होय गृहमंत्र्यांनी शिफारस केली आहे - 'महंमद द मेसेंजर ऑफ गोड' ह्या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालावी - परभणी पालकमंत्री नवाब मलिक

होय गृहमंत्र्यांनी शिफारस केली आहे -  'महंमद द मेसेंजर ऑफ गोड' हा चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालावी - परभणी पालकमंत्री नवाब मलिक
परभणी 17 जुलै (प्रतिनिधी) :- कोरोना 19 चा परभणीतील आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे कॅबिनेट मंत्री व परभणीचे पालकमंत्री  तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना पत्रकार परिषद मध्ये  टिळक रत्नच्या प्रतिनिधी द्वारा
प्रश्न विचारण्यात आला की 'महंमद द मेसेंजर ऑफ गॉड' या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी रझा अकादमी या संघटनेने निवेदनाद्वारे गृहमंत्री याचेकडे केली होती त्यानुसार गृहमंत्र्यांमार्फत चित्रपट प्रसारण वर बंदी आणण्याचे शिफारस केंद्रा कडे केली गेली आहे का यावर उत्तर दिले की होय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशी शिफारस केली आहे की ; महाराष्ट्रात 'महंमद द मेसेंजर ऑफ गॉड' या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येऊ नये यात बरेच सिन अत्यंत चुकीचे पद्धतीने व तथ्यहीन अभ्यासशुन्य दाखवण्यात आले आहेत यामुळे मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील व राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न उभा राहू शकतो यामुळे सदरील चित्रपट 'महंमद द मेसेंजर ऑफ गॉड' चित्रपट प्रसारणावर आय टी ऍक्ट नुसार बंदी घालण्यात यावी अशी शिफारस व मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रा कडे केली आहे.
याआधी कधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणत्याही नेत्यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणाऱ्या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालण्याची शिफारस अथवा मागणी केलेली दिसत नाही आता मग 'महंमद द मेसेंजर ऑफ गॉड' ह्याच चित्रपटाच्या प्रसारणावर बंदीची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली ह्यालाच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्षता मानते असे समजायचे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्यावाचून राहत नाही.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन