदीप जाधव, उपतालुका प्रमुख सुभाषराव गरुड, बाळू मोहटे, रामदेव ओझा, महादेव खुणे, महानगर संघटक शेख शब्बीर, उपशहर प्रमुख महेश लंगोटे, कैलास पवार, राहुल शिंदे, राजकुमारसिंग टाक, आकाश सुरजोसे, बंडू झाडे, शिवप्रसाद लोखंडे, अमित भालेराव, निरज बुचाले आणि दिपक शिंदे नरेश येराळकर,विभाग प्रमुख पांडुरंग भालेराव, प्रभाग प्रमुख सुमित बंडे, शाखाप्रमुख योगेश्वर, मधुसूदन जाधव, कृष्णा शिंदे, कृष्णा वाघमारे, कल्याण रनेर, जालिंदर पोले, सुरज सिंग थापा, गोपी सिंग थापा, बोराडे, अजय पोळ, मंगेश काटकर, अभिषेक वाघ तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, शिवसेनेच्या मागणीची महानगरपालिकेने तातडीने दखल घेत संबंधित अनधिकृत फलक त्वरित काढून टाकला. या वेगवान कारवाईबद्दल शिवसेना परभणी शहरतर्फे मनपाचे आभार मानण्यात आले. यानंतर जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी स्पष्ट केले की, शहरातील सर्व अनधिकृत नामफलकांविरुद्ध सातत्याने मोहीम राबवावी आणि भविष्यात कोणतीही व्यक्ती अथवा संस्था मनपाची परवानगी न घेता असे फलक लावणार नाहीत, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात तसेच स्वच्छ्ता निरीक्षक ह्यांनी जागरूकपणे लक्ष देवून आपली कर्तव्य पर पाडवी अशी मागणी त्यांनी आयुक्तांना केली.



Comments
Post a Comment