उद्योग चावडीचे 25 जूनला गंगाखेड मध्ये आयोजन-सुनील गुट्टे

गंगाखेड येथे 25 जूनला या उद्योग चावडीवर... युवा उद्योजक सुनील गुट्टे ह्यांचे पत्रपरिषदेत आवाहन



परभणी (प्रतिनिधी)- उदयोग्य करायचा आहे, पण कोणता करावा? त्यासाठी काय-काय करायला हवे? आपल्या भागात कोणता उद्योग करावा? त्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत का? मार्केटींग कसे करावे? अशा विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत नागरिक व युवकांना योग्य ते मार्गदर्शन करावे, यासाठी गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे यांच्या प्रमुख संकल्पनेतून येत्या २५ जून रोजी पूजा मंगल कार्यालय, गंगाखेड येथे एकदिवसीय 'उद्योग मंथन महा-महोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या आयोजन विषयी भूमिका, हेतू, उद्देश, रूपरेषा, नियोजन, अपेक्षा, मार्गदर्शन सत्रे, पूर्व तयारी अशा विविध बाबींवर आज युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे यांनी ग्रीन लिफ हॉटेल, परभणी येथे पत्र परिषद घेवून सविस्तर माहिती व प्रश्नोत्तरे दिली. तसेच उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्य आयोजक सुनील भैय्या गुट्टे, गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे साहेब, व्यापारी अनिल यानपल्लेवार, मित्रमंडळाचे जिल्हा सरचिटणीस रविभाऊ कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर यांच्यासह पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन