Posts

Showing posts from June, 2023

उद्योग चावडीचे 25 जूनला गंगाखेड मध्ये आयोजन-सुनील गुट्टे

Image
गंगाखेड येथे 25 जूनला या उद्योग चावडीवर... युवा उद्योजक सुनील गुट्टे ह्यांचे पत्रपरिषदेत आवाहन परभणी (प्रतिनिधी)- उदयोग्य करायचा आहे, पण कोणता करावा? त्यासाठी काय-काय करायला हवे? आपल्या भागात कोणता उद्योग करावा? त्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत का? मार्केटींग कसे करावे? अशा विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत नागरिक व युवकांना योग्य ते मार्गदर्शन करावे, यासाठी गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे यांच्या प्रमुख संकल्पनेतून येत्या २५ जून रोजी पूजा मंगल कार्यालय, गंगाखेड येथे एकदिवसीय 'उद्योग मंथन महा-महोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या आयोजन विषयी भूमिका, हेतू, उद्देश, रूपरेषा, नियोजन, अपेक्षा, मार्गदर्शन सत्रे, पूर्व तयारी अशा विविध बाबींवर आज युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे यांनी ग्रीन लिफ हॉटेल, परभणी येथे पत्र परिषद घेवून सविस्तर माहिती व प्रश्नोत्तरे दिली. तसेच उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्य आयोजक सुनील भैय्या गुट्टे, गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे स

पुणे आकाशवाणी केंद्र वरून बातम्या प्रसारित होणारच - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती व प्रसारणमंत्र्यांचे मानले आभार  मुंबई, दि. १५ - आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज जारी केले आहेत, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत. पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारतीने काढले होते. या आदेशाविरुद्ध सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या अपर मुख्य सचिवांना सूचना देऊन केंद्रातील अधिकाऱ्यांकडे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरू ठेवावा, अशी विनंती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामागणीवर सकारात्मक निर्णय घेत प्रसारभारतीने यापुढे पुणे प्रादेशिक वृत्त विभागातूनच बातमीपत्र प्रसारित होतील, असे आदेश आज काढले आहेत. सकाळी ७.१०, ८ वा. ८.३०, १०.५८, ११.

शेतकरीवर्गाला फायदेशीर,वनामकृवित द्रवरूप जिवाणू खते विक्रीकरिता उपलब्ध

Image
  वनामकृवित द्रवरूप जिवाणू खते विक्रीकरिता उपलब्ध जिवाणू खतांमुळे  पिकांना दिलेल्‍या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होऊन  पिक उत्‍पादनात   होते वाढ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागांतर्गत अखिल भारतीय मृद जैव विविधता-जैविक खत प्रकल्पामध्ये विविध पिकांसाठी द्रवरूप जिवाणू खते १८ मे पासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत, द्रवरूप जिवाणू खताचे दर रु. ३७५/- प्रति लिटर असुन यात रायझोबीयम, अझोटोबक्टर, स्फुरद विरघळवीणारे / वहन करणारे जिवाणू खत (पीएसबी), पालाश विरघळवीणारे जिवाणू खत, गंधक विघटन करणारे व जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणू खत, रायझोफॉस (रायझोबीयम व पीएसबी मिश्रण) व अझोटोफॉस (अझोटोबक्टर, व पीएसबी मिश्रण) आदींचा समावेश आहे.   पिकांना दिलेल्या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होण्यास जिवाणू खतांमुळे मदत होते. त्यात रायझोबीयम या नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूमुळे सोयाबीन, मुग, हरभरा, भुईमुग, तूर, उडीद आदी पिक उत्पादनात २० टक्क्यापेक्षा जास्त वाढ होते. अझोटोबक्टर या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात १० ते २५ टक्क्यापर्

लालपरीचा अमृत महोत्सव वैजापूरात उत्साहात 

Image
लालपरीचा अमृत महोत्सव वैजापूरात उत्साहात  (छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या शहरात लालपरीच्या (एस, टी, बस) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ७५ वर्षे झाल्या प्रित्यर्थ  वैजापूर बस समध्ये  वाहक, चालक , कर्मचारी, अधिकारी यांनी ७५ वर्षावरील प्रवाशांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन केले. महामंडळच्या लौकिकासाठी  प्रवाशांना सौजन्यपूर्ण सेवा पूरऊ, मंडळाचे व बसचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ देणार नाही. महामंडळाच्या सर्वांगीण वृद्धि व विकासासाठी  सर्वतोपरी प्रयत्न करू अशी प्रतिज्ञा त्यांना  माजी शिक्षणाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी दिली. लालपरीच्या ७५ वर्षाचा प्रवास कथन केला. आगार प्रमुख किरण धनवटे यांच्या उपस्थितीतीत हा कार्यक्रम झाला. त्यांनी ही प्रवाशांना माहिती दिली. दीप प्रज्वलन, प्रवाशांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार, मिठाई वाटप कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले. या प्रसंगी स्वप्नील पाडवी, वाहतूक निरीक्षक सतीश बावस्कर, वाहतूक सहाय्यक भाऊसाहेब गरुड, लेखाधिकारी किरण राऊत, पंढरीनाथ जाधव, पंडित जानराव, जोगेंद्र ठाकूर, वरिष्ठ लिपिक आजीना