Posts

Showing posts from July, 2023

खेळाडूंना हवे होते आज फिटनेस प्रमाणपत्र.... सिव्हिल हॉस्पिटल कर्मचारी म्हणतात ये उद्या....

Image
 खेळाडूंना हवे होते आज फिटनेस प्रमाणपत्र.... सिव्हिल हॉस्पिटल कर्मचारी म्हणतात ये उद्या....शेवटी सिव्हिल सर्जन साहेबांनीच स्वतः बसून तयार करून दिले प्रमाणपत्र  (कर्मचारी ह्यांनी नेहमी प्रमाणे करत राहीले टाळाटाळ व एकमेकांवर जबाबदारी ढकलत)  परभणी (वार्ता) - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सकाळी परभणीतील राष्ट्रीय खेळ मध्ये पाटणा येथे सहभागी होण्यासाठी जाणार आहेत नेशनल गेम मध्ये सहभागी प्रत्त्येक खेळाडुंना फिटनेस प्रमाण पत्र आवश्यकता असते ते काढण्यासाठी खेळाडू सिव्हिल हॉस्पिटल ओपीडी मध्ये दाखल झाल्या व रीतसर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आणि त्यांना हे सर्व झाल्यावर प्रमाणपत्र संध्याकाळी मिळेल याची अपेक्षा होती ,परंतु कर्मचारी वर्गाने नेहमी प्रमाणे आपले रूप दाखवले सदरील खेळाडूला विनाकारण प्रथम 1 तास विविध विभागात अधिकाऱ्याला भेटा त्यांना बोला आमचे कडे अधिकार नाहीत,हे असेच अर्ज हवा तसा अर्ज हवा असे बिनकामाची मागणी केली गेली,शेवटी 5:45 वा प्रमाणपत्र हवे असेल तर ये उद्या आज काही तुला प्रमाण पत्र मिळू शकत नाही असे उत्तर देऊन बाहेरचा रस्ता दाखवला ,घडलेला प्रकार खेळाडूंना योग्य वाटले नाही त्यांनी

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत भरा- धनंजय मुंडे

Image
 पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार - धनंजय मुंडे यांची माहिती  राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा; मागील 24 तासात सात लाख वीस हजार शेतकऱ्यांची नोंद  मुंबई (31) - पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याह

भूमी हडपणारा वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करा हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन 

Image
 भूमी हडपणारा वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करा हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन   परभणी,दि.19(प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली 3500 कोटी रुपयाची भूमी हडपून ‘लँड जिहाद’ करणारा वफ्क बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.   छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे.  त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लॅण्ड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महेश काळे, मंदार कुलकर्णी, श्रीनिवास लाहोटी, अमोल देशमुख, श्रीनिवास दिवाण, उदय बद्गुजर आदी उपस्थित होते.

कर्जाचा चेक देतो 5000 रुपये मागितली लाच , एसीबी ने धरले रांगेहात

Image
कर्ज चेक देतो 5000 रुपये मागितली लाच एसीबी ने पकडले रंगेहात   साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या), परभणी मधील जिल्हा व्यवस्थापक व  क्लर्क ह्यांना लाच घेताना रांगेहात पकड़ले परभणी (प्रतिनिधि) - येथील  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या), परभणी.  जिल्हा व्यवस्थापक, चंदू किसनराव साठे,(आलोसे 1) वय 56 वर्ष ,व  क्लर्क अविनाश प्रकाश मुराळकर (आलोसे 2) वय 35 वर्ष ,यांना 5000 रुपये ची लाच घेताना एसीबी पथकाने रांगेहात पकड़ले  याबाबत सविस्तर वृत्त ऐसे की यातील तक्रारदार यांच्या आत्याचे नावे मंडप डेकोरेशन व्यवसायाकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या), कार्यालय परभणी येथे 1,00,000/- रुपये कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता. दिनांक 13/07/2023 रोजी तक्रारदार व त्यांच्या आत्या हे आलोसे क्रमांक 01 यांना भेटून 1,00,000/- रुपये मंजूर कर्जाचा धनादेश देण्यासाठी विनंती केली असता यातील आलोसे क्र. 01 यांनी सदर धनादेश देण्यासाठी 5,000/- रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली होती. लागलीच आलोसे क्र 02 यांना तक्रारदार व त्यांच्या आत्या भेटल्या अ

राजकारण सोडून, शेतकरयांच्या अडचणी त्वरित सोडवू - धनजंय मुंडे,कृषि मंत्री

Image
राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत खतांच्या किंमती स्थिर, केंद्र सरकारने वाढीव अनुदान दिले - धनंजय मुंडे  बोगस बियाण्यांच्या विरोधात कडक कायदा याच अधिवेशनात आणणार - धनंजय मुंडे यांचे विधानसभेत स्पष्टीकरण  पीक कर्ज वाटपाची रक्कम 24 हजार कोटींवरून 28 हजार कोटीने वाढली, पीक कर्जापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडे यांचे विरोधकांना संवेदनशील उत्तर, राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी मांडा, त्या सोडवू - मुंडेंची स्पष्टोक्ती  मुंबई (दि. 19) - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमती वाढल्यास देशातील बाजारपेठेत त्याचा परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकार वाढीव अनुदान देत असते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमती स्थिर राहिल्यास त्या देशातील बाजारपेठेतही स्थिर राहतात म्हणूनच 2022 सालच्या तुलनेत 2023 मध्ये ही महाराष्ट्र राज्यात खतांच्या किमती स्थिर असून उलट काही ठराविक खतांच्या किमतींमध्ये घट देखील झाली आहे, असे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत बोलताना म्हटले आहे. काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीतील बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक यांना लाच घेताना अटक  शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मागितली होती लाच परभणी (प्रतिनिधी) :- परभणीतील नानलपेठ मधील बाल विद्या मंदिर माध्यमिक शाळेचा मुख्यधापक व लिपिक यांनी शाळेत प्रवेश मिळवून देतो म्हणून लाचेची मागणी केली लाच लुचपत विभागाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले. याबाबत सविस्तर वृत्त असे की ;  आरोपी क्रमांक एक मोहमद अब्दुल रफी मोहमद अब्दुल रशीद, वय 54 वर्ष, व्यवसाय कनिष्ठ लिपिक, बाल विद्या मंदिर माध्यमिक शाळा, नानलपेठ शाखा परभणी रा.भोई गल्ली परभणी. आरोपी क्रमांक दोन एकनाथ कच्छवे, वय 57 वर्षे, व्यवसाय मुख्याध्यापक बाल विद्या मंदिर(प्राथमिक), नानलपेठ शाखा,परभणी रा.जुना पेडगाव रोड, परभणी यातील तक्रारदार यांच्या मुलीचे पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी यातील दोन्ही आलोसे यांनी 7500/- रुपयांची लाचमागणी केली म्हणून तक्रार प्राप्त झाली. दिनांक 28/06/2023 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी तडजोडीअंती 5,500/- रु पंचासमक्ष लाचमागणी केली. त