Posts

Showing posts from October, 2022

राज्यस्तरीय गतका स्पर्धा, प्रथम विजेते पदाचा मान परभणी जिल्ह्याला

Image
राज्यस्तरीय गतका स्पर्धा, प्रथम विजेते पदाचा मान परभणी जिल्ह्याला  परभणी, ( टिळक रत्न प्रतिनिधी) : - गतका असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित चौथी राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेचे येथील जिल्हा क्रिडा संकुलामधील बॅडमिंटन हॉलमध्ये 8 ते 10 ऑक्टोंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वसाधारण प्रथम विजेते पदाचा मान परभणी जिल्ह्याला मिळाला. तीन दिवशीय आयोजित या स्पर्धेत एकूण 15 जिल्ह्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये परभणी, जळगाव, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, संभाजीनगर, सांगली, नांदेड, हिंगोली, सोलापूर, अकोला, नागपूर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश होता. स्पर्धेत 250 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय जााधव तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल गतका असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य बलजिंदसिंग, अ‍ॅड. संभाजी देशमुख, संतोष नरवानी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना खासदार संजय जाधव म्हणाले, गतका हे खेळ पंजाबचे कल्चर आहे व महाराष्ट्रात शिवकालीन आहे. खेळात शेवटी हार-जीत असतेच परंतु, हारल्यानंतरदेखील नाउमेद न

उठा उठा दिवाळी आली..100 रु रेशनकार्ड वर किराणा घ्यायची वेळ झाली

Image
 दिवाळी निमित्त 4 शिधा जिन्नस संचाचा लाभ घेण्याचे लाभार्थ्यांना आवाहन  उठा उठा दिवाळी आली रेशनकार्डवर 100 रु किराणा घ्यायची वेळ झाली  परभणी दि. 11 (टिळक रत्न प्रतिनिधी) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना दिवाळी निमित्त 4 शिधा जिन्नासांचा समावेश असलेल्या शिधा जिन्नस संचचा लाभ घेण्यासाठी पात्र शिधापत्रिकाधारकाने त्यांचे तालूक्याचे संबंधीत स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडे शासन नियमानुसार देय रक्कम भरुन शिधाजिन्नस संच हस्तगत करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. नियमित धान्य मोफत धान्य या व्यतिरिक्त हे अतिरिक्त पॅकेज अतिशय स्वस्त दरात मिळणार आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी आवश्यक शिधा जिन्नस संचाची मागणी पुरवठा विभागातर्फे संबंधीत कंत्राटदारांकडे नोंदविली आहे. तालुका गोदामांपर्यंत संच पोहोचविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे. विशेष म्हणजे एफएसएसआय मानंकाची पुर्तता करत असल्याचे एनएबीलएल अधिस्वीकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र कंत्राटदाराकडून प्राप्त केल्यानंतर शिधा जिन्नस संच स्वीकारवेत अशा शासनाच्या सूचना आहेत. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्यो

परभणी मनपाच्या भारी नियोजनामुळे आठवडाभर परभणीकरांना प्यायला मिळणार नाही पाणी

Image
 परभणी मनपाच्या भारी नियोजनामुळे आठवडाभर परभणीकरांना प्यायला पाणी मिळणार नाही परभणी ( टिळक रत्न प्रतिनिधी)- हजारो कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना परभणीकरांसाठी आणलेली आहे. परंतु केवळ आणि केवळ शहर महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील काही भागात गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. सुमारे १ लाख नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून पाणी मिळाले नाही. यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असून मनपा आयुक्तांनी आता तरी यात लक्ष घालावे, अशी मागणी ngrहोत आहे. शहर महानगरपालिकेचा ढिसाळ आणि गलथान कारभार परभणीकरांना सर्वश्रुत आहे. याचेच उदाहरण पून्हा एकदा पहायला मिळत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करण्यासाठी जो विद्युत पुरवठा लागतो त्यासाठीचे रोहित्र जळाले आहे. परंतु हे रोहित्र गेल्या १५ दिवसांपूर्वीच खराब झाले होते. याकडे मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, पाणीपुरवठा करण्यासाठी ४ पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. त्यातील केवळ २ पंप सुुरु असून एका पंपाची एक वर्षापासून दुरुस्ती सुुरू आहे. त्यामुळे आता सध्या केवळ एका पंपावरच पाणीपुरवठा सुरु आहे. त्यातील एकच मोटार चालू असल्याने पाणी