भारतातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याचा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा अहवाल


भ्रष्ट देशांच्या सूचीत भारतातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याचा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा अहवाल


नवी देहली – जगातील भ्रष्ट देशांची सूची ‘भ्रष्टाचार मूल्यांकन निर्देशांक २०१९’ नुकतीच घोषित करण्यात आली आहे. जगातील १८० देशांच्या सूचीत भारत ८० व्या स्थानावर आहे. वर्ष २०१८ मध्ये भारत ७८ व्या स्थानावर होता. या अहवालातील निकषानुसार जो देश अधिक भ्रष्टाचारी आहे, त्याचा क्रमांक सर्वांत शेवटी येतो, तर ज्या देशात भ्रष्टाचार अल्प आहे, त्याला वरचे स्थान दिले जाते. त्या अनुषंगाने पाहता भारतात भ्रष्टाचार वाढल्याने त्याची क्रमवारीत घसरण झाली आहे. भ्रष्टाचाराचा अभ्यास करणारी संस्था ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ने ही सूची प्रसिद्ध केली आहे. या सूचीनुसार डेन्मार्क आणि न्यूझीलंड या देशांमध्ये भ्रष्टाचार सर्वांत न्यून, तर सर्वाधिक भ्रष्टाचार सोमालिया, सुदान आणि सीरिया या देशांमध्ये होत आहे.
जागतिक भ्रष्टाचार मूल्यांकन निर्देशांकानुसार वर्ष २०१२ पासून आतापर्यंत केवळ २२ देशांमधील भ्रष्टाचार कमी झाला आहे. ज्या देशांमधील भ्रष्टाचार गेल्या काही वर्षांत कमी  झाला आहे, त्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, निकारागुहा, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. या सूचित भारताला ४१ गुण मिळाले असून त्याच्यासह चीन, घाना, बेनिन आणि मोरक्को यांचेही तेवढेच गुण आहेत; मात्र शेजारील देशांपेक्षा भ्रष्टाचाराविषयी भारताची स्थिती चांगली आहे. या सूचीत पाकिस्तान १२० व्या, तर श्रीलंका ९३, नेपाळ ११३ आणि बांगलादेश १४६ व्या स्थानावर आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन