Posts

Showing posts from January, 2020

भारतातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याचा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा अहवाल

Image
भ्रष्ट देशांच्या सूचीत भारतातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याचा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा अहवाल नवी देहली –  जगातील भ्रष्ट देशांची सूची ‘भ्रष्टाचार मूल्यांकन निर्देशांक २०१९’ नुकतीच घोषित करण्यात आली आहे. जगातील १८० देशांच्या सूचीत भारत ८० व्या स्थानावर आहे. वर्ष २०१८ मध्ये भारत ७८ व्या स्थानावर होता. या अहवालातील निकषानुसार जो देश अधिक भ्रष्टाचारी आहे, त्याचा क्रमांक सर्वांत शेवटी येतो, तर ज्या देशात भ्रष्टाचार अल्प आहे, त्याला वरचे स्थान दिले जाते. त्या अनुषंगाने पाहता भारतात भ्रष्टाचार वाढल्याने त्याची क्रमवारीत घसरण झाली आहे. भ्रष्टाचाराचा अभ्यास करणारी संस्था ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ने ही सूची प्रसिद्ध केली आहे. या सूचीनुसार डेन्मार्क आणि न्यूझीलंड या देशांमध्ये भ्रष्टाचार सर्वांत न्यून, तर सर्वाधिक भ्रष्टाचार सोमालिया, सुदान आणि सीरिया या देशांमध्ये होत आहे. जागतिक भ्रष्टाचार मूल्यांकन निर्देशांकानुसार वर्ष २०१२ पासून आतापर्यंत केवळ २२ देशांमधील भ्रष्टाचार कमी झाला आहे. ज्या देशांमधील भ्रष्टाचार गेल्या काही वर्षांत कमी  झाला आहे, त्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, निकारागुहा,

शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही CAA, NRC विरोधात महिलांचा ठिय्या आंदोलन

दिल्लीच्या शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही CAA, NRC विरोधात महिलांचा ठिय्या आंदोलन सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात गेल्या महिनाभरापासून महिलांचे आंदोलन सुरू आहे. आता याच धर्तीवर मुंबईतही महिलांनी ठिय्या सुरू केलं आहे. मुंबई :  दिल्लीप्रमाणेच मुंबईतील महिलादेखील एनआरसी आणि सीएएविरोधात आता रस्त्यावर उतरल्या आहे. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा विभागात रविवारी रात्रीपासून शेकडो महिलांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. महिलांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पुरुषदेखील या आंदोलनात उतरलेत. आंदोलनाची तीव्रता पाहता इथे कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असल्याचं आंदोलक महिलांनी म्हटलंय. एकीकडे दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात महिलांचे गेले काही दिवस सीएए आणि एनआरसी विरोधात अविरत आंदोलन सुरू असताना मुंबई मधील महिला देखील यातून प्रेरित होऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा विभागात रविवारी रात्रीपासून शेकडो महिलांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. महिलांचा या आंदो

मला 'हिंदुहृदयसम्राट' म्हणू नका - राज ठाकरे

मला 'हिंदुहृदयसम्राट' म्हणू नका - राज ठाकरे एनआरसीच्या समर्थनासाठी नऊ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज यांनी मनसे नेत्यांना दोन महत्वाच्या सूचना दिल्या होत्या.

तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा, तीन हिरो पाहिजेत : अशोक चव्हाण

तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा, तीन हिरो पाहिजेत : अशोक चव्हाण संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे जाता येणार नाही आणि असं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, असं सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितलं होतं, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.

शिवभोजन थाळी अखेर ग्राहकांसाठी उपलब्ध, प्रजासत्ताक दिनी शुभारंभ !

शिवभोजन थाळी अखेर ग्राहकांसाठी उपलब्ध, प्रजासत्ताक दिनी शुभारंभ! बहुचर्चित शिवभोजन थाळीचं अखेर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन झालं आहे, प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात सोहळा साजरा होत असतानाच एकीकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यभरात थाळीचं उद्घाटन केलं आहे.