8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली
“गोशाळा प्रकरणात कारवाईसाठी 10 हजारांची मागणी; 8 हजार घेताना पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याला एसिबी ने केले जेरबंद”
लाच घेताना पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली अगदी फिल्मी स्टाईल सारखी घटना
परभणी, दि. 7 (टिळक रत्न प्रतिनिधी) : तक्रारीवर कारवाई करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची धडक कारवाई गंगाखेड येथे करण्यात आली. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी येथे ओमकार नगर, गंगाखेड येथील 70 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, ते गोशाळा चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या मुलीने सोनपेठ पोलीस ठाण्यात गोशाळेतून गाय व दोन वासरे जबरदस्तीने नेल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावर कारवाई करण्यासाठी बीट जमादार व पोलीस हवालदार भगवान विठ्ठल मुंढे (वय 54) यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.
लाच मागणीची पडताळणी दि. 25 फेब्रुवारी रोजी गंगाखेड-परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्व लक्ष्मी रसवंती गृह येथे करण्यात आली. यावेळी आरोपीने कारवाई करण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने तडजोडीअंती 8 हजार रुपये देण्याचे सांगितले असता आरोपीने ती रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 6 मार्च 2026 रोजी सापळा रचला. गंगाखेड-परळी रोडवरील विश्व लक्ष्मी रसवंती गृह येथे पंचासमक्ष आरोपी पोलीस हवालदार भगवान मुंढे यांनी तक्रारदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACB च्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल, वॉलेट, पोलीस ओळखपत्र, मतदान ओळखपत्र व 650 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच मोबाईलची तपासणी सुरू असून आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, आरोपीची प्रकृती अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रेफर केल्यामुळे त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पोलीस निरीक्षक मनीषा पवार या पुढील तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment