पंढरीनाथा वारीचा तिढा सोडव बा आता..! शासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा - विश्व वारकरी संघाची मागणी

पंढरीनाथा वारीचा तिढा सोडव बा आता..! शासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा - विश्व वारकरी संघाची मागणी


महाराष्ट्र शासनाने वारीचा तिढा सुटला अशी बातमी दाखवली परंतु वारीचा तिढा सुटलाच नाही शासनाने वारकऱ्यावर लादला हेच खरे वास्तव आहे. पायी वारीच्या संबंधाने वारकऱ्यांची संख्या 50 ते 100 मर्यादित ठेवावी हे वारकऱ्यांना मान्य आहे परंतु ज्ञानोबाराय जगद्गुरू तुकोबाराय व सन्माननीय संतांची वारी पायीच झाली पाहिजे यामागणीवर वारकरी ठाम आहेत. 

शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वारी करू संपूर्ण महाराष्ट्रातील परमार्थ प्रेमी व वारकरी यांनी शासनाला सहकार्य करण्याचे आव्हानही करू परंतु 

संताच्या पालख्या ह्या पायीच पंढरपुरला जातील यावर वारकरी शासन निर्णयाची वाट पाहत आहेत परंतु सरकारने मीडियातुन बातमी प्रसारित केली की पंढरी च्या वारीचा तिढा सुटला वारकरी बस मधून पालखी वारीला जाण्यास मान्य झाले आहेत सदरील वृत्त हे वारकरी लोकांना अचंबित करणारे आहे तिढा जशास तसा कायम आहे सुटला नाही

वारकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या की आमच्या प्राणापेक्षा अधिक असलेली आमची पायी वारीची परंपरा व साधना खंडीत होऊ नये हिच प्रत्येकाच्या अंतःकरणातील तळमळ असते. आमच्या प्राणप्रिय पांडुरंगाच्या भेटीला पायी जाण्याच्या संवेदनशील परंपरेचा शासनाने पुनर्विचार करावा असे आव्हान यावेळी विश्व वारकरी संघाचे प्रदेश अध्यक्ष ह भ प पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांनी केले आहे.



Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन