भूमी हडपणारा वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करा हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन 

 भूमी हडपणारा वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करा हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन 


 परभणी,दि.19(प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली 3500 कोटी रुपयाची भूमी हडपून ‘लँड जिहाद’ करणारा वफ्क बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. 

 छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. 

त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लॅण्ड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महेश काळे, मंदार कुलकर्णी, श्रीनिवास लाहोटी, अमोल देशमुख, श्रीनिवास दिवाण, उदय बद्गुजर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज