Posts

Showing posts from July, 2020

होय गृहमंत्र्यांनी शिफारस केली आहे - 'महंमद द मेसेंजर ऑफ गोड' ह्या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालावी - परभणी पालकमंत्री नवाब मलिक

Image
होय गृहमंत्र्यांनी शिफारस केली आहे -  'महंमद द मेसेंजर ऑफ गोड' हा चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालावी - परभणी पालकमंत्री नवाब मलिक परभणी 17 जुलै (प्रतिनिधी) :- कोरोना 19 चा परभणीतील  आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर  आलेले  महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे कॅबिनेट मंत्री  व  परभणीचे पालकमंत्री  तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना पत्रकार परिषद मध्ये  टिळक रत्नच्या प्रतिनिधी द्वारा प्रश्न विचारण्यात आला की 'महंमद द मेसेंजर ऑफ गॉड' या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी रझा अकादमी या संघटनेने निवेदनाद्वारे गृहमंत्री याचेकडे केली होती त्यानुसार गृहमंत्र्यांमार्फत चित्रपट प्रसारण वर बंदी आणण्याचे शिफारस केंद्रा कडे केली गेली आहे का यावर उत्तर दिले की होय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशी शिफारस केली आहे की ; महाराष्ट्रात 'महंमद द मेसेंजर ऑफ गॉड' या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येऊ नये यात बरेच सिन अत्यंत चुकीचे पद्धतीने व तथ्यहीन अभ्यासशुन्य दाखवण्यात आले आहेत यामुळे मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील व राज्यात

शेतकऱ्यांनी केवळ RCF च्या युरिया करिता हट्ट न धरता इतर कँपणीचा युरिया वापर करावा. परभणीत गंगाखेड वगळता सर्व ठिकाणी 100% कापूस खरेदी पूर्णत्वाकडे जात आहे - पालकमंत्री नवाब मलिक

Image
शेतकऱ्यांनी केवळ RCF च्या युरिया करिता हट्ट न धरता इतर कँपणीचा युरिया वापर करावा. परभणीत गंगाखेड वगळता सर्व ठिकाणी 100% कापूस खरेदी पूर्णत्वाकडे जात आहे - पालकमंत्री नवाब मलिक परभणी 17 जुलै (प्रतिनिधी) :- कोरोना 19 चा आढावा दौऱ्यावर परभणीत आलेले पालकमंत्री नवाब मलिक यांनी मोंढ्यात खत खरेदी करिता शेतकऱ्यांच्या रांगा दिसून येतात याचे एक कारण RCF चा युरियाच सर्वांना हवा पण शेतकऱ्यांनी केवळ RCF चा युरिया वापरण्यासोबत इतर कँपणीचा युरिया खरेदी करण्याचा पर्याय वापर करावा यामुळे खतविक्री केंद्रावर रांगा लावायची गरज पडणार नाही तसेच सोयाबीन बियाणे जर्मिनेशन मध्ये निकृष्ठ निघाले असल्या प्रकारचे निकृष्ठ दर्जाचे बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर कारवाईस सुरवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांना पेरणी करण्याची आहे त्यांना ह्या कंपनीने शेतकऱ्यांना उत्कृष्ठ दर्जाचे बियाणे दयावे आणि ज्यांना पेरणी करायची नसेल आशा शेतकऱ्यांना झालेला खर्च कँपणीने द्यावा असे आदेशीत केले गेले आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली तसेच परभणीतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा गंगाखेड वगळता सर्व तालुक्यातील कापूस खरेदी उद्दिष्ट 100% झाले आहे असे

परभणी जिल्ह्यात येणार नव्या 16 रुग्णवाहिका

Image
परभणी जिल्ह्यात रुग्ण सेवेत येणार नव्या 16 कोऱ्या रुग्णवाहिका  परभणी 17 जुलै (प्रतिनिधी):- कोरोना 19 चा आढावा घेण्यासाठी परभणी दौऱ्यावर आलेले परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज 17 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद मध्ये सांगितले की प्रत्येक लोकप्रतिनिधी यांना कोविड 19 साठी अत्यावश्यक बाबीसाठी 50 लक्ष रुपये निधी देण्यात आला आहे त्या लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून  परभणीत रुग्णवाहिकेची कमतरता समस्या सोडवण्यात येणार आहे यामुळे रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाला त्रास होणे टळेल. याकरिता एक लोकप्रतिनिधी 2 रुग्णवाहिका याप्रमाणे 8 लोकप्रतिनिधी 16 नवीन रुग्णवाहिका जिल्ह्यात सेवेत दाखल होणार आहेत अशी माहिती यावेळीं दिली

परभणीत सोमवार पासून व्यवहार सुरळीत चालू होणार - पालकमंत्री नवाब मलिक

Image
परभणीचे पालक मंत्री नवाब मलिक यांनी केली परभणी अनलॉक ची घोषणा - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे कामगिरीवर व्यक्त केले समाधान  परभणी 17 जुलै (प्रतिनिधी) - आज परभणीत कोरोना 19 संदर्भात आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलेले पालकमंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी परभणीत संचारबंदी उठवली जाईल सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यास परवानगी असेल पण कोरोना 19 च्या बाबतीत आरोग्य विभागाने सांगितलेल्या सर्व दक्षता उपाय करून घेऊन सर्वांनी आपआपले व्यवहार करायचे आहेत असे त्यांनी घोषित केले.लवकरच जिल्हाधिकारी याबाबत पत्रक काढून आदेशीत करतील. तसेच परभणीत कोरोना 19 विषाणूचा संसर्ग थोपवण्यात जिल्हाधिकारी व प्रशांसन अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस डॉक्टर आरोग्य कर्मचारी व कोविड वॊरीअर यांच्या अथक परिश्रमाने कोरोना 19 चा धोका आपल्यापासून दूर राहिला आहे.नागरिकांनी देखील सहकार्य केले, आता जे रुग्ण आढळून येत आहेत ते बाहेर जिल्ह्यातील किंवा राज्यातून प्रवास करून येथे आले आहेत त्याच्या वर सुद्धा उपचार केले गेल्याने त्या रुग्णांच्या प्रकृती मध्ये सुधारणा होताना दिसत आहे ह्यात स्थानिक नागरिक सुरक्षित राहिले ही गोष्ट दिलासादायक बाब

भारतातील अयोध्या खोटी,खरे राजकुमार श्रीराम नेपाळी

Image
भारतातील अयोध्या खोटी,खरे राजकुमार श्रीराम नेपाळी म्हणे खरी अयोध्या नेपाळ मध्ये आहे - आणि मोदी नेपाळची राजसत्ता उधळू पाहत आहेत - नेपाळ पंतप्रधान के पी एस ओली दिल्ली (वृत्तसंस्था) :- भारतातील अयोध्या खोटी असून श्री राम मूळचे नेपाळी होते भारताने नेपाळवर सांस्कृतिक आक्रमण मोडतोड करून बनावट अयोध्या तयार केली आहे, असा जावई शोध नेपाळचे पंतप्रधान यांनी लावला आहे. भारताने ऐतिहासिक सत्याची मोडतोड केली राजकुमार श्री राम यांचे सीतामाई सोबत विवाह झाला पण तो नेपाळमधील राजकुमार श्रीराम यांच्यासोबत, भारतातील राजकुमार सोबत नाही तसेच खरी अयोध्या ही नेपाळ मधील बिरजगंज पासून पश्चिमेला आहे. जर अयोध्या भारतात होती असे मानले तर मग तेथील राम नेपाळ येथील जनकपूर मध्ये कसे काय आले  सगळे बनावट आहे असे हास्यास्पद विधान नेपाळ मध्ये त्यानि त्यांच्या निवासस्थानी भानूभक्त आचार्य यांचे जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले. त्यांनी असेच खळबळजनक विधान काही दिवसांपूर्वी पण केले होते की भारतातून येत असलेला कोरोना विषाणू संक्रमण हे चिन इटली च्या कोरोना संक्रमनपेक्षा घातक आहे  तसेच भारत मला सतेपासून दूर करण्याचा कट करत

गंगाखेड मधील त्या स्वागत समारंभातील सहभागी अधिका-यांवर पण कारवाई होणार का ?

Image
गंगाखेड मधील त्या स्वागत समारंभातील सहभागी अधिका-यांवर पण कारवाई होणार का ? परभणी, दि.13(प्रतिनिधी)-   गंगाखेड शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असतांना एका व्यापा-याने आयोजित केलेल्या स्वागत समारंभास जााणे टाळणे सोडून उलट वेळ काढून उपस्थिती लावणा-या अधिका-यां विरोधात जिल्हा महसुल व पोलिस प्रशासन द्वारा काही कारवाई होणार का आणि कधी असे प्रश्न संचारबंदी मुळे त्रस्त नागरिक उपस्थित करत आहेत संपूर्ण जिल्ह्यात आपत्तकालीन स्थिती जमावबंदी धारा लागू असतांना गंगाखेडात मोठ्या समारंभाचे आयोजन करण्याचे धाडस केले गेले, कोणाच्या परवानगीने हे केले गेले, कार्यक्रमास मोठ्या संख्येने गर्दी झालेल्या या सोहळ्यात सरकारी अधिकारी, कर्मचारी पण बिनधास्तपणे सहभागी झाले होते. या आधी अशाच प्रकारे पाथरीतील सामुहिक प्रार्थना प्रकरणात त्या गर्दी करण्यात येऊ नये होणारी गर्दी रोखण्या ऐवजी काहीही कारवाई न करणाऱ्या तेथे जबाबदार पोलीस कर्मचा-यांची जिल्हा पोलिस प्रशासनाने तडकाफडकी बदली करण्याची कारवाई केली होती. असाच प्रकार गंगाखेड मध्ये घडला येथील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. हा व

बोर्डाद्वारे परभणीत सुनावणीची जत्रा ,महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांच्या रंगाच रांगा

Image
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी, पण बोर्डाद्वारे परभणीत सुनावणीची जत्रा ,महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांच्या रंगाच रांगा परभणी, दि.13(प्रतिनिधी)-  कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू केली असतांना माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या औरंगाबाद बोर्डाने सोमवारी(दि.13) परभणीत इयत्ता 12 वीच्या परीक्षेत अवैध मार्गाच्या प्रकरणासह  रेस्टीकेट केलेल्या विद्यार्थ्यांना सुनावणीसाठी पाचारण केल्याने येथील शिवाजी महाविद्यालयाच्या एका वर्ग खोलीच्या परिसरात विद्यार्थ्यांसह पालकांची जत्राच उसळली. वसमत रस्त्यावरील शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात काही विद्यार्थ्यांसह पालक आढळून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींनी दुपारी बाराच्या सुमारास सहजपणे डोकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाविद्यालयाच्या वर्ग खोल्यात औरंगाबाद बोर्डातील अधिकारी, कर्मचारी हे विद्यार्थ्यां बरोबर हितगुज करीत असल्याचे निदर्शनास आले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी संचारबंदीच्या या काळात नेमके हे काय, चालूये असा प्रश्‍न केला असता बोर

माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मोटर सायकल अपघातात मृत्यू

Image
माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मोटर सायकल  अपघातात मृत्यू परभणी (प्रतिनिधी):- परभणी शहरातील उड्डाणपुलावर मोटार सायकलच्या अपघातात माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मृत्यू झाला. माजी आमदार मोहन फड यांचा पृथ्वीराज फड हा लहान मुलगा असून मुंबईत शिक्षण घेत होता,लॉक डाऊन मुळे तो परभणीत होता आज दि 10 जुलै संध्याकाळी पावणे नऊ च्या सुमारास पृथ्वीराज हा स्क्रॅमलर डुक्याटी या मोटारसायकल वरून गंगाखेड रस्त्याकडे जात असताना उड्डाणपुलावर त्याच्या वाहनाचा अपघात झाला यामध्ये तो गंभीर जखमी झाला हा अपघात एवढा मोठा होता की त्याच्या मोटार सायकल चा समोरील भाग चक्काचूर झाला यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र उपचार पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.नेमका हा अपघात कसा व कोणत्या वाहनसोबत झाला याचा तपास पोलीस करत आहेत * टिळक रत्न वृत्त प्रतिनिधी *

परभणी कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतन तातडीचे काम वगळता येऊ नये

Image
परभणी निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतन विषयक तातडीची कामे वगळून,अर्ज पोस्ट किंवा मेल द्वारे करण्याचे कोषागार कार्यालयाचे आवाहन परभणी, दि. 9 (प्रतिनिधी) :-  कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते की, सद्या कोविड-19 ह्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, कोषागार कार्यालयातील गर्दी व संभाव्य संसर्गजन्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतन विषयक जी काही कामे आहेत, ती त्यांनी अर्जाद्वारे आवश्यक कागदपत्रांच्या प्रतिसह पोस्ट करावीत किंवा to.parbhani@zillamahakosh.in या मेल आयडीवर मेल करावीत. अत्यंत महत्वाचे किंवा प्रत्यक्ष ओळखपडताळणीची कामे असल्याशिवाय कार्यालयात येऊ नये. प्रत्यक्ष कामांच्या अनुषंगाने कोषागार कार्यालयाच्या संपर्क क्रमांक (02452) 225006 या दुरध्वणीवर संपर्क करावा असे आवाहन सुनिल वायकर,जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी यांनी केले आहे.

सेंद्रिय शेती चे प्रमाणीकरण करून घेण्याचे शेतकरी व शेतकरी गट यांना आवाहन

Image
सेंद्रीय शेती करणारे शेतकरी व शेतकरी गट यांनी त्वरित प्रमाणीकरण करून घेऊन - कृषी विकास योजनेचा लाभ घ्यावा परभणी (प्रतिनिधी):- सेंद्रीय शेती करणारे शेतकरी ,शेतकरी गट यांनी आपल्या सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करून कृषिविकास योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परभणी जिल्हात डोंगराळ व पारंपारीक क्षेत्रात रासायनिक खते/किटकनाशके यांचा वापर टाळुन पुर्ण्पणॆ सेंद्रीय पध्दतीने शेती केली जाते. अशा सेंद्रीय शेतीचा अवलंब करणा-या सलग क्षेत्र/गाव तसेच परंपरागत कृषि विकास योजनामध्ये समाविष्ठ नसलेले भागातील वैयक्तिक शेतकरी/छोटॆ शेतकरी गट त्यांचे कडील सेंद्रीय शेतीखालील क्षेत्र केंद्र शासनाच्या परंपरागत कृषि विकास योजनांर्तगत सेंद्रीय प्रमाणिकरण करण्यात येणार आहे.सदरील योजना मध्ये समाविष्ठ होण्यासाठी यापुर्वी शासनाच्या कोणत्याही सेंद्रीय शेती योजनामध्ये समाविष्ठ नसलेल्या तसेच कोनत्याही प्रकारचे प्रमाणिकरण न केलेल्या  शेतक-यांने आपले नाव, गाव, आपले एकुण क्षेत्र व सेंद्रीय शेतीखालील क्षेत्र,संपर्क क्रमांक समाविष्ठ असलेला  आपला विनंती अर्ज तालुका कृषि अधिकारी यांच्या दि.10 जुलै 2020 रोजी पर्यंत का

परभणीत मनपाच्या कल्याण मंडपम मध्ये कोरोना-19 रुग्ण विलगिकरण कक्ष निर्माण होण्याची हालचाल सुरू

परभणीत मनपाच्या कल्याण मंडपम मध्ये कोरोना-19 रुग्ण विलगिकरण कक्ष निर्माण होण्याची हालचाल सुरू  - विलगिकरण कक्ष निर्मितीस भाजपा नगरसेविका उषा झांबड यांनी केला विरोध  परभणी (प्रतिनिधी):- परभणी कोरोना 19 मुक्ततेकडे वाटचाल करत ग्रीन झोन मध्ये येत असताना अनलॉक प्रक्रिया सुरू केली गेली आणि परभणीत बाहेर गावावरून आलेल्या लोकांना कोरोनाच्या लागण झाल्याचे निदर्शनास आले पाहता पाहता परभणीत 149 रुग्ण संख्या झाली यात 94 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आता हे सर्व करताना वाढ होत असलेली रुग्ण संख्या व संशयित नागरिकांकरिता जिल्हा रुग्णालय व आय टी आय तसेेेच अक्षदा मंगल कार्यालय रेणुका मंगल कार्यालय कमी पडू लागल्याने परभणी मनपा च्या कारेगाव रोड भागातील जायकवाडी वसाहत प्रभाग 5 मधील कल्याण मंडपम या मंगल कार्यालयात विलगिकरण कक्ष निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या ,पण ह्याच प्रभाग 5 मधील भाजपच्या नगरसेविका उषा झाम्बड यांनी विरोध दर्शविला आहे त्यांनी जिल्हा रुग्णालय व आय टी आय मध्ये विलगिकरण कक्षात कोणत्याही सुविधा रुग्णांना देण्यात येत नाहीयेत त्यामुळे रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांना त्रास झाला तसेच कल्याण

नांदेड येथे रेल्वेने मालवाहतुक वाढवण्यासाठी केली व्यवसाय विकास युनिट ची स्थापना

Image
रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार , नांदेड विभागाने मालवाहतूक भारनियमन वाढविण्यासाठी व्यवसाय विकास युनिट (बीएसयू) ची केली स्थापना नांदेड (प्रतिनिधी):- नांदेड विभागाने मालवाहतूक भारनियमन वाढविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व्यवसाय विकास युनिट (बीएसयू) ची स्थापना केली आहे. कांदा, साखर, ड्राय ऑइल केक, मॅझेज इत्यादी पारंपारिक फ्रेट लोडिंगवर काम करण्याव्यतिरिक्त व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) हे रेल्वे मालवाहतूकातील बास्केटमध्ये अपारंपारिक रहदारी आणणे यासारख्या अपारंपरिक वाहतुकीवर भर देईल व त्याकरिता आवश्यक त्या उपाय योजना करण्यास तत्पर असेल याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे ज्यात  श्रीधर  नांदेडचे वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर, श्री पी. दिवाकर बाबू वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक, श्री उदयनाथ कोटाला  वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक आणि श्री शेख मोहम्मद अनीस वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता सदस्य असतील. समितीने संभाव्य ग्राहकांकडून नवीन प्रस्ताव शोधण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधणे हे समितीचे मुख्य कार्य असंणार आहे .  समिती प्रस्तावाच्या व्

परभणीत लग्न सोहळा रीतसर परवानगी घेऊन घरच्या घरीच करावा - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर

Image
परभणीत लग्न सोहळा घरच्या घरीच करायचा तेही 10 ते 15 जनांच्या उपस्थितीत - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर   परभणी (प्रतिनिधी):- परभणीत कोरोना विषाणू संसर्ग झालेले रुग्णांची वाढती संख्या पाहता ह्याचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने परभणीचे जिल्हाधिकारी यांनी आदेश  जारी केले आहेत त्यात विवाह सोहळा हे घरच्या घरीच  करावेत आणि तेही परिवारातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत असे आदेशात नमूद केले आहे. परभणी ग्रीन झोन कडे वाटचाल चालू असताना अनलॉकचे प्रयोग सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत वाढ सुरू झाली आता परभणीत एकूण 149 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यातील 94 रुग्ण उपचार घेतल्याने बरे झाले आहेत पण दररोज हा रुग्ण संख्येचा वाढता आलेख पाहून जिल्हाधिकारी यांनी गर्दी होणाऱ्या बाबींकडे लक्ष घातले आहे. त्यात विवाह सोहळ्यात देखील गर्दी होऊन कोणासही कोरोना लागण होऊ नये याकरिता विवाह सोहळे हे घरातच साजरे करावेत आणि सोहळ्यात मोजकेच 10 ते 15 जण असावेत त्यांची आधी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घ्यावी याकरिता उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन)  बी एच बिबे  यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे विवा