Posts

Showing posts from June, 2021

महाराष्ट्रातील मुलांनी संघर्षाची तयारी ठेवून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

Image
विद्यार्थ्यांनी संघर्षाची तयारी ठेवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर  केवळ 10% मराठी विद्यार्थी IAS परिक्षेत पात्र राहतात हे प्रमाण वाढले पाहिजे परभणी, दिनांक 26 जून (प्रतिनिधी/ जिल्हा प्रतिनिधी) युपीएससी, एमपीएससी परीक्षांच्या माध्यमातून तयार होणारे अधिकारी हे लाखो लोकांचे विधाते असतात .आज सर्वसामान्य माणसांच्या ाश्‍वत विकासासाठी चुकीच्या गोष्टीविरुद्ध संघर्षाची मोठी आवश्यकता निर्माण झाली असल्याने तशी तयारी ठेवूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यश मिळवावे ,असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले आहे . .मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित सात दिवसीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त केंद्रेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव होते. उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशेट्टी, डॉ. विजया नांदापूरकर, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ रोहिदास नीतोंडे ,स्पर्धा परीक्षा मार

जातीय तणाव .....आणि जिल्हाधिकारी साहेब थेट गावातच मुक्कामी

Image
जिल्हाधिकारी जेव्हा बुद्ध विहारात मुक्काम करतात ! खेर्डा ता पाथरी जिल्हा परभणी मध्ये पाण्याच्या कारणावरून जातीय तणाव निर्माण झाला जिल्हाधिकारी मुगळीकर ह्यांनी गावातील मुक्काम दरम्यान गावातील 15 समस्या कायमच्या निकाली काढल्या परभणी जिल्ह्यातील पाथरी हा बीड जिल्ह्याच्या काठावर असलेला तालुका. या तालुक्यात अवघी 1650 लोकसंख्या असलेली खेर्डा हे खेडे. पिढ्यानपिढ्यापासून या गावात असलेल्या सामाजिक एकोप्याला, एकात्मतेला आणि सामाजिक शांततेला छोटीशी अडचण निर्माण झाली. कारण तसे साधे होते. येथील अनुसूचित जाती वसतीत असलेल्या सांडपाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोअरच्या विद्युत जोडणीबाबत निवडक दोघात मतमतांतरे झाली. दोघांतील हा तणाव चारचौघात झाला. वादाची ठिणगी पडली. तसे पाहिले तर हा वाद 1650 लोकसंख्या असलेल्या शांतताप्रिय एका छोट्याशा गावातील गल्ली पर्यंतच मर्यादित होता. या वादात तोल सुटलेल्या एका व्यक्तीने मारहाण करण्यापर्यंतचा विषय मोबाईल वरून चित्रीकरणाद्वारे सोशल मीडियावर आला. सोशल मीडियाद्वारे या विषयाला वेगळे वळण लागल्याने पिढ्यानपिढ्या जपलेल्या गावातील सामाजिक सलोख्याला धक्का बसला. हा वाद फार मोठा

पंढरीनाथा वारीचा तिढा सोडव बा आता..! शासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा - विश्व वारकरी संघाची मागणी

Image
पंढरीनाथा वारीचा तिढा सोडव बा आता..! शासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा - विश्व वारकरी संघाची मागणी महाराष्ट्र शासनाने वारीचा तिढा सुटला अशी बातमी दाखवली परंतु वारीचा तिढा सुटलाच नाही शासनाने वारकऱ्यावर लादला हेच खरे वास्तव आहे. पायी वारीच्या संबंधाने वारकऱ्यांची संख्या 50 ते 100 मर्यादित ठेवावी हे वारकऱ्यांना मान्य आहे परंतु ज्ञानोबाराय जगद्गुरू तुकोबाराय व सन्माननीय संतांची वारी पायीच झाली पाहिजे यामागणीवर वारकरी ठाम आहेत.  शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वारी करू संपूर्ण महाराष्ट्रातील परमार्थ प्रेमी व वारकरी यांनी शासनाला सहकार्य करण्याचे आव्हानही करू परंतु  संताच्या पालख्या ह्या पायीच पंढरपुरला जातील यावर वारकरी शासन निर्णयाची वाट पाहत आहेत परंतु सरकारने मीडियातुन बातमी प्रसारित केली की पंढरी च्या वारीचा तिढा सुटला वारकरी बस मधून पालखी वारीला जाण्यास मान्य झाले आहेत सदरील वृत्त हे वारकरी लोकांना अचंबित करणारे आहे तिढा जशास तसा कायम आहे सुटला नाही वारकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या की आमच्या प्राणापेक्षा अधिक असलेली आमची पायी वारीची परंपरा व स

 मराठवाडा विभाग माहिती संचालकपदाचा हेमराज बागुल यांनी स्वीकारला कार्यभार 

Image
  मराठवाडा विभाग माहिती संचालकपदाचा हेमराज बागुल यांनी स्वीकारला कार्यभार    औरंगाबाद, दि.04, (प्रतिनिधी) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक म्हणून हेमराज बागुल यांनी आज येथे (दि.04) रोजी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. श्री. बागुल हे सध्या नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाची सुत्रे श्री.राधाकृष्ण मुळी यांच्याकडे होती. त्यांच्या निवृत्तीमुळे दि.31 मे 2021 रोजी हे पद रिक्त झाले होते. खडकेश्वर येथील संचालक कार्यालयात आज श्री. हेमराज बागुल यांचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती अधिकारी वंदना थोरात, सहायक संचालक मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव पाटील, श्याम टरके, रेखा पालवे आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.बागुल यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला. श्री.बागुल यांनी यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्र